Skip to main content

दडपे पोहे.....

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी रविवार, 26/07/2020 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
राहिलेल्या टोल्यांना मुलाखतीची फोडणी प्रसिद्धीसाठी आसुसलेले हावरे मन काही न चिंती आयुष्य हे चुलीवरल्या फोडणीतले दडपे पोहे राजकारणी या बाजारातून उमेदवारांची दाटी आणि म्हणे कुणि संपादक तो कुरकुरणाऱ्या खाटी रोज फसवावे रोज भुलवावे धरून आशा खोटी आले फिरूनी निलाजऱ्यापरि पुन्हा बनवण्यासाठी आयुष्य हे चुलीवरल्या फोडणीतले दडपे पोहे दुसऱ्या बंगल्याच्या वास्तुशांति चि स्वप्ने पाहताना मुख्यमंत्री व्हावे हळूच मागुन ध्यानी मनि नसताना नकळत मग चुना लावावे स्वतास मग जपताना अन मग डोळे उघडावे हे दिवास्वप्न पहाताना आयुष्य हे चुलीवरल्या फोडणीतले दडपे पोहे भूतकाळची तोडून नाती तमाशे केले ज्यांनी आता उभारती खोटे चि

दाभोळकर आणि साळगांवकर

लेखक लेखनवाला यांनी रविवार, 26/07/2020 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
*************************** आज सुटटी होती आणि रक्षाबंधन पण. सकाळी उठणं लवकरच होणार होतं, साहजिकचं होतं घरी पाहूणे येणारे होते, हो बहिण, आत्या येणार होती, आघोळं संपली आणि मग नेहमीसारखा टी. व्ही लावला, बातम्याचं चॅनेल लावलं, ब्रेकिग न्यूज होती, नंरेद्र दाभोलकराचीं पुण्यात गोळ्या घालून सकाळी हत्या केली होती, माझी पहिली प्रतिक्रिया होती, “असं नाय व्हायला पाहिजे होतं”. आणि मग टी. व्ही. वर झळकत होत्या मान्यवराच्या प्रतिक्रिया, दाभोलकरांनी दिलेल्या मुलाखती आणि इतर चित्रण विविध न्यूज चॅनेल दाखवत होते.

जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण { भाग-९ } डिपर डिप्रेशन

लेखक मदनबाण यांनी रविवार, 26/07/2020 11:23 या दिवशी प्रकाशित केले.
कोव्हिड-१९ ने जगातल्या अगदी छोट्या व्यवसायां पासुन ते मोठ्या व्यवसायां पर्यंत सर्वांनाच ठप्प केले आहे हे आपण अनुभवतच आहोत... यातले अनेक व्यवसाय कायमचे बंद होतील तर काही त्यांच्या मूळ क्षमतेने कधीच काम करु शकणार नाहीत किंवा ती क्षमता परत मिळवण्यास बराच काळ जावा लागेल. अमेरिका आणि चीन चे शीत युद्ध देखील आपण पाहत आहोत याच शिवाय अमेरिकेत येणार्‍या निवडणुका देखील या संबंधावर प्रभाव टाकत आहेत आणि यापुढे देखील त्याचा प्रभाव होताना पहायला मिळेल. [ अमेरिका युद्ध सज्जता करतो आहे का ? तो युद्ध कधी करेल ? हे प्रश्न देखील सध्या मनात उद्भवले आहेत.

घाव.....गजलेमधून

लेखक तिरकीट यांनी रविवार, 26/07/2020 00:04 या दिवशी प्रकाशित केले.
मराठीतल्या काही नवकवींच्या गजल ऐकल्या कि असं वाटतं मराठीत गजलेला दुःख सोडून विषय आहेत का नाहीत. मध्ये एक अशीच गजल ऐकली आणि साधारण विशीतल्या त्या गजलकाराचा गळा एकाच गजलेत तीन वेळा कापला गेला. म्हटलं अरे देवा!!! गळा कापणे, पाठीवर घाव करणे, गेला बाजार पारिजातकाचा उल्लेख ह्याच्या पुढे गजल आहे का नाही. खालच्या ओळी थोड्याश्या वैतागाने लिहिल्यात. वृत्तांच्या गणितात बसत असतील तर गजल म्हणू नाहीतर कविता, तेही नसेल तर मुक्तछंद आहेच.....
काव्यरस

मुक्या प्राण्यांची सेवा

लेखक सुरज जाधव यांनी शनिवार, 25/07/2020 19:31 या दिवशी प्रकाशित केले.
दिनांक - 22/07/2020 नेहमी प्रमाणे सकाळी 5.30 ला उठून धर हॅण्डल मार फायन्डल करत माझ आवडत मार्ग बहिरवली कडे निघालो, अतिशय निसर्गरम्य घनदाट जंगल आणि रस्त्याच्या एक बाजूने जगबुडी खाडी..खाडी पट्टा म्हणून ओळखलंजाणाऱ्या रस्त्याला सध्या लॉकडाऊन मुळे वाहनांची वर्दळ खूप कमी आहे,, तसा हा पट्टा वाळू-माफिया पट्टा म्हणून पण प्रसिद्ध आहे...

