Skip to main content

टाईमलाईन---- हिंदू ते निधर्मी होण्याची!

लेखक टर्बोचार्जड फिलॉसॉफर यांनी रविवार, 16/07/2017 21:10 या दिवशी प्रकाशित केले.
बाल्यावस्था( वय १० ते १३)------ धर्म .....प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय.जगात म्हणे १०० पेक्षा जास्त धर्म आहेत.

शिवसेना भवितव्य ?

लेखक वाल्मिकी यांनी रविवार, 16/07/2017 20:01 या दिवशी प्रकाशित केले.
तसा विजू भाऊंचा धागा असला तरी माझे प्रश्न वेगळे आहेत १) सत्तेत असून पण विरोधकांची भूमिका मतदार लोकांना पटणार नाही ,ह्याचा पुढच्या निवडणुनीत परिणाम होऊ शकतो ? २) भाजप मध्ये पण घोटाळे झाले जसे चिक्की घोटाळा ,व्यापम ,ह्यावेळी शिवसेना गप्प होती का ? ३) विखे पाटील ह्यांना शिवसेनेने मंत्री केले होते तर का बिनसले व नुकत्याच घुमजाव प्रकरणाचं सेना भांडवल का नाही करत ? ४) लोक आता केजरीवाल शी तुलना करत आहेत हे बरे वाटतेय का ? ५) शिवसेने ने ३ वर्षात सत्तेत राहून काय केले ?

...नवल!

लेखक सत्यजित... यांनी रविवार, 16/07/2017 16:33 या दिवशी प्रकाशित केले.
नजर टाळणे..पण पहाणे..नवल! तुझे लाजणे अन् बहाणे..नवल! मला जाग आली सुगंधी किती! तुझे अत्तराचे नहाणे...नवल! जुनी वाट हरवून गेली तरी तुझे रोज येणे नि जाणे..नवल!

सुरती लोचो/चाट

लेखक दिपक.कुवेत यांनी रविवार, 16/07/2017 14:44 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, मागे सुरती लोचो ची पाकृ टाकली आणि सर्वरचाच लोच्या झाला की राव!!! तेव्हापासून पाकृ टाकायला जरा बिचकतच होतो. पण आता सुरवात म्हणून हिच पाकृ परत टंकत आहे ती गोड मानून घ्यावी. लवकरच नविन पाकृहि पेश करीन. सुरती लोचो.... गुजराथ चे फास्ट फूड, स्ट्रीट फुड. बेसन हा मुख्य घटक. तसं बघायला गेलं तर हा ढोकळ्याचाच भाउबंद पण ढोकळ्याचे जसे साचेबद्ध तुकडे असतात तसं ह्या लोच्याचं नसतं.

ये कश्मीर है - दिवस आठवा - १६ मे

लेखक एक_वात्रट यांनी रविवार, 16/07/2017 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
आजचा आमचा दिवस खरं म्हटलं तर एक राखीव दिवस होता. काश्मीर खो-यात परिस्थिती कधीही स्फोटक होऊ शकते हे माहित असल्याने मी मुद्दामच आमच्या वेळापत्रकात हा एक जास्तीचा दिवस ठेवला होता. खास असे काहीच आज आम्हाला करायचे नव्हते. येथून ९० किमी दूर असलेले श्रीनगर गाठणे आणि तिथे जाताना लागणारे अवंतिपूरचे मंदिर पाहणे एवढेच आजचे आमचे किरकोळ लक्ष्य होते. तेव्हा आम्ही उशीरापर्यंत लोळत पडण्याचा आनंद अनुभवला आणि सगळे आवरून हॉटेलात नाश्ता करून आरामात निघालो. पेहेलगामवरून श्रीनगरकडे जाणा-या रस्त्याच्या दुतर्फा सफरचंदाच्या बागा आहेत.

