Skip to main content

एक अधिक एक...

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 05/07/2017 19:24 या दिवशी प्रकाशित केले.
एक अधिक एक=दोन! डायल केल्यावर लागलाच्च पाहिजे फोन! नेटवर्क बिझी असू शकतं. रेंज नसू शकते. कदाचित स्वीच अॉफ असू शकतो समोरच्याचा फोन! या वास्तविक शक्यता ग्रुहीत धरणार कोण? .. छे! छे! लागलाच्च पाहिजे फोन. कारण,एक अधिक एक=दोन! गणितात आयुष्य पहायचं. पण आयुष्याचं गणित शिकायचं नाही! पहिल्या एक आणी दुसय्रा एकच्या किं~मती मधली तफावत..मूल्यांचं वेगळेपण? त्यांचं मूळ १ असणं,नसणं? त्यांची भूक तहान तर अमान्य, अस्विकार्यच! कारण एक अधिक एक=दोन! यापेक्षा वेगळी जीवननिष्ठा कोण??? ह्हूं!!! लागलाच्च पाहिजे फोन! कारण,एक अधिक एक=दोन! एक अधिक एक=पाच! एक अधिक एक=दहा! कधी कधी मायनस दहा देखील!

बाफळीची भाजी

लेखक प्राची अश्विनी यांनी बुधवार, 05/07/2017 18:44 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाच्या सुरवातीला मिळणारी ही अजून एक रानभाजी. या दिवसात जांभळी नाक्यावर अशा अनेक भाज्या विकायला आलेल्या असतात. लालसर देठ आणि त्याच्या टोकाला कात्र्या कात्र्याची हिरवीगार पाने म्हणजे बाफळी. बाफळीची भाजी वातहारक असते. आमच्याकडे काम करणाया मावशी सांगतात त्याप्रमाणे याच्या बियांपासून तेल बनवतात.

बाप हा ताप नसतो, पोरा

लेखक सिद्धेश्वर विलास पाटणकर यांनी बुधवार, 05/07/2017 14:56 या दिवशी प्रकाशित केले.
बाप हा ताप नसतो, पोरा आईचा पदर पकडून चाललास खूप खूप मोठा झालास विसरलास लेका बापाला आता उगा करतोयस तोरा II घास जरी आईने दिला तरी घासत तो बापच होता त्या तुमच्या पोटासाठी इतरांसमोर वाकत होता त्याच्या वाकण्याने तुला कणा दिला मान मरातब मिळाला अन तू लेका सर्व विसरला II दुध नाही पाजले पोटात नाही वाढवले पण ते दिवस मोजणारा तोच होता तुझ्या आगमनाने आनंदाश्रू गाळणाराहि तोच होता तुला रडताना बघून तळमळणारा पण तोच होता II आरं त्यो जर रडला असता तर तू कसा रं वाढला असता तुमहाला वाढताना बघून तो मात्र जगासमोर कायम वाकत होता तो ताप नव्हता तो तुझा बाप होता , फक्त तुझ

विठोबा

लेखक पिशी अबोली यांनी बुधवार, 05/07/2017 12:20 या दिवशी प्रकाशित केले.
विटेवरून उतरून तो आभाळ भरून वाहतो, माझा सावळा-सुंदर माझ्या एवढ्या जवळ राहतो ... शब्द शब्द श्यामवर्ण, अर्थरंग ल्याला, लिहिता काही अक्षर, विठू भेटी आला .... आषाढीची भक्ती जग खाई दूध तुपाशी रात्रभरला माझा विठू चांदण्याला उपाशी
काव्यरस

खोटी नाणी

लेखक हेमंतकुमार यांनी बुधवार, 05/07/2017 07:27 या दिवशी प्रकाशित केले.
ही मैत्री, प्रीती, ही तर खोटी नाणी बाजार भरविती गाऊन त्यांची गाणी मित्रहो, या आहेत रॉय किणीकरांच्या एका कवितेतील दोन ओळी. यांनी माझ्या मनात कायमचे घर केलेले आहे. ते म्हणतात ते अगदी खरे आहे. मैत्री व प्रीती या दोन्ही प्रांतांमध्ये असंख्य खोटी नाणी कायम खुळखुळत असतात. माझ्या काही परिचितांना त्यांच्या आयुष्यात अशा खोट्या नाण्यांचे चांगलेच अनुभव आले. त्यांनी ते मला सांगितले. मला ते भावले.

