लेखकफिझायांनी बुधवार, 12/10/2016 15:03 या दिवशी प्रकाशित केले.
मित्र मैत्रिणींनो , धन्यवाद !!!! 'मैत्रीण 'हि कविता तुम्हाला आवडली. माझ्या ज्या मैत्रिणीसाठी हि कविता उमटली, त्या मैत्रिणीने त्या कवितेला दिलेला प्रतिसाद इथे पोस्ट करत आहे .... ...... ...... ......
लेखकनाखुयांनी बुधवार, 12/10/2016 09:27 या दिवशी प्रकाशित केले.
अत्यंत सुंदर अर्थवाही रचनेचे विंडंबन करणे जीवावर आले होते,पण नंतर लक्ष्यात आले ही कलाकृती विडंबन नसून चाल तिथून घेऊन केलेली स्वतंत्र वाट्चाल आहे.
दसरा मेळावा होऊन गेल्याने ही कवीता येणे आवश्यक होते.
मूळ कवींनी (राजेंद्र देवी) मोठ्या मनाने माफ करणे.
पाहून स्वप्ने सत्तेची
बोकाळली आहे संराशा१
आता कोठे होऊ लागल्यात
पाठवणी जराश्या
का करीशी भणभण
या वखवखलेल्या सत्ताबाजारात
आता कोठे मिळविल्यात
खुर्द्यात चवल्या जराश्या
आजूबाजूला बोंबाबोंब किती
कोण ऐकेल माझे
घायाळ झाली आता
कोठे माझी दमाची भाषा
ना रुजते मन माझे
या झाकोळल्या विजनात
राहतं नाही माझ्या
कृष्ण्कर्मे आडोश्या
फरपटत जात
लेखकभटकंती अनलिमिटेडयांनी बुधवार, 12/10/2016 09:19 या दिवशी प्रकाशित केले.
भर उत्तररात्री थोरल्या वाड्याला जाग आली होती. शिरकाई मंदिरातून देवीच्या नामाचा गजर शरदाच्या थंड वार्यावर ऐकू येत होता, डफ-संबळाचा आवाज घुमत होता. तिथे गेले नऊ दिवस देवीचा जागर चालू होता. शारदीय नवरात्रीचे दिवस. दशमीचा चांदवा
लेखकराजेंद्र देवीयांनी बुधवार, 12/10/2016 08:30 या दिवशी प्रकाशित केले.
अंधारलेल्या निशा...
पाहून स्वप्ने उद्याची
सोकावली आहे निराशा
आता कोठे जागू लागल्यात
आठवणी जराश्या
का करीशी वणवण
या रखरखलेल्या वाळवंटात
आता कोठे विसावल्यात
उन्हात सावल्या जराश्या
आजूबाजूला कोलाहल किती
कोण ऐकेल माझे
वाचाळ झाली आता कोठे
माझी मौनाची भाषा
ना भिजते मन माझे
या कोसळत्या पावसात
राहतं नाही माझ्या
आठवणी पारोश्या
भरकटत जात आहे मी
दिशाहीन झाल्या या दिशा
दाविती उजेड मज
या अंधारलेल्या निशा
राजेंद्र देवी
लेखकईंद्रधनुयांनी बुधवार, 12/10/2016 01:28 या दिवशी प्रकाशित केले.
मिर्जा गालिब हे शायरी मधलं एक अजरामर नाव. गालिबची "हजारो ख्वाहिशे ऐसी" हि गझल रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आली आहे. कितीतरी लोकांनी याचं रसग्रहण आपापल्या शब्दात केलं आहे त्यात माझीही एक भर घालतो.
"हजारों ख्वाहिशें ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले
बहुत निकले मेरे अरमाँ , लेकिन फिर भी कम निकले"
यामध्ये गालिबने माणसाच्या कधीही न संपणाऱ्या इच्छा आकांक्षांचं वर्णन अगदी अचूक शब्दात केलं आहे. एक एक इच्छा पूर्ण करताना जन्म संपेल अशा हजारो इच्छा आहेत.
लेखककवि मानवयांनी मंगळवार, 11/10/2016 20:23 या दिवशी प्रकाशित केले.
देगा देवा एकच दान
मना लागे समाधान
होऊ नये उंच एवढा
इतर वाटती लहान !!१!!
देगा देवा एवढे बळ,
सोसण्या आयुष्यातली झळ,
जगणे कर एवढे सुंदर,
मरण तर आहे अटळ !!२!!
देगा देवा दया- माया,
व्हावे मी एखाद्याची छाया,
झालो आधार न कोणाचा,
तर व्यर्थची गेली ही काया !!३!!
देगा देवा एवढे ज्ञान,
असे भल्या-बुऱ्याची जाण,
अहंकार न अंगी यावे,
असावे मज सदैव भान !!४!!
देगा देवा सदाचार,
उजळत जावे माझे विचार,
अंतरीतला राम विजयी व्हावा
रावणाचे करून संहार !!५!
लेखकश्रीकृष्ण सामंतयांनी मंगळवार, 11/10/2016 08:50 या दिवशी प्रकाशित केले.
"काल दुसरं डिबेट झालं.हिलरी चवदा पॉइन्ट्सने दुसर्यांदा जिंकली.
२००५ मधे खासगीत ट्रम्प जे व्हिडीयोवर स्त्रींयाबद्दल(हलकट,चावट) बोलला होता, तो व्हिडीयो डिबेटच्यापूर्वी ऐनवेळी सर्व देशात टिव्हीवर उघडपणे दाखवला गेला.
डिबेटमधे त्याबद्दल त्याला प्रथम माफी मागावी लागली.हिलरीने त्याला डिबेटमधल्या तिच्या भाषणात शाल-जोडीतले जोडे योग्य प्रकारे दिले म्हणा.
आणि ट्रम्पच शेवटी हिलरीबद्दल बोलला,
"She doesn’t quit. She doesn’t give up. I respect that. I tell it like it is.
लेखकनिनादयांनी मंगळवार, 11/10/2016 05:15 या दिवशी प्रकाशित केले.
इशारा: सदर लेख धार्मिक लिखाण या प्रकारात येऊ शकतो.
ज्यांना या लिखाणाची अॅलर्जी असेल त्यांनी येथेच थांबावे, पुढे वाचू नये. तसेच या लेखात प्राचीन भारतीय विचारांची भलामणही आहे. ज्यांना याचा त्रास होतो त्यांनीही त्यांनी येथेच थांबावे, पुढे वाचू नये.
या लेखातील दावे काही जणांना वैज्ञानिक स्वरूपाचे वगैरे वाटू शकतील. तर ते दावे तसे नसतीलच अथवा असतीलच असेही नाही.
इशारा संपला!
---
हा लेख येथे का?
पैसा ताईंनी प्राचीन भारतीय वेद पुराणे विज्ञान हा कायप्पा समुह काढताना सांगितले होते की तेथे काही चांगली चर्चा झाली तर ती येथे ही यावी.