फॉरेस्ट गम्प- एका मुलाची कथा

लेखक भीमराव यांनी शनिवार, 25/07/2020 00:47 या दिवशी प्रकाशित केले.
काल पर्यंत मला हा चित्रपट काय आहे खरच माहित नव्हतं. अगदी सहजच मिळाला आणि वेळ घालवायला दुसरं काही नाही म्हणून पाहिला. आणि काही तरी वेगळं पाहिलंय याची जाणीव झाली. एका अनोळखी गावात बस स्टॉपवर बसलेला एक तरुण. शेजारीच ठेवलेली आटोपशीर बॅग. लोकं येतायत आणि जात आहेत. त्यालाही कुठे तरी जायचं आहे, पत्ता विचारावा तर कसा आणि कोणाला? शेजारीच बसची वाट पाहत बसलेल्या एका बाई बरोबर तो बोलायला सुरुवात करतो. तसं बघायला गेलं तर त्याला फक्त नऊ नंबर च्या बस शी देणं घेणं असतं, पण तो अगदी सुरूवातीपासूनची गोष्ट चालू करतो. आणि एक एक करत आपल्या समोर उलगडत जाते त्याच्या आयुष्याची कथा.

पावनखिंडीचा रणसंग्राम ( भाग ३ )

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 24/07/2020 21:27 या दिवशी प्रकाशित केले.
या आधीचा भाग आपण येथे वाचु शकता पावनखिंडीचा रणसंग्राम ( भाग २ ) पन्हाळ्यावर एकच लगबग सुरु होती. दारुगोळ्याच्या कोठ्याची तपासणी सुरु होती. कोल्हापुर परिसरातील बैलगाड्या धान्य भरुन रोज पन्हाळ्याचा चढ चढीत होत्या. गंगा,जमूना कोठीत छतापर्यंत धान्याच्या पोत्यांची रास लागलेली. गडाचा चोख बंदोबस्त झालेला होता. आणि एके दिवशी लांब पुर्वेकडून मोठी धुळ उडू लागली.गर्जना एकू येउ लागल्या, हिरवा चांदतारा फडकताना दिसत होता. जोहर पन्हाळ्याच्या रोखाने येत होता. पन्हाळ्याचा औरसचौरस आकार लांबूनच नजरेस येत होता.

नजर..

लेखक मन्या ऽ यांनी शुक्रवार, 24/07/2020 17:31 या दिवशी प्रकाशित केले.
नजर.. बालपणीचा पाऊस म्हणजे असे मजामस्ती, शाळेत जाण्याची धांदल ,वाहत्या पाण्यात सोडलेल्या कागदी होड्या आणि अवखळ खेळ तारुण्यात तोच पाऊस म्हणजे गुलाबी जग सारे, प्रेमपत्र, चोरटी बावरलेली नजर आणि पावसातली ती घट्ट मिठी उतारवयात पाऊस तोच ; पण नेत्र असतात पाणावलेले, हक्काची नातीही दुरावलेली, कोणीच नसे सोबती; दोन शब्द बोलायला. पाऊस असे तोच. दरसाल तसाच बरसुन जाई वयाप्रमाणे बदलत जाई ती आहे 'नजर' पावसाला अनुभवण्याची! -दिप्ती भगत २५जून,२०१९

अथ स्त्रीलीळा ।

लेखक आजी यांनी शुक्रवार, 24/07/2020 14:50 या दिवशी प्रकाशित केले.
माझी एक मैत्रीण आहे. टू बेडरुममधे राहते. तिला एक नवरा(सुदैवानं एकच असतो.अधिक लफडी करण्याचे गटस् बहुतेक स्त्रियांमधे नसतात.) आणि दोन मुलगे आहेत. (दोन दोन मुलगे म्हणजे तिचा "स्त्रीजन्म धन्य" झालेला आहे. सध्या लॉकडाऊनच्या काळात तिचा नवरा बेडरुममध्ये बसून लॅपटॉप जोडून वर्क फ्रॉम होम करत असतो. त्याला कॉनकॉल्स असतात. त्याला डिस्टरबन्स चालत नाही. एक मुलगा सेकंड बेडरुममधे आणि एक मुलगा हॉलमधे झूम वगैरेवर ऑन लाईन शिकत असतात. त्यांनाही शांतता लागते. डिस्टरबन्स चालत नाही. मग मैत्रीणीने बसायचं कुठे? तर स्वयंपाकघरात. गुपचूप. घरात टीव्ही लावायचा नाही. गाणी लावायची नाहीत.

राजयोग - २२

लेखक रातराणी यांनी शुक्रवार, 24/07/2020 12:38 या दिवशी प्रकाशित केले.
राजयोग - २१ *** नक्षत्ररायचा छत्रमाणिक्य या नावाने मोठा राज्याभिषेक सोहळा पार पडला. राज्याच्या खजिन्यामधे फार थोडे धन शिल्लक होते. प्रजेचं सर्वस्व लुटून मुघल सैनिकांना त्यांचा ठरलेला मोबदला देऊन परत पाठवाव लागलं. कठीण दुष्काळ आणि दारिद्र्य सोबत घेऊन छत्रमाणिक्य शासन करू लागला. चारी बाजूंनी फक्त आरोप प्रत्यारोप आणि आक्रोशच ऐकू येऊ लागला.