Skip to main content

रामानुजम आणि रेमन झीटा

लेखक साहना यांनी शुक्रवार, 20/04/2018 10:07 या दिवशी प्रकाशित केले.
१ + २ + ३ + ४ + ५ + ६ ....... = -१/१२ समजा वरील समीकरण कुणी तुम्हाला दाखवले तर तुम्हाला काय वाटेल ? कि ह्या माणसाला गणित अजिबात येत नाही. सर्व पॉसिटीव्ह अंकाची बेरीज निगेटिव्ह कशी असू शकते ? पण गणिताचे मूलभूत सिद्धांत ज्यांना चांगले समजतात त्यांनी जर वरील समीकरणाला पहिले तर कदाचित त्यांना त्यांत थोडे तथ्य दिसू शकते. रामानुजम ह्यांनी हार्डीना जे पात्र पाठविले त्यात हे समीकरण होते. हार्डी ह्यांनी रामानुजमची प्रतिभा ओळखून त्यांना लंडन ला बोलावले. भारताच्या गुलामगिरीच्या काळांत जे काही थोडे चांगले साहेब होते त्यांत हार्डीचा नंबर फार वरचा आहे.

प्रदूषण (२7)- एक मुलाकात धुळीच्या आंधी सोबत

लेखक विवेकपटाईत यांनी गुरुवार, 19/04/2018 19:25 या दिवशी प्रकाशित केले.
अप्रैल महिन्याच्या दुसर्या पंधरवड्यात दिल्लीत उन्हाची प्रखरता जाणवू लागते. दिवसाचे तापमान ४० अंशाच्या वर जाते. त्या सोबत दक्षिण पश्चिम दिशेहून येणारे उष्ण वारे हि दिल्लीत येऊन धडकतात. उष्ण वार्यांसोबत राजस्थानची रेत हि दिल्लीत पोहचते. पूर्वी हि धूळ लाल-पिवळी दिसायची. पण आता काळपट दिसते. दिल्लीत लाखो वाहने आणि फैक्ट्र्या रोज आकाशात धूर सोडतात. धुरावाटे नायट्रोजन, सल्फर, कार्बन यांसह घातक रासायनिक पदार्थ हवेत मिसळतात. प्रदूषित पदार्थांचे हि बारीक कण हि या धुरासोबत आकाशात पोहचतात. धुळीच्या आंधी सोबत हे सर्व प्रदूषण घरा-घरात पोहचते.

द टाईमब्रिज अर्थात कालसेतू – ४

लेखक सस्नेह यांनी गुरुवार, 19/04/2018 12:24 या दिवशी प्रकाशित केले.

पूर्वसूत्र :

अखेरीस दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजता त्याचे ते यंत्र किंवा उपकरण सेटिंग करून तयार झाले आणि आमची तयारी पूर्ण झाली. पद्या मला खोलीत घेऊन गेला तेव्हा सायन्स फिक्शन चित्रपटात दाखवतात तसले टाईम मशीन छाप यंत्र बघायला मिळेल असे मला जरी वाटत नव्हते,  तरी टेबलवर ठेवलेल्या त्या छोट्याशा वस्तूची  मी खासच अपेक्षा केली नव्हती !

 

भाग ४

" चिकणा आणि कुंभेनळी घाट "

लेखक दिलीप वाटवे यांनी बुधवार, 18/04/2018 22:50 या दिवशी प्रकाशित केले.

'चिकणा आणि कुंभेनळी घाट'

गेल्या सहा महिन्यात आमच्या आजोबा परिसरात असलेल्या बहुतेक सर्व घाटवाटा धुंडाळुन झाल्या होत्या. यात 'चिकणदरा' आणि 'कळमंजाचा दरा' या दोन शोधमोहिमांचा देखील समावेश होता. हे इथे मुद्दाम नमूद करण्याचं कारण असं की, एकंदरीत घाटवाटा हे प्रकरण ट्रेकींग क्षेत्रात अतिशय अवघड मानलं जातं. सोबत ट्रेकींग करत असलेल्या बहुतेक जणांना वरचेवर घाटवाटांचे ट्रेक्स केल्यामुळं आपोआपच अशा अनवट, अवघड आणि नवीन घाटवाटा धुंडाळण्याची आवड निर्माण झाली आणि त्यामुळे आमच्या एकूण गणसंख्येत हळूहळू वाढच होत गेली. आम्ही फिरलेल्या आजोबा परिसरातील बहुतेक सर्व वाटा नाळेतुनच होत्या.

