Skip to main content

चांदणरात

लेखक कौस्तुभ भोसले यांनी शनिवार, 09/05/2020 16:14 या दिवशी प्रकाशित केले.
पैजणी चांदणरात तुझ्या स्पर्शात हे प्राण घेऊनी आली... स्पर्श संदिग्ध जरासे मंद गुलाब फिरले गाली... ढवळते वारा छेडील्या तारा आकाश असे सचित्र... उधळती रंग पसरले गंध हे भास मला विचित्र... उरी मोगरा प्रसविते झरा तुझी मधुर काया... क्षणाची भूल उठविते झूल निळी सावळी माया... - कौस्तुभ

कवितेच्या विषाणूने

लेखक अनन्त्_यात्री यांनी शनिवार, 09/05/2020 15:27 या दिवशी प्रकाशित केले.
कवितेच्या विषाणूने तुला दंश केला (एक चांगला इसम कामातून गेला) जे न पाहू शके रवि ते तुला दिसते चांदण्यांची धूळ तुझ्या पायाशी लोळते विसरशी व्यवहार, शब्द हेची धन ऐन कोलाहलातही करीसी चिंतन न बोलले, अव्यक्तसे तुला ऐकू येते जाणिवेच्या पल्याडचे तुला खुणाविते कळेना रचसी अशी कोणती कविता मिपा काव्यस्पर्धेमध्ये टाक.. ..आज ..आत्ता!

सुटकेस ६

लेखक जव्हेरगंज यांनी शनिवार, 09/05/2020 13:40 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी उठलो. चांगले प्रसन्न वाटत होते. आंघोळ वगैरे करून काऊंटरवरच्या म्हाताऱ्याला हिशोब दिला. आणि रस्त्यावर आलो. एका हॉटेलमध्ये फाफडा की काय तसले खाल्ले. आणी वडापने अहमदाबाद ला जायला निघालो. दोन अडीच तासांचा प्रवास मोठ्या मुश्कीलीने काटला. काल रात्री आपल्या हातून भयंकर गोष्ट घडली. गांज्याच्या नशेने माणूस एवढे उत्तेजित होते? काही कळेना. कदाचित माझ्याच मनात आतमध्ये कुठेतरी असे काही करायची सुप्त ईच्छा दडली असावी. पण पुन्हा असल्या फंद्यात पडायचे नाही असे मनोमन ठरवले. वडाप अहमदाबादमध्ये घुसले तसे रोख चारशे रूपये देऊन उतरलो. आळस झटकून तोंड धुतले. आणि एक हॉटेलमध्ये नाष्टा केला.

फडफडणारा पक्षी आणि वातावरण

लेखक Harshal Kulkarni यांनी शनिवार, 09/05/2020 13:31 या दिवशी प्रकाशित केले.
मी त्यावेळी वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय, सांगली, येथे पदव्युत्तर शिक्षण घेत होतो! अभ्यासक्रमात भालवणकर सर Finite Element Analysis शिकवत होते! कृश शरीरयष्टी, बेताची उंची, पाठीतील थोडा बाक, अधू दृष्टी असल्याने जाड भिंगाचा चष्मा, असे एकंदरीत व्यक्तिमत्व! भरीस भर म्हणून, वयोमानानुसार आवाजही बारीक झालेला! वर्गात ते शिकवत असताना एकंदरीत जेमतेमच कळे, आणि lecture संपल्यावर त्यांना गाठून शंका विचाराव्या लागत! असो! Semester चे सुरुवातीचे दिवस होते, त्यामुळे introduction मध्ये सर विषयाचा significance आणि importance अनेक उदाहरणातून समजावून देत होते!

श्री सो.डी.माहात्म्य - द्वितीय अध्याय

लेखक अभिदेश यांनी शनिवार, 09/05/2020 13:24 या दिवशी प्रकाशित केले.
श्री सो.डी.माहात्म्य -- द्वितीय अध्याय आटपाट नगर होतं. नगरजन खाऊन पिऊन सुखी होते . दर पाच वर्षांनी तिथे नवीन राजा राज्यकारभार सांभाळी . थेट लोकांमधून राजा निवडला जाई. लोकांना कारभार नाही आवडला तर ते नवीन राजा निवडू शकत होते. अशी सगळी आदर्श राज्यकारभाराची पद्धती होती. जणू रामराज्यच. एकदा काय झालं , लोकांनी एका नवीनच स्वर्णकेशी नामक राजाला निवडून दिलं . त्याने निवडून आल्या आल्याच धडाकेबाज निर्णय घेण्यास सुरुवात केली.