पुस्तक

लेखक शिव कन्या यांनी रविवार, 16/07/2017 06:23 या दिवशी प्रकाशित केले.
ते पुस्तकच आहे. दूर तुझ्या घरात ठेवलेलं काचेआड. एकदा तू वाचलेलं. तू तिथं नसताना मी वाचलेलं. तिसरं कुणीही ते वाचलेलं नाही. एकदा तू, नंतर मी. कथा तुझ्या डोळ्यांनी वाचली मी तुझे डोळे वाचले. ते पुस्तकच आहे? अजूनही? दूर तुझ्या घरात ठेवलेलं काचेआड... -शिवकन्या

बाबा उवाच.... कोहणहकहर .... आस्तिक की नास्तिक (उर्फ आमच्या भाषेत...पुणेकर की अपुणेकर)

लेखक मुक्त विहारि यांनी रविवार, 16/07/2017 01:27 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे मोठे चिरंजीव कागदोपत्री इंजिनियर झाले (कागदोपत्री बरेच काही होता येते पण .....कागदोपत्री बरेच काही होणे, ह ह्या धाग्याचा विषय नाही....) म्हणून आमच्या बाबांकडे गेलो.शनिवार असल्याने बाबांच्या मठात बरीच गर्दी होती,त्यात चिलिमवाले बाबा, कटोरीवाले बाबा, खापरवाले बाबा आणि जपमाळ वाले बाबा पण होतेच. आज बाबांच्या मठांत इतकी गर्दी पाहून मी जरा हबकलोच.पण मी पाय पळता पाय काढण्यापूर्वीच बाबांची नजर आमच्याकडे वळाली आणि बाबा म्हणाले..... बाबा : या मुवि.काय काम काढलेत? तसे तुम्ही आजकाल कामाशिवाय आमच्याकडे पण येत नाही.आज मूद्दाम का आलात? आम्ही : तसे काही विशेष नाही.आपल्या कृपेने मुलगा इंजिनियर झाला.

सिक्कीम भारतात सामील झाला कसा ?

लेखक आदित्य कोरडे यांनी रविवार, 16/07/2017 00:43 या दिवशी प्रकाशित केले.
सिक्कीम भारतात सामील झाला कसा ? (संदर्भ:इंदिरा गांधी, आणीबाणी आणि भारतीय लोकशाही – लेखक पी. एन. धर, अनुवाद- अशोक जैन) गेले काही दिवस भारत आणि चीन मधले संबंध परत ताणले गेले आहेत. दोन्ही देशात परत एखाद्या युद्धाला सुरुवात होते कि काय अशी अवस्था निर्माण झाली. आता काय होणार हे तर कालच ठरवेल परंतु ह्यावेळच्या कात्कातीचे कारण ठरला तो सिक्कीम-आपल्या सिक्कीम राज्याच्या सीमेलगत असलेला डोकाला ( ला म्हणजे खिंड)ह्या भागात चीन ने घुसखोरी करत सुरु केलेले रस्त्याचे बांधकाम आणि भारताने घेतलेला आक्षेप.साधारण गेले महिनाभर भारत आणि चीनी सैन्यात ह्यावरून तणाव आहे .

विश्वामित्र- क्षत्रिय ते ब्राह्मण

लेखक शरद यांनी शनिवार, 15/07/2017 18:07 या दिवशी प्रकाशित केले.
विश्वामित्र- क्षत्रिय ते ब्राह्मण श्री. माहितगार यांच्या एका धाग्यात विश्वामित्राचा उल्लेख आला होता. याची कथा सगळ्यांना माहीत असेलच असे नाही. मनोरंजक आहे. प्राचिन काळी वर्ण बदलता येत होते याची ही कहांणी. गोष्ट विश्वामित्राच्या आधीच्या पिढीपासून सुरू होते. ऋचीक हा विद्वान ब्रह्मर्षी त्याचे लग्न गाधी या क्षत्रिय राजाची मुलगी सत्यवती हिच्याशी झाले. पतिपरायण सत्यवतीवर प्रसन्न होवून ऋचीकाने तिला वर मागावयास सांगितले. ही गोष्ट सत्यवतीने आपल्या आईला सांगितली. आई म्हणाली ’तुझे पती महान तपस्वी व समर्थ आहेत.

गायीचे आत्मवृत्त

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी शनिवार, 15/07/2017 17:20 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे मी गाय आहे. माझ्यात देव वास्तव्य करत असल्यामुळे मला माणसाचं प्रबोधन करायचा हक्क आहे. म्हणून तर आता बोलायची हिंमत करते: मला माणसापेक्षा जास्त किंमत आहे. राजस्थानात गाय आणि वासरूच्या जोडीला एकशे पाच रूपये अनुदान मिळतं तर दारिद्र्य रेषेखाली असलेल्या माणसांच्या जोडप्याला सत्तर रूपये मिळतात. वि. दा.