Skip to main content

दु:खाच्या वाटेवरचे गाव

लेखक शिवोऽहम् यांनी शुक्रवार, 09/09/2016 23:37 या दिवशी प्रकाशित केले.
वेदिका कुमारस्वामी यांच्या कविता सध्या वाचतोय फेसबुकवर. कविता नव्या आहेत, नव्या दमाच्या आहेत. दम कोंडणार्‍या आहेत. धग सोसवत नाही आणि तोंड फिरवायचीही सोय नाही. यापुर्वी इतकी घालमेल झाली होती तेंव्हा जिएंची राधी वाचून खाली ठेवली होती. का चंद्रावळ किंवा स्वामी? गळ्यात माझ्याच आतड्यांचे फास अडकवून अस्संच फरफटवत नेलं होतं ती गोलपिठ्यातली कुठली बरं कविता? की सगळ्याच? ही जिवंत कविता आहे. - ताजी, रक्ताळलेली, जाईजुईच्या काटेरी डोंगरांमधली, लुत भरलेल्या ओंगळ कुत्र्याची. हिरव्या रेषांच्या वाटांची, चमेलीच्या अंगाची. - आज्जीची, अम्माची, हेगडेची, भद्रा नदीसारखं हसण्याची, कॉफीच्या बियांची.

आता मला वाटते भिती

लेखक राजेंद्र देवी यांनी शुक्रवार, 09/09/2016 16:27 या दिवशी प्रकाशित केले.
आता मला वाटते भिती कोठे गुंड त्रास देती कोठे पोलीस मार खाती अशा या समाजाची आता मला वाटते भिती कधी तरुणाईचे भांडण तर कधी रस्त्यावरचे भांडण सुशिक्षित समाजातले असंस्कृत जन अशा या जनाची आता मला वाटते भिती रामराज्याची अपेक्षा पण वागण्याची रावणनिती या समाजाला आता नाही कोणाची भीती अशा या समाजाची आता मला वाटते भिती या समाजाच मी एक भाग मला माझ्या सावलीची आता मला वाटते भिती राजेंद्र देवी

अर्पणपत्रिका...

लेखक अनिरुद्ध प्रभू यांनी शुक्रवार, 09/09/2016 16:13 या दिवशी प्रकाशित केले.
पुस्तकांचं एक वेगळं, स्वतःच असं जग आहे हे सगळ्यांना ठाउक आहे. पण या पुस्तकांत सुद्धा एक त्याचाच भाग असलेलं पण तेवढचं स्वतंत्र अस एक जग असतं ते म्हणजे 'अर्पणपत्रिका'... मनात वाटलं या अर्पणपत्रिका, हे जग एकत्र आणलं तर... बस या एका विचाराने हा धागा काढला आहे... मला भावलेल्या आवडलेल्या काही अर्पणपत्रिका मी इथे देत आहे... आपणही या संग्राहात हातभार लावावा अशी विनंती... अर्पणपत्रिका म्हटलं कि सगळ्यात पहिल्यांदा मला जी.ए. आठवतात.. म्हणुन सुरुवात त्यांच्याचकडुन.. ‘हिरवे रावे’ हा कथासंग्रह आपल्या आईला अर्पण करताना जी.ए. म्हणतातः कै.

हॅमर कल्चर

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी शुक्रवार, 09/09/2016 13:21 या दिवशी प्रकाशित केले.
हॅमर कल्चर लेखक :- प्रभाकर नानावटी बाविसाव्या शतकातील बाप-लेकीत घडलेला हा संवाद. "पपा, पपा, तुम्ही सतत माझ्यापासून तो हातोडा का लपवून ठेवता?" "त्याच्यामागे एक फार मोठी गोष्ट आहे." "पपा सांगा की ती गोष्ट मला" "विसाव्या शतकात घडलेली ही गोष्ट आहे. त्याकाळी एक ‘प्रगत’ समाज होता. अचानक एके दिवशी एकमेकांच्या डोक्यावर हातोडा मारण्याची लाट उठली. काही महिन्यातच ही क्रेझ सर्वांच्या अंगवळणी पडू लागली. लोकांना दुसरे काही सुचेनासे झाले. जो उठतो तो हाण दुसऱ्याच्या डोक्यावर हातोडा. हळू हळू हा समाज बदलला.