असा एक शत्रूच खुद्दार व्हावा

लेखक कौस्तुभ भोसले यांनी शनिवार, 09/05/2020 12:38 या दिवशी प्रकाशित केले.
असा एक शत्रूच खुद्दार व्हावा. पुरावा परंतू न गद्दार व्हावा. अशी स्निग्ध व्हावी घरे ही नभाची. उभ्या आसमंतात उद्धार व्हावा. कुण्या मोगऱ्याचा दिसावा पसारा. उभा श्वास माझा ग मंदार व्हावा . कशाला कुणाची करावी अपेक्षा. स्वत:चा स्वत:लाच आधार व्हावा. तुझ्या स्पंदनाची गती सैल व्हावी . नि डोळ्यांत साऱ्या ग अंधार व्हावा . -कौस्तुभ वृत्त - भुजंगप्रयास

पुणे ते कन्याकुमारी सायकल सफर पूर्वार्ध-२

लेखक केडी यांनी शनिवार, 09/05/2020 11:25 या दिवशी प्रकाशित केले.
1 मे मध्ये तसेही लांब पल्ल्याच्या राईड्स उन्हामूळे करता येत नाहीं, त्यामुळे तसं फारसं बिघडत न्हवत. हात स्लिंग मध्ये ठेवुन आता हळूहळू ऑफिस ची कामे घरून करायला लागलो. चारचाकी/दुचाकी चालवता येत न्हवती त्यामुळे थोड्या आठवड्याने ऑफिसमध्ये शेर राईड ने जायला लागलो. २० मे ला झालेल्या अपघातापूर्वी, १६ मे ला एकदा ऑफिसात सायकल वर जाऊन आलेलो, जाऊन येऊन ५२ किमी. ऑफिसमध्ये सायकल वर जायची कल्पना सुचली ती इतर देशात आणि अगदी आपल्याकडे सुद्धा लोकं हे करतात हे वाचून. व्यायाम करायला वेळ मिळत नाही, वेळ द्यावा लागतो, मग वर्कआऊट ऑन युर वे टू वर्क! म्हणून मी आणि मित्र बऱ्याच वेळेला ऑफिसमध्ये सायकल वर जायचो. आता ह्यात वेगळीच आव्हाने असतात. एक तर आपल्याकडे बेभान असणारी रहदारी, सायकलस्वारांना न जुमानणारे दुचाकी चारचाकी, ट्रक, बस व टेम्पो चालक. (आता जिथे रस्ताच मुळात छोटा त्यात तुम्हाला कोण देणार जागा सायकल चालवायला), त्यातून मग साहजिकच येणारी भीती, काळजी. (कशाला करताय हे? इस इट सेफ टू राईड बाईक्स ऑन इंडियन रोड्स?) "बी ब्रेव्ह, टेक रिस्कस, नथिंग कॅन सबस्टिट्यूट एक्सपिरियन्स". आपल्याकडे, किंवा इतर जगात कुठेही, सायकल चालवण्यात रिस्क (धोका) हा आहेच. पण तो किती घ्यावा आणि कसा कमी करावा हे आपल्या हातात आहे. सायकलिंग करताना काही बंधनं आणि काही नियम हे अनिवार्य आहेत. हेल्मेट घालणं, सायकलिंग साठी बनवलेले भडक रंगाचे कपडे (पोपटी किंवा तांबडे टी-शर्ट, रिफ्लेक्टिव्ह जॅकेट्स, सायकलिंग शॉर्टस) जेणेकरून तुम्ही लांबून सुद्धा अगदी स्पष्टपणे आणि ठळक ओळखु याल. रात्री सायकल चालवणे वर्ज्य, अर्थात अगदीच वेळ पडली तर पुढे आणि मागे मोठे दिवे हे देखील अनिवार्य. कायम रस्त्याच्या डाव्याबाजूला पांढऱ्या पट्टी वरून/जवळ चालवणे, ग्रुप मध्ये असाल तर एका मागे एक अश्या रचनेत. पुन्हा ऑफिसमध्ये पोचल्यावर अंघोळीसाठी सोय हवी. मी माझ्या कंपनीच्या ज्या ज्या ऑफिसेस मधून काम केलंय, त्यात फक्त २ ठिकाणी अंघोळीची सोय होती. इतर ठिकाणी, वॉशरूम मध्ये जाऊन, टॉवेल ने अंग पुसून, मग सोबत नेलेले डिओड्रंट चे भरपूर फवारे मारून कपडे बदलून बसायचो. एका ऑफिसमध्ये ऍडमिन च्या मागे लागून बाथरूम मध्ये एक बॉयलर (गिझर) लावून घेतला, कारण थंडीच्या दिवसात त्रास व्हायचा गार पाण्याचा. अर्थात त्यांनी लावला तो अगडबंब २०/३० लिटर चा गिझर! तो सुरू करणार कधी, आणि ते पाणी तापणार कधी! सायकलने ऑफिसमध्ये जाताना अजून एक प्रश्न म्हणजे सोबत न्यायचा