Skip to main content

तुझ्यासवे रूजताना...

लेखक हजारो ख्वाईशे ऐसी यांनी शुक्रवार, 16/10/2020 18:43 या दिवशी प्रकाशित केले.
तू पाणी द्यावंस अशी माझी अपेक्षा नव्हतीच कधी.. बाहेर फोफावून वाढणाऱ्या मला तू तुझ्या बागेत रूजवलंस तरी आभाळातून पाणी येतं आणि त्यावर वाढत राहणं हेच माझ्या जगात मला ठाऊक होतं त्या आधीहि लाखो वर्ष.. पण तू.... माझं एखादं पान जरी वाळलं तरी कोमेजतेस येता जाता पाहत असतेस मला काही होतंय का उन्हं उतरतात त्या खिडकीतून माझ्याकडे बघत राहतेस माझ्या अंगावर फुलणारी फुलं तुझ्या नजरेत हसू फुलवतात माझ्या पानांवरुन हात फिरवत राहतेस मला जणू वाटतं कोणीतरी बोलतंय माझ्याशी खूप काही सांगावं वाटतं पण नाही सांगू शकत मी मी न्याहाळत राहतो तुला इतकी कशी तू वेडी...

(आणखी काय हवं?) - अच्रत बव्लत

लेखक टवाळ कार्टा यांनी गुरुवार, 15/10/2020 17:29 या दिवशी प्रकाशित केले.
ढिश्क्लेमर - पोगो बघणार्यांसाठी नाही....नंतर बोंब मारु नये :D . . . . . . . . . . . . . . नशिल्या दिवसाची संध्याकाळची वेळ शुभ्र वाळूसोबत गुंजणार्या लाटा खिदळणारे ओठ आणि सूचक नजरा सोनेरी पाणी व शनेलचा सुगंध धुंद संगीताचा मंद आवाज "गरम सोबती" बरोबर आवडती "श्टेपनी" बोला आणखी काय हवं?

खुसखुशीत कोंबडी

लेखक चौकस२१२ यांनी गुरुवार, 15/10/2020 17:10 या दिवशी प्रकाशित केले.
आजचे जेवण - दक्षिण अमेरिकन/ टेक्सास पद्धतीची खुसखुशीत कोंबडी चांगले आंबट ताक , काली मिरी, मीठ यात थोडा मैदा + थोडे मक्याचे पीठ कालवावे आवरणासाठी पाहिजे असल्यास लसूण - कोंबडी चे तुकडे ( त्वचेसकट) वरील आवरणात घोळवून घावी - ओव्हन १८० अंश सेल्सियस ला तापवून चांगले खुसखुशीत होई पर्यंत हे तुकडे भाजून घयावे - सोबतीला , पालक, रॉकेट अशी थोडी तुरट सलाड त्यात ग्रीक किंवा फ्रेंच ड्रेससिंग ( किंवा नुसते पांढरे व्हिनेगर किंवा लिंबाचा रस + मीठ + ऑलिव्ह तेल ) - वरती सार क्रीम ( आंबटसर लोणी ) आणि भारतीय वळण म्हणून त्याबरोबर आज कोमट अशी मस्त सोलकढी ...

पाऊस...

लेखक श्रिया सामंत यांनी गुरुवार, 15/10/2020 16:59 या दिवशी प्रकाशित केले.
आज अचानक आलास आणि सगळं काही चिंब करुन टाकलंस तु येशील याचा अंदाज होता खरंतर पण तरीही अवचितच आलास खिडकीच्या काचेतून पलीकडे बघत होते मी तुला कोसळताना आणि माझ्या लक्षात आलं की मी तर फक्त पाहतेय मी दुसरीकडे बघितलं तेव्हा मला तो दिसला पावसात भिजताना त्याला बघून माझ्याच डोळ्यात पाणी आल्याचं जाणवलं कडा ओलावल्या आणि मन पुन्हा आठवणींपाशी गेलं न भिजूनसुद्धा भिजवून टाकलंस तू ते म्हणतात ना बुंदे कुछ यूह गिरी की कुछ खयाल भिग गये पावसात भिजणारा तो आता दिसत नाहीये खाली मला आणि मी मगाशी लावलेले पडदे बाजूला सारले वीज चमकली आणि क्षणभर का होईना पण प्रकाशुन गेलं सारं YouTube वर स्वानंद किरकिरेंचं बावरा मन ला
काव्यरस

