Skip to main content

पॉईंट झीरो

लेखक अभ्या.. यांनी बुधवार, 21/09/2016 18:06 या दिवशी प्रकाशित केले.
झीरो ................ "चला राजं, नवं साह्याब आलंत रेस्ट हाऊसला. पीआय साह्यबानं सांगीतलय. जाऊन येऊ." रेस्ट हाऊसला सगळा थाटच, लाल दिवा मिरवत बाहेर थांबलेली अ‍ॅम्बॅसेडर, दोन जीपा, चार पाच सफारीवालं, दोन इन्शर्टात गॉगल मिरवणारं. एक जण फाईल घिवून भईर आला की मोरेदाजीनी वर्दी दिली. रव्याला घीवून आत घुसले तसा साह्यब फिरुन बघितला. खालमानेच्या रव्याकडे डोसक्यापासून पायापर्यंत पहात मोरेदाजीवर कडाडला. "काय मोरे, युनिफॉर्म बदलला का नियम बदलले परस्पर? आँ" "न्हाई सोनकांबळे साहेब, मी आहे की. ह्ये कॉन्स्टेबल न्हाई, झीरो आहे, गावचाच आहे आपल्या.

केप टाउन ते क्रूगर व्हाया गार्डन रूट! ----भाग ४

लेखक पद्मावति यांनी बुधवार, 21/09/2016 16:30 या दिवशी प्रकाशित केले.
मला ना लहानपणी काही विशिष्ठ गावे आणि जागा या निव्वळ दंतकथा वाटायच्या. उदाहरणार्थ - टिमबकटू , झुमरीतलैय्या किंवा केप ऑफ गुड होप. मला ही ठिकाणं म्हणजे अनुक्रमे- वाक्प्रचार म्हणून वापरायला, फिल्मी गाण्यांच्या फर्माईशी पाठवायला आणि वास्को डी गामाला शॉर्ट कट मारुन हिंदुस्तानात येता यावे म्हणून निर्माण केलेल्या काल्पनिक गोष्टी वाटायच्या……. पुढे वयोमानपरत्वे समजले की या जागा दंतकथेतल्या नसून खरोखरीच अस्तिवात आहेत. त्यापैकी केप ऑफ गुड होपला तर आज प्रत्यक्ष जाण्याचा आमचा बेत ठरला होता. सहाजीकच तीथे जाण्यासाठी आम्ही कमालीचे उत्सुक होतो. ब्रेकफास्ट नंतर आम्हाला घ्यायला आमची टूर गाइड आली होती.

श्रद्धांजली

लेखक निनाव यांनी बुधवार, 21/09/2016 14:54 या दिवशी प्रकाशित केले.
श्रद्धांजली लागावी कशी झोप आम्हा आत्ता कळले जेंव्हा - सरहद्दी वर वाहिले रक्त ते , आमुच्या शांत झोपे साठी होते! हसावे आम्ही कसे आत्ता, झालात तुम्ही हसत हसत हुतात्मा दोषी वाटते आम्हा आज गाफ़ील चारित्र्य आमुचे होते ! उठू आम्ही सर्व आत्ता लढू आम्ही वैरास बांधू आम्ही हा देश ऐसा पाहिले स्वप्न जैसे तुम्ही होते !
काव्यरस

श्वास...

लेखक राजेंद्र देवी यांनी बुधवार, 21/09/2016 11:39 या दिवशी प्रकाशित केले.
श्वास... जीर्ण झाली सारी पाने आता हवा एक देठ नवा तिच फुले अन तेच वारे आता हवा गंध नवा सावल्यांनी घेरले आहे आता हवा एक सूर्य नवा ओशटलेली सारी नाती आता हवा एक बंध नवा जुने झाले श्वास सारे आता हवा एक श्वास नवा राजेंद्र देवी

फीडबॅक हवा आहे !

लेखक साहना यांनी बुधवार, 21/09/2016 11:01 या दिवशी प्रकाशित केले.
मागील दोन वर्षां पासून काही मित्र आणि मी केवळ सामाजिक दृष्टिकोनातून हे app मेंटेन करत आहोत. ह्यांत नवीन सुविधा द्याव्या, जास्त कन्टेन्ट यावा ह्या साठी वाचनप्रेमी लोकांचा फीडबॅक पाहिजे आहे. कुणाला बीटा युसर व्हायचे असेल तर आपला इमेल व्यक्तिगत संदेश मध्ये पाठवा. ह्या अँप मध्ये छोटी पुस्तके, कादंबरी, बातम्या आणि इतर दर्जेदार कन्टेन्ट उपलब्ध करून देण्यात आला आहे. भयकथा, पौराणिक आणि विज्ञानकथा वर विशेष भर आहे. https://play.google.com/store/apps/details?id=com.upasanhar.marathi.kad…