लॅपटॉप, बदलायचे कपडे. ते मी लॅपटॉप च्या बॅगेत कसे बसे कोंबून मग ती बॅग पाठीवर घेऊन निघायचो. कपडे बदलून झाली की ते आधीचे घामटं कपडे मग क्यूबिकल मध्ये खाली चक्क वाळायला टाकायचे! त्या ऑफिस च्या राईड नंतर सायकल वर पुन्हा बसलो तेच अगदी सप्टेंबर मध्ये! पावसाळ्यात खरं तर राईड करायची मज्जाच काही और असते, पण हात काही साथ देईना. त्यात उगाच रिस्क नको, म्हणून राईड्स केल्या नाहीत. शेवटी आता दोनच महिने राहिले आहेत त्यामुळे सरावासाठी सप्टेंबर च्या शेवटच्या शनिवारी एक राईड केली, विंझाई मंदिर, ताह्मणी घाटाच्या अलीकडे, साधारण ५० किमी (जाऊन येऊन १००). नुकत्याच संपलेल्या पावसामुळे, रस्ता अतिशय खराब झालेला, हाताला रस्त्यावरचे खड्डे चांगलेच जाणवत होते, जाताना तरी हळूहळू गेलो, परतीच्या वाटेला मात्र अगदीच वाट लागली! शेवटी हँडल धरवेना, पिरंगुट घाटाच्या अलीकडे बायकोला कॉल केला आणि तू ये, आता शक्य नाही म्हणून थांबलो...राईड अर्धवट सोडावी लागली, त्याला बरीच करणे होती, अर्थातच हात, प्रचंड उन्हामुळे होणारा त्रास आणि सँडल सोर ची चाहूल! सँडल सोर, सायकलस्वारांचा सर्वात मोठा प्रॉब्लेम! हा त्रास शब्दशः "मागे" लागला की धाब्बे दणाणतात! मागे एकदा, एक तीन दिवसांची राईड केलेली, पुणे आरावी आणि परत. पहिल्या दिवशी ताह्मणी माणगाव मार्गे आम्ही १७० किमी कापत पोचलो मुक्कामी. नियोजनाप्रमाणे खरं तर दुसरा दिवस आराम करून मग तिसऱ्या दिवशी परत असा प्लॅन होता. पण एकंदरीत पहिल्या दिवशी पडलेल्या श्रमामुळे आणि रस्त्याच्या परिस्थितीमुळे आम्ही दुसऱ्या दिवशी दुपारी ६० किमी सायकल चालवून माणगाव ला मुक्काम केला, म्हणजे शेवटच्या दिवशी फक्त ११० किमी चा पल्ला गाठावा लागणार होता. पुण्याच्या अलीकडे, साधारण ३० ते ४० किमी. राहिलेले असताना मला सँडल सोर चा त्रास सुरू झाला, ते शेवटचे अंतर अक्षरशः मी बुड सीट वर नं टेकवता चालवत आलेलो! विंझाई राईड नंतर मात्र माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली! राईड नंतर पुढे आठवडाभर हात सारखा दुखत होता, हाताला सूज आली, आणि पहिल्यांदाच मला जाणीव झाली की बहुदा कन्याकुमारी पर्येंत पोचणे अवघड आहे. त्यात ४ पैकी एकाने (सेथु), त्याला ऑफिस च्या कामामुळे माघार घ्यावी लागेल असे आमच्या व्हाट्सएपच्या ग्रुप वर कळवले! मग मी सुद्धा, मी माघार घेतो असे सुचवले. पण आनंद आणि किरण मात्र मानायला तयार न्हवते. "तुला जमेल तशी चालवं, हात दुखला तर टेम्पो थांबवू" वैगेरे सूचना यायला लागल्या. खरंतर सायकल राईड ला आपण सायकल चालवावी हा माझा अट्टाहास असतो, पुणे कन्याकुमारी राईड करायची म्हणजे आपण सायकल चालवतच न्यायला पाहिजे. दुसरी मनात शंका म्हणजे सेथु (जो आहे खरं तर मल्लू, पण वाढलाय नागपूरात) गलपटला म्हणजे आमचा मुख्य भाषेचा आधार गेला. अनोळख्या राज्यात भाषा न समजता मी कसा टेम्पो अडवणार आणि काय सांगणार कोणाला? त्यात तिकडे सगळ्या पाट्यांवर जिलब्या आणि कडबोळी! मग एक अजून सूचना म्हणजे आपण अर्धी करूयात राईड, थोडक्यात मधून कुठून तरी सुरू करू आणि मग कन्याकुमारी गाठू. हे देखील मला तितकेसे पटणारे न्हवते. एक तर मेहेनत घेऊन अख्खी राईड प्लॅन करायची आणि मग करायची