निनावी कल्लोळ

लेखक नाखु यांनी बुधवार, 18/04/2018 18:56 या दिवशी प्रकाशित केले.
जेटयुगाचे बडवा ढोल,बडवा ढोल !! निषेधाचाच डब्बा गोल ,डब्बा गोल!! कर्म अंधारी, वासना विखारी !! (अ)धर्म तुतारी ,क्लांत शिसारी !!! टाळाटाळ सरळसोट , टाळाटाळ सरळसोट!! आपलेच दात आपलेच ओठ !!! जालपिपाणी टिवटिव गाणी !! विदेशी विद्वेषी वणवण,तर्कशुध्दि सदैव चणचण !!! भुक्कड दक्षक भणंग रक्षक !! दुर्बलांची ऐशीतैशी !! मुजोरांप्रती प्रीतखाशी!! विफल अरण्यरुदन ,विदीर्ण मूक पीडन !! गाये हरफनमौला ,गाये हरफनमौला !! तन सुंदर धवल ,पर मन (रहे) सदा मैला!! आडवाटेला थांबलेला वाचक नाखु

वैशाख वणवा

लेखक हेमंत ववले यांनी बुधवार, 18/04/2018 17:51 या दिवशी प्रकाशित केले.
निसर्ग नावाचे काहीतरी आहे, याचे भान आम्हाला फक्त फेसबुकवर फोटो पोस्ट करताना, शनिवार रविवारी फिरायला जाताना, फोटो लाईक करतानाच होत असते.

जोहार परकीयासी फितुरांचा जोहार __/|__

लेखक माहितगार यांनी बुधवार, 18/04/2018 17:06 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेर्ना हे आणि असेच असम्ख्य आपलेच भारत द्वेष्ट्यांची प्रार्थना जोहार परकीयासी फितुरांचा जोहार । किती ग्वाडगे सकळ मराठीच्या पाठीवर प्रहार । सहनशील दृढ आचार । तो ऎका की जी मायबाप ॥१॥ तुमचा इचार मेकॉले देइला । तो भारतीया कसा भावला । परका जवळी, भावंड वेगळा । या विचारें बोधिलें की जी मायबाप ॥२॥ अरबी अन चिनी । सर्वांमाजीं विंग्रजी। आणिकही फुरोगामीटिचर सांगेन । सावध ऎका की जी मायबाप ॥३॥ पंचमहासत्ता र्शेजी केले शत्रु श्रेष्ठजाण । या विचारें पावलें समाधान । फितुरी परदास्य सुखसंपन्न । झाले की जी मायाबाप ॥ ऎशा देश फुको चालावे । देशीय प

केळीचे सुकले बाग ....

लेखक विशाल कुलकर्णी यांनी बुधवार, 18/04/2018 13:45 या दिवशी प्रकाशित केले.
मानवी आयुष्य हे अनेक चढ-उतारांनी भरलेले आहे. सुख-दुःख, आनंद-वेदना, उन्हाळा पावसाळ्याची अविरत आन्दोलने अनुभवत याची सतत वाटचाल चालू असते. म्हणूनच इथे संतुलनाचे मोल अतिशय महत्वाचे आहे. येणारा प्रत्येक सूर्य हा आनंदच घेवून येईल असे नाही, त्याला वेदनेची, दुःखाची किनारसुद्धा असु शकते. एखादी संध्याकाळ अतिशय मन प्रसन्न करुन टाकणारी असते. पण खुपदा एखादी शांत, निःशब्द संध्याकाळ काही वेगळाच् मुड घेवून येते. उगाचच खिन्नतेचा, उदासीचा परिवेष परिधान करुन येते. मग नाहकच मन जुन्या, भूतकालीन आठवणीत रेंगाळायला लागते.

हळूहळू साऱ्यांनीच प्रेमाचं दुकान मांडून टाकलं

लेखक खिलजि यांनी बुधवार, 18/04/2018 12:00 या दिवशी प्रकाशित केले.
तिच्या आवडीनिवडीसाठीच मी मैत्रीलाच गहाण ठेवलं ते बोलावयाचे नेहेमी मजला यायला सांगायचे नाक्यावर एकही धड वाटत नव्हता तिला एकेकाचं हळूहळू शिरकाण करून टाकलं शिकाऱ्यावानी माग काढत होती माझा नजरेत असावं म्हणून समोरच मचाण बांधून टाकलं त्यांना खबर पोहोचताच याची सुटकेसाठी त्यांनी जीवाचं रान करून टाकलं लग्नाआधीच तिच्याविरुद्ध माझं कान भरून टाकलं चंडी रूप धारण करून मग तिनं सर्वांचंच पायताण करून टाकलं प्रत्येक चीअर्सबरोबर एकेक थेम्ब सर्वानी ओवाळून टाकला अश्या मित्रापेक्षा सर्वाना वेटरच बरा वाटला नशेत साऱ्यांनी फोन करून शिव्यांचं दान वाटलं उमजता मज मेख सारी सालं प्रेमाचं

उपकार इंग्रजांचे

लेखक आशु जोग यांनी बुधवार, 18/04/2018 10:11 या दिवशी प्रकाशित केले.
इंग्रजांनी या देशाला गुलाम केले. ही गोष्ट खरी असली तरीसुद्धा इंग्रजांनी काही चांगल्या, वरदान म्हणाव्यात अशा गोष्टी भारताला दिल्या. त्यातली एक म्हणजे इंग्रजी भाषा. इंग्रजी भाषेमुळे आपल्याला जगाचे दरवाजे खुले झाले. इंग्रज या देशातून जाऊन आता 70 वर्षे झाली पण त्यांची इंग्रजी भाषा आणि तिची उपयुक्तता मात्र आम्ही विसरलेलो नाही.