झीरो

लेखक अभ्या.. यांनी मंगळवार, 20/09/2016 23:52 या दिवशी प्रकाशित केले.
"मम्मे, बुटं कुटं फेकलीसा?" इनशर्ट करत करत रव्या बोंबलला "न्हाय माय, म्या कशापायी टाकू. ते दावेदारानं नेलं का उचलून बघ माय" "तिज्यायला न्हेऊन्शानी, कायतर सोड म्हण" एक सापडला बाहेरच्या खाटंखाली, दुसरा न्हाणीच्या चुलीमागं. तिथलंच फडकं मारल बसून तोपर्यंत फवं न च्या आला. एक घास फव्याचा न एक घोट चाचा करणार्‍या लेकाला न्हाहाळत बसली माय. काळं का असना पण रव्या नाकीडोळी देखना. नाकाडोळ्यापेक्षा नजरंत भरायचा बेगुमानपणा. बारीक मशीन मारलेल्या आर्मीकटला उचलून धरायची दणक्या छाती. खांदं कधी पुढं आलं नाहीत.

Please, Look After Mom!

लेखक शिव कन्या यांनी मंगळवार, 20/09/2016 22:49 या दिवशी प्रकाशित केले.
Please, Look After Mom ही Kyung-sook Shin या कोरियन लेखिकेची कादंबरी नुकतीच वाचनात आली. कादंबरीच्या नावातच तिचा कथा विषय, आई, ठळकपणे सूचित होतो. खरंतर आई या विषयावर विपुल लेखन झालेले आहे.

पाकिस्तानचे हल्ले आणि मोदी पर्रीकर

लेखक नर्मदेतला गोटा यांनी मंगळवार, 20/09/2016 17:33 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच पाकिस्तानने भारतावर हल्ला केला आणि आपले काही सैनिक मारले. सगळा देश यामुळे संतप्त आहे. पण याला जरासे वेगळे वळण लागलेले दिसत आहे. काही लोक आज मोदी आणि त्यांच्या सहकार्‍यांना शिकवायला निघाले आहेत. मोदी संघाच्या मूशीतून घडलेले संन्यस्त वृत्तीचे नि:स्वार्थी व्यक्तिमत्त्व आहे. मनोहर पर्रीकर हेही संघाच्याच संस्कारात घडलेले व्यक्तिमत्त्व आहे. ते गोव्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री होते. स्वतः अत्यंत बुद्धिमान आणि आय आय टी चे विद्यार्थी आहेत. तसेच संरक्षण मंत्री झाल्यावर अनेक दूरदर्शी निर्णय त्यांनी घेतले.

'सोनाली केबल'..

लेखक अनिरुद्ध प्रभू यांनी मंगळवार, 20/09/2016 15:25 या दिवशी प्रकाशित केले.
कमी बजेटच्या, जास्त मोठे चेहरे नसलेल्या चित्रपटांमधे बर्‍याचवेळा काहिना काही वेगळं बघायला मिळालयं. मग यारा सिलि सिली असेल किंवा डिअर डॅड. असे बरेच चित्रपट, त्यांचे विषय, त्यांना मांडणारे लेखक-दिग्दर्शक अगदीच नवखे असल्यानं त्यांच बजेट किंवा त्यांची जाहीरात, प्रसिद्धी या सर्व बाबतीत इतर बड्या बॅनर्सपेक्षा बर्‍याच मोठ्या प्रमाणात मागे राहतात. पण त्यांच्यामधे एक वेगळेपण असतं. याच पठडीतला गेल्या वर्षी प्रदर्शीत झालेला चित्रपट म्हणजे...'सोनाली केबल'.. मुंबईत आपला केबलचा व्यवसाय सांभाळताना अचानक शायनिंग केबल सारखी मोठी कंपनी आपला व्यवसाय गिळु पाहतेय हे कळल्यानंतरचा प्रवास म्हणजे सोनाली केबल.

रात्रवेड

लेखक पथिक यांनी मंगळवार, 20/09/2016 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
घे तुझ्या पाकळ्यांत मिटून रात्री मला दे तुझ्या चांदण्यात मिसळून रात्री मला गूढ तुझ्या प्रांती विहरतो बैरागी वारा दे त्याच्या पंखावर बसवून रात्री मला विराट तुझ्या मौनाचा अथांगला डोह या अथांग डोहात दे बुडवून रात्री मला तुझ्या काळ्या मातीतून उगवतो उद्याचा सूर्य उद्या उगविण्यासाठी घे रुजवून रात्री मला