Skip to main content

लोकल मराठी भाषा(शब्द-प्रतिशब्द-वाक्यप्रकार)

Published on सोमवार, 07/01/2008 प्रकाशित मुखपृष्ठ
आख्खा 'इंडिया' मधे 'वर्ल्डफेमस' असलेल्या 'मुम्बईय्या हिंदी' प्रमाणेच मराठीतसुद्धा अशा प्रकारचे गमतीशीर शब्द व वाक्यप्रकार आहेत जे ठराविक शहरात वा गावात वापरले जातात.आपण अशाच प्रकारचे शब्द इथं इतर गावकर्‍यांनाही सांगावेत,जेणेकरुन आपले शब्द-वाक्यप्रकार ही आख्ख्या मिपात 'वर्ल्डफेमस' होतील. आमच्या पुण्यात आम्ही वापरत असलेले काही शब्दः गोड आमटी: बोलीभाषेतही लेखी मराठी,जड शब्दांचा वापर करणारे 'महाशय'(शक्यतो 'सदाशिव पेठेतला') अनपरवडेबलः न परवडणारे अनझेपेबलः न झेपणारे मसशाणा: अतिशहाणा नव्वदने कल्टी खाणे: लगेच सटकणे निगाहे बघ: निघायचे बघ केशवः नाकासमोर चालणारी व्यक्ती होमीओपॅथीचा पेशंटः होमोसेक्शूअल

याद्या 16361

अरे कुणीतरी मला अरे-तुरे म्हणा

Published on सोमवार, 07/01/2008 प्रकाशित मुखपृष्ठ
अरे कुणीतरी मला अरे-तुरे म्हणा रे. ही खंत आहे केवळ माझीच नाही, तर मिसळपाववर येण्यार्‍या कित्येक गावकर्‍यांची. मी सुरुवातीला माझं नाव 'पुष्कराक्ष' असं वापरत होतो. पण नाव मोठं आणि लक्षण खोटं असं वाटायला लागलं. काही जणांनी तर 'पुष्कराक्ष साहेब' वगैरे म्हणायला सुरुवात केली. च्यामारी आता ही तर हाईट होती. पण त्यांचं तरी काय चुकलं म्हणा! हे असलं अडनिडं नाव वाचून मी कदाचित त्यांना कोणीतरी वयस्कर/दाढीवाला/गंभीर प्रवृत्तीचाच माणूस वाटणार! (तसा मीसुद्धा अधनं-मधनं दाढी वाढवतो; दाढी करायचा कंटाळा दुसरं काय!) मग नंतर मी माझं पुनर्बारसं करून 'पुष्कर' नाव ठेवलं.

याद्या 13099

हुकुमावरून...!

Published on रवीवार, 06/01/2008 प्रकाशित मुखपृष्ठ
राम राम मंडळी, सध्या मिसळपाववर आणिबाणी सुरू आहे. सदर आणिबाणीच्या अध्यक्षीय अधिकारात आम्ही खालील वटहुकूम जारी करत आहोत त्याचे सर्वांनी पालन करावे ही नम्र विनंती.. सदर वटहुकूमाचे पालन न करणार्‍या सभासदाचे लेखन उडवले जाईल तसेच त्याचे मिसळपाववरील सभासदत्वही रद्द होण्याची शक्यता नाकारता येणार नाही!
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 22271

पहिला क्षण-पहिला अनुभव

Published on रवीवार, 06/01/2008 प्रकाशित मुखपृष्ठ
आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असे काही 'पहिले क्षण' येतात जे आपल्या कायमचे लक्षात राहतात.पहिला पऊस प्रेयसीसोबतचा...तो प्रेमाचा 'ओलावा'...गारठलेले दोघे आणि गरम-गरम भजी,पहिला दिवस कॉलेजचा...तिला पहिल्यांदाच पाहण्याचा तो क्षण...काय 'सॉलीड' दिसत होती, शाळा-कॉलेजमधले पहिले स्नेह संमेलन...स्टेजवर जायचा तो पहिलाच क्षण आणि नेमके संवाद विसरलेले तुम्ही,पहिला प्रयत्न तिला 'प्रपोज करण्याचा'...घाबरलेले तुम्ही आणि बिथरलेली 'ति',पहिलीच ओली 'पार्टी'...मित्रांचा आग्रह आणि नुसत्या वासानेच झिंगलेले तुम्ही.तुमच्या बाबतीत घडलेय का असे काही?असेल तर आम्हालाही सांगा.