एकेकाचे जगणे

लेखक पथिक यांनी शुक्रवार, 09/09/2016 12:36 या दिवशी प्रकाशित केले.
कुणाला कशाची पडलेली असते अन कुणाला कशाची कुणाला काय भावतं अन कुणाला काय कुणाला काय सलतं अन कुणाला काय अन ज्याला जे भावतं, जे सलतं त्याला तेच महत्वाचं वाटतं …. कुठे 'गोली मार भेजे में' कुठे 'जिस्म' कुठे 'जय जय राम कृष्ण हरी' कुठे 'जय हिंद' कुठे 'गांधीगिरी' कुठे 'नथ्थुराम' कुठे काय नि कुठे काय या ना त्या प्रकारे घेतो प्रत्येकजण जगणे मोल कुठे सोनेरी कुठे बिलोरी कुठे बेगडी …. पण प्रत्येकाने मोजलेली किंमत मात्र असते अस्सल - रक्ताची अश्रूंची हृदयाची आत्म्याची

रात्रीस खेळ चाले....

लेखक राजेंद्र देवी यांनी शुक्रवार, 09/09/2016 11:23 या दिवशी प्रकाशित केले.
रात्रीस खेळ चाले.... गूढं त्या महाली केस सोडून ती बसलेली काळा मिट्ट अंधार अन काजव्याने पण मान टाकलेली अचानक एक टिटवी ओरडली आढ्याशी भुते खदखदली वारा नव्हता तरी अचानक तावदानाची दारे खडखडली रात्र खूपं वाढलेली कोल्हे कुत्री केकाटली झरोक्यातून सावली उतरली मांजराने बाहुली पळवली.... राजेंद्र देवी

जाणिवांच्या जखमा

लेखक महेश रा. कोळी यांनी शुक्रवार, 09/09/2016 00:07 या दिवशी प्रकाशित केले.
हे असे दिवसा उजेडी आभाळ आंधारू नये करावे उपकार कुणी केस मोकळे सोडू नये. हसतोच आहे हाय मी मंदिरात अन् मसणातही काय याला दुःख कसले?असे कुणा वाटू नये. काल शिकलो मी धडा प्राक्तनाच्या बेदिलीचा क्षणासाठी तोडले मोगऱ्याला , मग वाटले तोडू नये का अशा जाणिवानां होतात जखमा सारख्या? काळीज चिरणार्या अशा आठवां कुणी काढू नये. ....म्हैश्या
काव्यरस

अडीच हजार गायींची चोरी करणारा अल्वरेज केली

लेखक महामाया यांनी गुरुवार, 08/09/2016 22:34 या दिवशी प्रकाशित केले.
आठवणीतला हाॅलीवुड-सात चोरी ती चोरीच...पण त्या चोरीचं तत्कालीन अमेरिकी राष्ट्रध्क्षांनी देखील कौतुक केलं होतं. म्हैस किंवा गाय चोरून नेण्याची एखादी घटना आपल्याला जवळपास कधीतरी बघायला मिळते, पण अडीच हजार गायी एकत्र पळवून नेणं...अशक्यच...नाही कां...! अशाच चोरीच्या एका सत्य घटनेचं रोमहर्षक चित्रण होतं हॉलीवुडच्या ‘अल्वरेज केली’ या चित्रपटांत, दिग्दर्शक होता एडवर्ड डिमट्रिक्स. चित्रपटाच्या सुरवातीला पडद्यावर ही अक्षरे येतात... In every war...In every age...The forgotten weapon is...Food.

गुडगांव

लेखक स्वामी संकेतानंद यांनी गुरुवार, 08/09/2016 21:10 या दिवशी प्रकाशित केले.
आपणच खरवडून काढावे आपल्या अजस्र जखमेवरच्या अपक्व खपल्यांचे तुकडे.... तसं हे शहर भयाण स्वप्नांच्या रात्रीनंतर दिवास्वप्नांच्या भीतीने टक्क जागे राहावे..... तसं हे शहर सागराचा थांग घेताना अथांग व्हावे नदीने अन् त्याचा माज करावा...... असं हे शहर उत्फुल्ल पाण्यात कळकट शेवाळी तवंग तरंगावा..... तेच हे नगर एका पराभवातून अलगद दुसऱ्या पराभवात ढकलणाऱ्या विजयाचा आनंदोत्सव.... .....गुडगांव