‘ब्लॉगच्या जाळ्यातून जग’ च्या निमित्ताने

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी गुरुवार, 15/10/2020 13:49 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे (पुण्याच्या ‘दिलीपराज प्रकाशनाकडून 25 सप्टेंबर 2020 रोजी ‘ब्लॉगच्या जाळ्यातून जग’ हे पुस्तक प्रकाशित झालं. त्या निमित्ताने हा लेख): ‘ज्यांच्या चेहर्‍यासमोर प्रतिक्रिया मागणारे कॅमेरे नसतात!’ अशा ‘जगातील भल्या बुर्‍या घटनांची नोंद घेणार्‍या सर्व सहृदय माणसांना...’ हा ग्रंथ (‘ब्लॉगच्या जाळ्यातून जग’) अर्पण केला आहे. सर्वसामान्य माणसाच्या वेदना वेशीवर टांगून त्यांना न्याय मिळावा म्हणून 2012 साली ब्लॉग लिखाणाला सुरुवात केली. (आणि म्हणूनच या ग्रंथाचीही आज निर्मिती झाली.) ब्लॉगमधून लिखाण करताना साहित्यिकापेक्षा सामाजिक होण्यात जास्त आनंद मिळतो!

आणखी काय हवं?

लेखक Pratham यांनी बुधवार, 14/10/2020 20:33 या दिवशी प्रकाशित केले.
मावळणाऱ्या दिवसाची संध्याकाळची वेळ वाहणाऱ्या वाऱ्यामुळे सरसरणारी पाने कडाडणारे ढग आणि चमकणाऱ्या विजा पावसाचे पाणी व मातीचा सुगंध बरसणाऱ्या थेंबाचा रपरपणारा आवाज गरम चहा बरोबर आवडते पुस्तक बोला आणखी काय हवं?

चारोळ्या

लेखक राजा सोवनि यांनी बुधवार, 14/10/2020 19:25 या दिवशी प्रकाशित केले.
वाटे व्हावे उन्ह,फुलवावी धरा सारी वाटे व्हावे मेघ तृप्त करावी धरा सारी वाटे व्हावे मलय शितल करावी धरा सारी वाटे व्हावे कवि आनंदवावी धरा सारी. वाटे उडावे इंद्रधनु शोधाया वाटे उडावे दवबिंदू शोधाया वाटे उडावे मधुबिंदू शोधाया वाटे उडावे मन: शांती शोधाया काव्य हे स्फूराया हवे हास्य हे फुटाया हवे विचार हे प्रगटाया हवे भाव हे फुलाया हव

चारोळ्या

लेखक राजा सोवनि यांनी बुधवार, 14/10/2020 19:21 या दिवशी प्रकाशित केले.
काव्य शोधण्या हवे मन कोमल हास्य शोधण्या हवे मन निर्मल प्रेम शोधण्या हवे मन गंभीर दुःख झेलण्या हवे मन खंबीर डाॅ.राजा सोवनी.

अफझलखानाचा वध-अभ्यासकाच्यानजरेतून ( भाग ३)

लेखक दुर्गविहारी यांनी मंगळवार, 13/10/2020 20:08 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागाच्या लिंक अफझलखानाचा वध-अभ्यासकाच्यानजरेतून ( भाग १) अफझलखानाचा वध-अभ्यासकाच्यानजरेतून ( भाग २) अफझलखानाचे नियोजनः- अफजलखानाने मे महिन्यात पुण्याजवळ शिवाजी राजांना त्वरित लढाईसाठी बाहेर काढण्याचे उद्दीष्ट ठेवले होते. जून महिना सुरू झाला आणि शिवाजी महाराज राजगड येथे राहिले.