रावेरखेडी ३

लेखक अमरेंद्र बाहुबली यांनी बुधवार, 05/07/2017 01:03 या दिवशी प्रकाशित केले.
गुगल मँप्स वर रस्ता . आम्ही लवकरच सनावद ला पोहोचलो. तेथे बेडीया चा रस्ता विचारून बेडीयाच्या दिशेने गाडी निघाली. रस्ता नविनच बनवला गेला होता. आम्ही दर ५कि.मी ला कुणाला ना कुणाला रस्ता विचारत होतो. माझा अंदाज होता की समाधी बहुतेक लोकांना माहीत नसेल. पण आम्ही ज्याला कोणाला विचारले त्याने प्रत्येकाने "पेशवा सरकार" बद्दल व्यवस्थीत माहिती पुरवली. बेडीया हुन आम्ही पीपलगोन रोड ला लागलो. २०चे ४० किमी झाले तरी समाधी येईना म्हणून चालक थोडा वैतागला होता. पण काही की.मी जाताच आम्हाला म.प्र. सरकारचा हा मोठा फलक दिसला.

शामभट्टाची युरोपवारी .. इटली, स्वीस, फ्रान्स ... लेखांक ६

लेखक चौकटराजा यांनी मंगळवार, 04/07/2017 16:38 या दिवशी प्रकाशित केले.
दिवस ६ कॅम्पो दि मार्ट स्थानकाच्या पुलावर उभा होतो . रात्रीचे ( संध्यासमयीचे ?) पावणेनऊ वाजले होते व सूर्य पश्चिम क्षितीजावर अस्तास नुकताच गेलेला. रोम वरून व्हेनिसला जाणारी रात्रीची ट्रेन आम्हाला याच स्थानकावर चक्क पावणे दोन ला पकडायची होती. हवेत चांगलाच गारठा. इतका वेळ काढायचा तरी कसा प्रश्नच होता.येणार्‍या जाणार्‍या ट्रेन्स ची आवक जावक पहात वेळ घालविला मग.बरोबर वेळेवर ट्रेन आली. स्थानापन्न झाल्यावर डोळा लागला. युरोपात जे मिपाकर ट्रेन मधे बसले असतील त्याना तिच्या शांतपणाचे कवतिक खरेच अनुभवता आले असेल. रूळ कधी मी बदलले हे गाडी तुम्हाला बिलकूल क़ळून देणार नाही.

II मी प्रेमपुरीचा विठ्ठल II

लेखक सिद्धेश्वर विलास पाटणकर यांनी मंगळवार, 04/07/2017 15:44 या दिवशी प्रकाशित केले.
मी प्रेमपुरीचा विठ्ठल माझी वेगळीच रखमाई तुझं जमणार नाही माझयासंगं का करते उगा तू घाई ? II तू सुखी राहा तुझी बाई लांबच बरी तू वाटते उगा तंगड्या घालू नको मधी सात जन्मात मिळायचो नाही II माझी येगळीच तर्हा तिऱ्हेवाईक मी येगळा रखमा शिवराळ असली तरी तिच्यासंगेचं मी बरा II मला ठावं तुझे डाव नको तिथे डोकं लाव भोळा ढंगाने जरी मी नको मला आजमाव II आत आवाज मज येई तुझया नाटकी शाळेचा नेहेमी दुर्लक्ष करितो धन्य माझी ती रखमाई II सिद्धेश्वर विलास पाटणकर C

..तिथे ती भेटते

लेखक अनन्त्_यात्री यांनी मंगळवार, 04/07/2017 15:42 या दिवशी प्रकाशित केले.
ढगाच्या आतले विजेचे वेटोळे सुटून मोकळे डोंगरा डसते...तिथे ती भेटते निबिड रानात पोपटी पानात झुकून बघत मोतिया थेंबात ...किणकिण हासते भणाण वाऱ्यात लाटेच्या गाजेत चांदीच्या वर्खात किनारा कोरत ... माझ्याशी बोलते
काव्यरस

II हात सोड कटेवरचे , उचल बडव्यांशी लढावया II

लेखक सिद्धेश्वर विलास पाटणकर यांनी मंगळवार, 04/07/2017 15:07 या दिवशी प्रकाशित केले.
भ्रम कैवल्याचा साधला भक्ती नामातच तू बांधला कुणी पहिला रे तुला दगडामध्येच अडकला खांब सोनेरी रुपेरी तरी उभा विटेवरी बडवे मातले ते सारे उगा भक्तांसी छळे ऱे दावुनी कोरी नोट त्यांसी उभे माउली दर्शनासी बनवून माऊलीस दासी बडवे राजभोग भोगती तुझा दरबार पातला, दुर्लभ भक्त दर्शनासी स्वतः समजून ते राजे शिवीगाळ गाभारा माजे कैसी शिस्त नाही जाण कोऱ्या नोटेस फक्त मान तुझ्या दरबारी विठुराया फक्त लक्षुमीची छाया हात सोड कटेवरचे उचल बडव्यांशी लढावया सिद्धेश्वर विलास पाटणकर C