याद्या 6197

गणपती पुळे सहल

Published on शनीवार, 05/01/2008 प्रकाशित मुखपृष्ठ
गणपती पुळ्याला जावुन आलो. त्याचे फोटो लावले आहेत पिकासावर. बघुन घ्या. :) http://picasaweb.google.co.uk/zakasrao/TripToGanapatiPuleNearRatnagiri ganesh mandir हा एक अत्यंत सुंदर (माझ्या मते) असा समुद्राचा फोटो देण्याचा मोह आवरत नाहिये :)
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 12364

नवी रेशमी वीण..

Published on शनीवार, 05/01/2008 प्रकाशित मुखपृष्ठ
मंडळी, मागे ऋषिकेश यांनी चारोळीचा सुंदर गोफ विणला होता. आपण सर्वांनी त्यात खूप मदत केली होती. आता या नव्या वीणीमध्येही मदत कराल अशी आशा आहे. पण ही थोडी वेगळी आहे. यात २ नियम आहेत. १. चारोळी ही चारच ओळींची असावी. पाचोळी नको. २. चारोळी लिहिताना त्यामध्ये आधीच्या चारोळीतील एक शब्द आलेला असावा... कृपया नियम मोडू नका.
लेखनविषय:

याद्या 22126
Taxonomy upgrade extras

पी.जे. (अतिशय फालतू जोक)

Published on शनीवार, 05/01/2008 प्रकाशित मुखपृष्ठ
एक शिक्षिका शाळेत शिकवत असतात. शिक्षिका : व्हेल मासा हा जरी मोठा असला तरी तो माणसाला गिळू शकत नाही." छोटी रिया : " पण मॅम, माझा फ्रेंड जॉनला व्हेल माशानेच गिळले होते". शिक्षिका : नाही. कारण व्हेल माशाचा घसा लहान असतो. तो माणसाला नाही गिळू शकत" रिया : पण खरंच जॉनला व्हेलनेच गिळले होते. शिक्षिका : अगं! ते कसं काय? रिया : मी स्वर्गात गेल्यावर जॉनला विचारून सांगते तुम्हाला. शिक्षिका : आणि जॉन स्वर्गाऐवजी नरकात गेला असेल तर..? रिया : तर मग तुम्ही जेव्हा तिथे जाल तेव्हा विचारून सांगा मला. :))))))) ( हा फॉर्वर्डेड मेल मधून आलेला जोक आहे)
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 19178

मिसळपावचा छापील अंक

Published on शुक्रवार, 04/01/2008 प्रकाशित मुखपृष्ठ
मिसळपावची ख्याती आता सर्वदूर पसरली असताना मिसळपावची छापील आवृत्ती ही काढायला हरकत नाही असे मला वाटले.याच विचारातून 'मिसळबोध'(मला सुचलेले) या अंकाची कल्पना मला सुचली.या अंकाद्वारे मिसळपावच्या सदस्यांना आपले साहित्य रसिक वाचकांपर्यंत पोचवायला आणखी एक माध्यम मिळेल. शिवाय... १)महाजालावर साहित्यचोरी मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे बरेचसे लेखक आपले साहित्य प्रसिद्ध करायला धजावत नाहित. २)ज्या रसिक वाचकांना इंटरनेटचा वापर करता येत नाहीत अशा वाचकांपर्यंत आपले विचार व साहित्य पोचेल. सहजच मिसळपावच्या जुन्या लेखांवर नजर टाकली तेव्हा ,शिमगा अंकाची एक संकल्पना वाचनात आली.चांगली वाटली.तुम्हाला काय वाटतं? स

याद्या 4267