Skip to main content

मूल दत्तक घेणे हा मूर्खपणा आहे का?

लेखक आदित्य कोरडे यांनी मंगळवार, 25/10/2016 06:38 या दिवशी प्रकाशित केले.
मूल दत्तक घेणे हा मूर्खपणा आहे का? मूलतः हा प्रश्नच मूर्खपणाचा आहे पण तो मला पडलेला नाही. वसुधाने(बायको) मानसिक समुपदेशक म्हणून काम करायला सुरुवात केल्यापासून एक एक वल्ली येऊन भेटतात त्यातल्याच एकाने विचारलेला हा प्रश्न. आता बायकोकडे येणाऱ्या रुग्णांबद्दल लिहिणे नैतिकतेला धरून नसल्याने त्याबद्दल जास्त लिहित नाही पण या प्रश्नाने विचार चक्र सुरु झाले. आम्ही आमची एकुलती एक मुलगी दत्तकच घेतली आहे आणि त्या सगळ्या सरकारी प्रक्रियेतून जाताना अनेक अनुभव आले,अनेक लोक भेटले त्यांच्या प्रतिक्रिया, अनुभव (बऱ्याचदा अननुभव).

भटकंती इर्शाळगडची

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी मंगळवार, 25/10/2016 00:34 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी एक्सप्रेस हायवेवरून पुण्याहून मुंबईला जाताना अनेक गडकिल्ले दिसत राहतात. पहिला टोलनाका पार केला कि डावीकडे धीर गंभीर लोहगड विसापूर उभे असतात तर जरा दूरवर तुंग मान उंचावून बघत असतो.उजवीकडे राजमाचीच्या तुंगारली धरणाजवळचे टॉवर दिसतात. खण्डाळ्याला नागफणी हात हलवून दाखवतो.

पधारो म्हारे देस : मुंबई – उदयपूर – जयपूर – मुंबई - 3

लेखक ज्याक ऑफ ऑल यांनी सोमवार, 24/10/2016 23:22 या दिवशी प्रकाशित केले.
पधारो म्हारे देस : मुंबई – उदयपूर – जयपूर – मुंबई - 1 पधारो म्हारे देस : मुंबई – उदयपूर – जयपूर – मुंबई - 2
इथून पुढे आमचा प्रवास होणार होता तो राजस्थानच्या एका अत्यंत तेजस्वी इतिहासाच्या दिशेने. रक्त तलाई – हलदीघाटी – आणि चेतक स्मारक
आणि आम्ही आता हलदीघाटी च्या दिशेने जात होतो. मनात खूप खळबळ , बेचैनी दाटून आली होती. कसा होता तो वीर पुत्र , वीर पिता , वीर लढवैया कसा होता एक राणा – “महाराणा”. खरंच ...

प्रिती

लेखक सोहम कामत यांनी सोमवार, 24/10/2016 15:30 या दिवशी प्रकाशित केले.
अंधार्या राती, तुझा हात हाती, निर्मळ ही प्रिती, तुजवरी.. फुलासंगे फुलशी, वार्यासंगे झुलशी, कळीसंगे खुलशी, स्वप्नपरी.. माझा प्रत्येक श्वास, धरुनी तुझाच ध्यास, करितो हृदयी प्रवास, घेउनी गती.. तुच माझी दिशा, माझी वेडी आशा, माझ्या प्रेमाची भाषा, माझी प्रिती....

पातळ पोह्यांचा चिवडा

लेखक इशा१२३ यांनी सोमवार, 24/10/2016 11:53 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य: पातळ पोहे १/२ किलो शेंगदाणे भाजलेल (हवे तेवढे) पंढरपुरी डाळ :एक वाटी खोबरे काप :आवडीनुसार (वाटीभर पुरे) काजु पाकळ्या :आवडीनुसार कढिपत्ता :एक वाटी मिरचीचे तुकडे :चविनुसार तिळ :चार चमचे मीठ, पिठीसाखर फोडणीसाठी तेल,मोहरी,जिरे,हिंग,हळद Sahity कृती: पातळ पोह्यांचा चिवडा तसा सोपा पण बरेचदा करताना पोहे आकसतात आणि चिवड्याच रुप बिघडत.यासाठी पातळ पोहे शक्यतो चाळून,उन्हात ठेऊन कुरकुरीत करुन घ्यावे.

मक्केतील उठाव ६

लेखक हुप्प्या यांनी सोमवार, 24/10/2016 09:10 या दिवशी प्रकाशित केले.
आधीचा भाग ५ जॉर्डनचा राजा हुसेन सौदी राजाला भेटायला आला. त्याला आपले सैनिक पाठवून मक्केतील बंडखोरांचा निकाल लावण्याची खूप इच्छा होती. सौदी राजाने आदरातिथ्य, आगतस्वागत व्यवस्थित केले. पण जेव्हा मक्केचा विषय आला तेव्हा स्पष्ट सांगितले की तुमची मदत घेणे आम्हाला परवडणार नाही. किंग हुसेनचा आजोबा हा मक्केचा सेनापती (शेरीफ ) होता. तो हाशमी टोळीचा. ऑटोमन साम्राज्य अरेबियावर राज्य करत असताना त्यांच्याकडे त्या भागाची जबाबदारी होती. नंतर सौदी सैन्याने त्यांचा १९२४ साली पराभव करून त्यांना जॉर्डनला हाकलले.

सवाल...

लेखक राजेंद्र देवी यांनी सोमवार, 24/10/2016 08:58 या दिवशी प्रकाशित केले.
सवाल लालचुटुक ओठ तिचे मऊसूत गाल पापण्यांआड दडलेले डोळे तिचे कमाल नजरेत तिच्या तलवार अन नजरेतच ढाल तिरपा एक कटाक्ष होतो मी हलाल गाली गुलाब फुलतो उधळीत सुगंधी गुलाल कुरळ्या केसात फिरतो कर करी शांतता बहाल रोज झोपतो मी हि ओढून स्वप्नाची शाल सत्यात कधी उतरेल हाच नशिबाला सवाल राजेंद्र देवी

तीर्थरुपांच्या काही आठवणी!

लेखक आदित्य कोरडे यांनी रविवार, 23/10/2016 21:35 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे देशपांडे बोलायला फार खडूस होते. खरं तर आई जास्त तिरकस बोलायची पण देशपांडे कधी हि भीड न ठेवता समोरच्याला काय वाटेल याचा विचार न करता बोलत , आई तस करत नसे आणि कधी बोललीच तर ज्याला उद्देशून ती बोलली आहे त्याला हि त्यातली खोच पटकन लक्षात येत नसे आणि त्याला लगेच प्रत्युत्तर देणे तर अजिबात जमत नसे. पण दोघाही समोरच्याचा किमान शब्दात कमाल पाणउतारा करत. माझ्या आत्याशी देशपांड्यांच अजिबात जमत नसे. मला आठवत कि एकदा ती घरी आलेली असताना पुरणाच्या पोळ्या केल्या होत्या आणि मला आवडायच म्हणून नुसत वाटलेलं पुरण वेगळ काढून ठेवलं होतं. मी ते अगदी पुरवून पुरवून २-३ दिवस खात असे.