मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(खमकेच टगे बसतात इथे)

दमामि · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
ग्लास पुन्हा फुटतात इथे मित्र जुने दिसतात इथे अवघे जगणे पीणे बनते दु:खे सगळी पळतात इथे चखणे स्मरता हसणे स्फुरते चवदार चणे मिळतात इथे हुक्के जळता चढती वलये खमकेच टगे बसतात इथे चषकात पुन्हा मदिरा भरता इमले पोकळ चढतात इथे विरहास नवे सहवास हवे प्रेमं जुनी स्मरतात इथे कलह घरचे विसरू म्हणता विवाद नवे उठतात इथे (कुणीसं म्हटलंय, वृत्त बघू नये, वृत्ती बघावी. म्हणून विकु माफी असावी.)

वाचने 5721 वाचनखूण प्रतिक्रिया 20

नाखु 25/01/2018 - 22:48
अत्यंत चपखल "वाण" दिलं आहे काटेरी हळवा ई प्रेक्षक नाखु

अजया 26/01/2018 - 10:20
रतीबाच्या कविता!