Skip to main content

मीनाकुमारी की बेटी? भाग २

लेखक शशिकांत ओक यांनी शुक्रवार, 20/03/2020 00:00 या दिवशी प्रकाशित केले.

मीनाकुमारी की बेटी?

 1 भाग २ व्हिडीओ क्लिप पाहून अनेकांनी विचारणा केल्या की सध्या ती कुठे आहे? काय करते? चमन जीवित आहेत का? डी एन ए टेस्ट केली का? वगैरे... काहींना खरे आहे याची खात्री झाली... काहींनी सगळे ढोंग आहे असे काही नव्हते असे म्हटले … प्रत्येकाची आपापली मते… फेब्रुवारी २०२०मधे … अमीर हुसेन चमन कराचीत असतात. त्यांना त्यांच्या मुलीने अमेरिकेतून पाहून ही क्लिप लिंक दिली.

उंटावरल्या प्रा.डॉ. दा.ता.

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 19/03/2020 13:21 या दिवशी प्रकाशित केले.
प्रा.= प्राध्यापक डॉ. = डॉक्टर दा.= दादा ता. = ताई उंटावरल्या प्रा.डॉ.

मीनाकुमारी की बेटी ?

लेखक शशिकांत ओक यांनी बुधवार, 18/03/2020 19:56 या दिवशी प्रकाशित केले.

मीनाकुमारी की बेटी?

 मीनाकुमारी की बेटी? एकदा लाहोरच्या गल्लीतील एका फुटपाथवर एक चोपडे एकाच्या नजरेस पडले. घरी आल्यावर ते फाटके पुस्तक चाळून 'काहीच्या बाही लोक लिहितात' असे मनात म्हणत ते पुस्तक रद्दीत टाकून दिले. रद्दी विकताना ते पुस्तक वाचायची इच्छा झाली म्हणून तो वाचायला लागला. खरे कि खोटे याची शहानिशा करण्यासाठी त्याने शोध घ्यायला सुरवात केली. नंतर जे समोर आले ते तो सादर करत आहे. सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री मीनाकुमारीची जीवन कहाणी लेखी स्वरूपात उपलब्ध आहे. माहजबीन नावाने जन्मलेली अलिबक्षची ती मुलगी.

आकाशफुले...

लेखक दिनेश५७ यांनी बुधवार, 18/03/2020 14:39 या दिवशी प्रकाशित केले.
आकाशफुले! एखादा दिवस आयुष्याला असा काही धक्का देऊन जातो, की त्याची सुखद जाणीव प्रत्येक पावलासोबत जवळ राहाते. तो दिवसही मनात वेगळा कप्पा तयार करून स्वतःहूनच त्यामध्ये जाऊन बसतो. अधूनमधून बाहेर डोकावतो, आणि नव्या दिवसावरही तो जुना, सुखद अनुभव गुलाबपाण्यासारखा शिंपडून जातो... अगदी अलीकडचा तो एक दिवस असाच, मनाच्या कप्प्यात जाऊन बसला. एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी पुण्यात गेलो होतो. थोडा मोकळा वेळ मिळाला, म्हणून सहज चक्कर मारण्यासाठी बाहेर पडलो, आणि गल्लीतल्या गुलमोहोरांच्या सावलीतून पुढे जात असताना अचानक एका बंगल्याच्या पाटीवर नजर स्थिरावली. मन क्षणभर मोहरलं... 'प्रख्यात कथाकार जी. ए.

हात, जंतू, पाणी आणि साबण

लेखक हेमंतकुमार यांनी बुधवार, 18/03/2020 08:27 या दिवशी प्रकाशित केले.
‘करोना’च्या जागतिक साथीमुळे वैयक्तिक स्वच्छतेबाबत बरीच चर्चा सर्वत्र होत आहे. रोगप्रसार कमी होण्याचे दृष्टीने त्याचे महत्व नक्कीच आहे. क्षणभर आपण ही साथ बाजूला ठेवू. कुठलाही संसर्गजन्य रोगप्रसार टाळण्याचे दृष्टीने वैयक्तिक स्वच्छता ही कायम खूप महत्वाची आहे. त्यातील एकाच महत्वाच्या पैलूकडे या लेखाद्वारे लक्ष वेधत आहे आणि तो म्हणजे आपल्या हातांची स्वच्छता. आपले हात शास्त्रीयदृष्ट्या स्वच्छ कसे करावेत यावर काही मूलभूत माहिती देत आहे. वरवर पाहता हा विषय सामान्यज्ञान किंवा शालेय पातळीवरचा वाटेल. पण वास्तव तसे नाही. काही अपवाद वगळता बहुसंख्य लोक ही क्रिया उरकून टाकल्यासारखी करतात.