ती अशी अर्धवट? बायकोच्या भाषेत माझी "खाईन तर तुपाशी" वृत्ती आड आली. आपण अजून राईडस करू, त्यात तुला कसं झेपतंय ते बघ, असे इतर दोघे म्हणाले. मी अजून एक दोन छोट्या राईड केल्या आणि त्रास कायम होत गेला. १५०० किमी सायकल राईड करणे म्हणजे तुम्ही शारीरिक आणि मानसिक दृष्टीने अतिशय तयार पाहिजे हे लक्षात आलं. मित्र अजूनही चल, आपण करू वैगेरे सांगत होते, पण कुठेतरी माझा आत्मविश्वास मात्र कमी झालेला आणि मी ठाम राहिलो. दोघेही प्रचंड नाराज झाले! प्लॅन फिस्कटला! सेथुने विमान तिकीटं रद्द केली! मला खूप वाईट वाटलं! एवढे महिने नियोजन करून केलेला प्लॅन असा माझ्यामुळे फिस्कटला! आता पुढे करायचे काय हा मोठा प्रश्न उभा राहिला. सुट्टी तर आधीच टाकलेली, मग ती कॅन्सल करावी असा एक विचार आला मनात, आणि अश्या वेळी माझा एंडयुरो मधला पार्टनर आणि कोकण वेडा अमित ने भुणभुण सुरू केली की आपण परत गोवा गाठू. (आदल्या ट्रिप ला ह्याला काही कारणाने येतां आलं न्हवत, त्यामुळे त्याची ती ईच्छा आजही अपूर्णच होती). मी आधी स्पष्ट नकार दिला. मला आता कोणीही विचारलं तर मी हेच सांगेन की पुणे ते कन्याकुमारी च्या १५०० किमी राईड पेक्षा आम्ही केलेली पुणे-कोंकण-गोवा ही राईड जास्ती खडतर वाटली मला. कोकणातले ते वर-खाली वळणा वळणाचे रस्ते, एक गाव सोडलं की डोंगर उतरून पुन्हा दुसरा डोंगर चढत जायचे, हे सत्र सदैव चालूच राहते कोकणात. त्यात काही ठिकाणी पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा झालेली असते आणि अश्या वेळी चढावर अजिबात गती मिळत नाही. माझ्या मानत अजून एक भीती होती. सायकल वर जेव्हा तुम्ही रस्त्याने जाता, तेव्हा तो रस्ता तुम्हीं अगदी जवळून अनुभवता, आणि तो बऱ्यापैकी लक्षात राहतो. आमची आधीची गोवा ट्रिप झाल्यानंतर आम्ही सहकिटुंब अशीच कोस्टल गोवा ट्रिप केली कार ने, त्याच रस्त्याने, आणि मला प्रत्येक चढ, उतार, कुठे पाणी प्यायला थांबलो, नाश्ता, जेवण कुठे कुठे हे अगदी डोळ्यांसमोर पुन्हा उभं राहत होत, (बायको पोरं शेवटी वैतागली नाही हेच नवल!) तर पुन्हा गोव्याला जायचे म्हणजे नाही म्हणायला थोडा अंगावर काटा आला, कारण ते रस्ते, चढ उतार हे पाढे पाठ झाल्यासारखे डोळ्यासमोरून पुन्हा फिरले. ह्यावर अमित ने तोडगा काढला. आपण रोज कमी अंतर कापू आणि ५ ऐवजी ९ दिवसात गोवा गाठू असा प्लॅन त्याने तयार केला. मी शेवटी तयार झालो.(सुलेमानी किडा बहुदा ह्यालाच म्हणत असावे!). या दुसऱ्या गोवा ट्रिप चा अनुभव अजूनच सुंदर होता. अगदी कोकणातील छोट्या छोट्या गावात, कधी कोळ्यांच्या वस्तीत मुक्कामाला राहिलो. ह्या ट्रिप मध्ये आम्ही कुठल्याही हॉटेल चे आगाऊ बुकिंग केले नाही, जमेल तितके जायचे, आणि मग विचारपूस करत मुक्कामासाठी हॉटेल शोधायचे. आमच्या ह्या सायकल ट्रिप चा आराखडा साधारण असा होता: पुणे ते माणगाव - ११० किमी माणगाव ते आरावी - ६० किमी आरावी ते दापोली - ७५ किमी दापोली ते गुहागर - ६० किमी गुहागर ते रत्नागिरी - ७५ किमी रत्नागिरी ते मिठगावणे - ५५ किमी मिठगावणे ते आचरा - ७८ किमी आचरा ते निवती - ६० किमी निवती ते आरंबोल, गोवा - ५५ किमी ह्या ट्रिप मधली काही निवडक क्षणचित्रं इथे देतोय

