Skip to main content

'भटकंतीचा एक उनाड दिवस, पण कुटुंबासोबत'!!!

लेखक दिलीप वाटवे यांनी बुधवार, 24/01/2018 15:48 या दिवशी प्रकाशित केले.
'भटकंतीचा एक उनाड दिवस, पण कुटुंबासोबत'!!! आपण भटके पाहिजे तसं भटकु शकतो ते केवळ घरून मिळणार्‍या पाठींब्यामुळेच, खरं म्हणजे या गोष्टीला कुणाही भटक्याचा आक्षेप नसावा. पण असा पाठींबा मिळवण्यासाठी प्रत्येकाला त्यासाठी काहीना काहीतरी कष्ट घ्यावेच लागतात. मग घरच्यांना घेऊन हॉटेलींग, पिक्चर पाहणे असो किंवा घरची कामं, सासुरवाडीतील कार्यक्रम, मुलांचा अभ्यास घेणे असो. अर्थात माझ्यापेक्षा अनुभवी मंडळी मी सांगितलेल्या पर्यायात नक्की भर घालू शकतील यात काही शंकाच नाही. त्यातल्या त्यात लग्न झालेल्यांना तर त्यासाठी फार मोठं प्लॅनिंग करावं लागतं.

(खमकेच टगे बसतात इथे)

लेखक दमामि यांनी बुधवार, 24/01/2018 10:59 या दिवशी प्रकाशित केले.
ग्लास पुन्हा फुटतात इथे मित्र जुने दिसतात इथे अवघे जगणे पीणे बनते दु:खे सगळी पळतात इथे चखणे स्मरता हसणे स्फुरते चवदार चणे मिळतात इथे हुक्के जळता चढती वलये खमकेच टगे बसतात इथे चषकात पुन्हा मदिरा भरता इमले पोकळ चढतात इथे विरहास नवे सहवास हवे प्रेमं जुनी स्मरतात इथे कलह घरचे विसरू म्हणता विवाद नवे उठतात इथे (कुणीसं म्हटलंय, वृत्त बघू नये, वृत्ती बघावी. म्हणून विकु माफी असावी.)

थंडी गॉन… घाम ऑन!!!

लेखक आदिजोशी यांनी मंगळवार, 23/01/2018 14:15 या दिवशी प्रकाशित केले.
चातक जितक्या आतुरतेने पावसाच्या पहिल्या थेंबाची वाट बघतो त्यापेक्षा आतुरतेने आम्ही त्या घामाच्या पहिल्या थेंबाची वाट पाहत होतो. मागचे काही दिवस मुंबईचं हवामान पार म्हणजे पारच बिघडलं होतं. थंडीच्या मोसमात मुंबईत चक्क थंडी? हा काय आचरटपणा आहे? मुंबईकरांना थंडी हवी असती तर आम्ही सिमल्याला नसतो गेलो? लोकल ट्रेन, टॅक्सी, बेस्टची बस, सी लिंक, गिरगाव चौपाटी, शिवाजी पार्क, धारावी, बॉलिवूड, वडा पाव ह्यांच्याप्रमाणेच 'घाम' ही मुंबईची ओळख आहे. घामट्टपणा ही मुंबईकरांची आवडती अवस्था आहे. मुंबईची हवा म्हणजे तर बोलायलाच नको. जाज्वल्य अभिमान एटसेट्रा नाही पण मुंबईत येतो तसा घाम जगात कुठेही येत नाही.

शनिवारवाडा कट्टा - २७ जानेवारी दुपारी ४ वाजता

लेखक श्रीरंग_जोशी यांनी मंगळवार, 23/01/2018 11:45 या दिवशी प्रकाशित केले.
यापूर्वी २२ जून २०१४ रोजी मी प्रथमच मिपा कट्ट्याला उपस्थित राहिलो. त्या कट्ट्याच्या गोड आठवणी अजूनही ताज्या आहेत.

नवखेच सखे फसतात इथे

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 23/01/2018 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
वृत्त - तोटक अदमास पुन्हा चुकतात इथे वनवास नवे मिळतात इथे अवघे जगणे जगणे बनते मिथके सगळी जुळतात इथे रुसणे स्मरता हसणे स्फुरते अलवार सुखे कळतात इथे वळणे कळता सरती वलये नवखेच सखे फसतात इथे हलकेच पुन्हा जवळीक नवी सुमने कवळी फुलतात इथे विरहास नवे सहवास हवे हळवे क्षण ते स्मरतात इथे भुतकाळ जरा विसरू म्हणता इतिहास नवे रचतात इथे © विशाल वि. कुलकर्णी
काव्यरस