अरे कुणीतरी मला अरे-तुरे म्हणा
अरे कुणीतरी मला अरे-तुरे म्हणा रे. ही खंत आहे केवळ माझीच नाही, तर मिसळपाववर येण्यार्या कित्येक गावकर्यांची.
मी सुरुवातीला माझं नाव 'पुष्कराक्ष' असं वापरत होतो. पण नाव मोठं आणि लक्षण खोटं असं वाटायला लागलं. काही जणांनी तर 'पुष्कराक्ष साहेब' वगैरे म्हणायला सुरुवात केली. च्यामारी आता ही तर हाईट होती. पण त्यांचं तरी काय चुकलं म्हणा! हे असलं अडनिडं नाव वाचून मी कदाचित त्यांना कोणीतरी वयस्कर/दाढीवाला/गंभीर प्रवृत्तीचाच माणूस वाटणार! (तसा मीसुद्धा अधनं-मधनं दाढी वाढवतो; दाढी करायचा कंटाळा दुसरं काय!)
मग नंतर मी माझं पुनर्बारसं करून 'पुष्कर' नाव ठेवलं. तरी एकदा कानफाट्या नाव पडल्यामुळे ह्या राव-साहेबांचा ससेमिरा काही सुटला नाही. कधी मी 'पुष्करराव' तर कधी 'पुष्कर साहेब', चुकून कधितरी 'पुष्कर शेठ' सुद्धा झालो. पुष्कर शेठ हे शब्द जेव्हा पहिल्यांदा ऐकले, त्यादिवशी रात्री मला 'मी कुठल्यातरी सावकाराची टोपी डोक्यावर घातलीये, पोट सुटलं आहे, डोळ्यांवर जस्ती काड्यांचा चष्मा लावला आहे, समोर तिजोरीत पैशांची चळत घेतलीये आणि माझ्याकडे उधार मागयला लोक येताहेत' असलं रम्य स्वप्नसुधा पडलं.
मनोज याने पहिल्यांदा मला अरे-तुरे करून आपलासा केलाच आहे. मध्ये एका चर्चा विषयामध्ये सागर आणि डॉ. प्रसाद दाढे यांनीही त्यांना अरे-तुरे करावं असं सांगितलं आहे. मी त्या दोघांपेक्षाही वयानी लहान. पण वयाचा आंतरजालावर काय संबंध म्हणा. मलातरी 'रे' मध्ये जी आपुलकी वाटते ती साहेब-राव मध्ये वाटत नाही. मानाच्या उपाध्या लावण्याइतका मी मोठाही नाही, आणि कधी-मधी तसा होता आलं, तरी सगळ्यांना सांगीन-'बाबा रे! मला अरे-तुरे करा'.
आपल्याला इथे एकमेकांचे चेहरे/स्वभाव एकमेकांना प्रत्यक्ष दिसत नसल्यामुळे समोरच्याला 'अहो जाहो' करणंच सेफ वाटतं. पण माझ्याप्रमाणे ज्यांना अरे-तुरेचं संबोधन (मी तर त्याला उपाधीच म्हणेन) पाहिजे असेल, त्यांनी ह्या चर्चेखाली प्रतिसादरूपी अर्ज करावेत अशी मी समस्त गावकर्यांना विनंती करतो.
वाचने
13096
वाचनखूण
प्रतिक्रिया
23
पुष्क्या....
In reply to पुष्क्या.... by सुनील
हे काय रे!सुन्या...
In reply to हे काय रे!सुन्या... by इनोबा म्हणे
स्वारी .... आणि "म" ची बाधा
In reply to हे काय रे!सुन्या... by इनोबा म्हणे
च्यायला हे काय अजून नवीन ?
"........परत कुणी अशी हाक मारली तर छोट्या डॉन्याला सुपारी देऊन 'गेम' करायला लावेन"
अरे इन्या, हे काय नाटक आहे लेका ? [ आमच्या सोलापुरात कुठल्या 'वि' ने सुरू होणार्या शब्दाचा अपभ्रंश होऊन तो 'इ' ने सुरू होते जसे की इन्या , इक्या , इज्या .... ]
तू तर पार आम्हाला "सुपारी किंग्"बनवून टाकलसं.
इथे आत्ताच आमच्या मागे "१२ मुल्कोकी पुलीस" लागल्याने पार्श्वभागाला पाय लाऊन पळता-पळता आमची पार वाट लागली आहे आणि त्यात तू मला सुपारी देतो म्हणून समद्या दुनवेत [ हा मिरासदारांचा शब्द ] आमच नाव खराब कर ....
म्हंजे निघूदे आमच्या नावाने अजून एक "वॉरंट" आणि होऊदे आमचे "एंन्काऊंटर" .........
छोटा डॉन
[ आम्हाला इथे भेट द्या http://hariprasadcoep.blogspot.com ] याव्यतिरिक्त आमची कोठेही शाखा नाही ...........
In reply to पुष्क्या.... by सुनील
चालेल चालेल
अरे-तुरे
In reply to अरे-तुरे by ब्रिटिश टिंग्या
धन्य झालो
काय रे
In reply to काय रे by विकि
आदरणीय विकीश्वर महोदय,
In reply to आदरणीय विकीश्वर महोदय, by पुष्कर
ऐ पुष्क्या
In reply to काय रे by विकि
हे खरे नाही.
चुकीचा प्रचार करू नको!
In reply to चुकीचा प्रचार करू नको! by प्रमोद देव
काय रे पम्या
In reply to काय रे पम्या by विकि
कृपया शांतता राखा...
In reply to काय रे पम्या by विकि
विकि आजोबा....
In reply to विकि आजोबा.... by प्रमोद देव
प्रमोद देव
अरे कुणीतरी मला अरे-तुरे म्हणा
In reply to अरे कुणीतरी मला अरे-तुरे म्हणा by विसोबा खेचर
अरे तात्या......
In reply to अरे कुणीतरी मला अरे-तुरे म्हणा by विसोबा खेचर
अरे तात्या...
In reply to अरे कुणीतरी मला अरे-तुरे म्हणा by विसोबा खेचर
बॉबी
आवडले मित्रानो
अरे तात्या
पुष्कराक्षस ..................
पुष्कराक्षस हे नाव चालेल का रे पुष्कुबाळा.....
सेमिराक्षस: विजुभाउ