||चंद्रवेळ||

लेखक प्राची अश्विनी यांनी शनिवार, 09/05/2020 08:35 या दिवशी प्रकाशित केले.
1 आकाशातून खिडकीत, खिडकीतून फोटोत उतरलेला चंद्र, तुला WhatsApp वर पाठवला की मग कुठे माझी पौर्णिमा सुरू होते. अन तुझा त्यावर reply आला की ती शारदीय होते. 2माहीत असतं, "छान, ओके किंवा तूच माझा चंद्र" याहून दुसरा तुझा reply येणार नाही. पण तरी मी खूष असते कारण मला कळतं याहून अधिक तुला खरंच काही सुचणार नाही. 3 आठवतं? एका रात्री एअरपोर्टवरवरून तू मला कॉल केला होतास. तू घरी पोचेपर्यंत आपण बोलत होतो. . तेव्हा चंद्रसुद्धा खिडकीपाशी थांबून राहिला होता. 4 एकदा मोकळ्या आभाळाखाली समुद्रकिनारी तुझ्या कुशीत चांदणी रात्र घालवायचीय. खाली चमचमणारी वाळू, समोर चमचमता समुद्र पांघरायला चांदणं... प्लीज?

पिंजऱ्यातली अंबा

लेखक ज्योति अळवणी यांनी शुक्रवार, 08/05/2020 23:03 या दिवशी प्रकाशित केले.
महाभारतातली अंबा! श्रीखंडीच्या शरीरातील स्त्रीमन अंबा! माझ्या कल्पनेतील तिच्या मनाची ही कथा. पिंजऱ्यातली अंबा हो! मी अडकले आहे या पिंजऱ्यात. तुम्हाला नाही कळणार ते... कारण तुम्हाला अंबा म्हणजे पितामह भीष्मांच्या मृत्यूचे कारण होणारी स्त्री! इतकेच माहीत आहे. अर्थात त्या अनुषंगाने माझ्याबद्दल महाभारतात जे सांगितलं आहे; ते देखील माहीत असेलच. मी काशी राजाची ज्येष्ठ मुलगी. माझ्या दोन भगिनी अंबिका आणि अंबालिका. ज्यांनी काहीही न बोलता हस्तिनापूरचे महाराज विचित्रविर्य यांच्याशी विवाह केला. आम्हाला जिंकून आणलं होतं हस्तिनापुराचे रक्षणकर्ते पितामह भीष्मांनी...