तिरुपती दर्शन भाग ३

लेखक AKSHAY NAIK यांनी मंगळवार, 17/03/2020 12:50 या दिवशी प्रकाशित केले.
दिवस ६/०३/२०२० सकाळी ६ वाजण्याच्या ठोक्याला तिरुपती स्टेशन वर आमच्या गाडीचे आगमन झाले. प्रचंड अशा गर्दीमधून वाट काढत आम्ही स्टेशन च्या बाहेर पडलो. आमच्यातील दोघा तिघांनी तिरुमला येथे पायी जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे सगळ्यांनीच पायी जायचे असे निश्चित केले. आमच्या रूमचे कोणतेही बुकिंग नव्हते, रूम खाली तिरुपती येथे करावी की वरती तिरुमला येथे करावी हे काही ठरत नव्हते.

मोगँबो -१

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 17/03/2020 09:10 या दिवशी प्रकाशित केले.
ए मोगँबो आला रे……….. मोगँबो आला रे. मागच्या बेंचवरून आवाज आला. वर्ग एकदम शांत झाला. आत्तापर्यंत चाललेली गडबड एकदम खेळताना दोन बोटे रोखून कोणीतरी स्टॅच्यू म्हणावे आणि ऐकणाराने जागीच आहे त्या अवस्थेत थिजून जावे तशी थिजून गेली. म्हणजे मीना आणि संध्या हातात कसलेसे कागद घेऊन एकमेकींचे पाठांतर तपासत होत्या. संजना बॅग मधून रंगीत कागदाचे तुकडे काढून चिकटवत होती. झिपर्‍या उर्फ पक्या प्लेअरवर गाणी मागे पुढे करत क्रम लावत होता. गण्या वहीत खर्चाची बिले आणि हिषेब जुळवत होता. हिषेब लावताना कसलीशी आकडेमोड करत होता. मधूनच तो कोणालातरी प्रश्न विचारत होता.

स्फुटः आठवणी!

लेखक राघव यांनी मंगळवार, 17/03/2020 01:29 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपुर्वीची गोष्ट. नुकताच लग्न झालेला एक कलीग. जाम वैतागून, तावातावानं, "आयुष्यात काय काडीचा रस राहिलेला नाही.." असं वगैरे म्हणत, आम्हा सगळ्यांचं डोकं खात बसला होता. डोकं खात बसला होता असं म्हणण्याचं कारण म्हणजे, कुणी कितीही काहीही सांगितलं तरी याची ऐकायची काही तयारीच नव्हती. थोडक्यात त्याला जागं करणं शक्य नव्हतं! पण [कितीही मदत करायची ईच्छा असली तरी] उगाच ऐकून घ्यायला अन् कचरा डेपो व्हायला कुणाला आवडेल? मग आम्ही सगळ्यांनी मिळून एक प्लॅन बनवला.. दररोज, हा आला बोलायला, की कुणीतरी मागची एखादी चांगली आठवण काढायची आणि सगळ्यांनी मिळून त्यावर दंगा करायचा!

उल्लेखनीय प्रथा

लेखक Nitin Palkar यांनी सोमवार, 16/03/2020 20:54 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या आठवड्यात एका मित्राच्या मुलाच्या विवाह समारंभात गेलो होतो. नेहमी सारखाच मराठमोळा समारंभ. दोन उल्लेखनीय बाबी आढळल्या. हॉल मध्ये शिरताना, प्रवेशद्वारापाशी सर्व पाहुण्यांना एक कागदी पिशवी दिली जात होती. ज्या मध्ये बीज गोळ्या (seed balls) होत्या. सीड बॉल म्हणजे उपयुक्त झाडांच्या बिया शेणखत, अथवा तत्सम खातात लपेटून त्याचा तिळगुळा एवढा, थोडासा मोठा केलेला लाडू. आशा प्रकारे त्या बिया सहज रुजू शकतात.

आला रे आला कोरोना आला

लेखक खिलजि यांनी सोमवार, 16/03/2020 18:06 या दिवशी प्रकाशित केले.
आला रे आला कोरोना आला कुठे राहिला तो आंदोलनवाला दंगली साऱ्या हवेत विरल्या देश आपसूक शांत झाला यापूर्वी कधीही असा कुणी घेतला नव्हता धसका दंगेखोरांना कोरोनाने येऊन दाखवलाय चांगलाच हिसका रस्त्यावर उतरून साले नाचत होते नंगानाच कोरोनाच्या भीतीने ठेवलीय त्यांच्या मानगुटीवर टाच जीव घेणाऱ्याच्याच आता पोटात गोळा आला शांतप्रिय लोकांच्या मात्र जीवात जीव आला आला रे आला ,,कोरोना आला कोरोनाच्या येण्याने मात्र भारत प्रकाशात आला "गो कॅरोना गो कॅरोना" असं आठवले त्याला बोलला जगभरात प्रसिद्ध झाली त्याची हरिमुखीं लाईन कोरोना आलाय देशात खरा पण बाकी सर्व फाईन रस्त्यावरून जरी