Skip to main content

विडंबनाच्या चर्चेवर विडंबन... मद्यविरहित

लेखक तळीराम यांनी शुक्रवार, 28/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपावच्या कट्ट्यावरती विडंबन दिले तू मला टोपणनावे `तूटून' पडलो ओळखले का मला चतुरंग मी, मी प्राजू ती सुशील, लाडू, खेचर येती नाव भिन्न परी एकच यु(क्)ती मतामतांचा पूर तेधवा कट्ट्यावर पातला घाला बंदी ! नको विडंबन मद्याचे तर नकोच चिंतन मिसळ खाऊ या कांद्यावाचून सुमारकेशव पाठ फिरवता, झोप उडे आजला

उत्क्रांती

लेखक मिनासो यांनी शुक्रवार, 28/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा मी एका कार्यक्रमासाठी गावाला गेलो होतो. कार्यक्रम संपायला रात्रीचे 12 वाजले. मी मित्राला, मला स्टेशनवर सोडायची विनंती केली. तो म्हणाला, एक दिवस कामाला नाही गेलास तर काय होईल? तू उद्या सकाळी पुण्याला जा. मी क्षणभर विचार केला व त्याला एक गोष्ट सांगितली, कोणे एके काळी पृथ्वीवर फक्त एकपेशीय जीव (अमिबा) होते. त्यांना अन्न मिळवण्या शिवाय दुसरे काही करण्यास वेळ मिळत नव्हता. त्यामुळे त्यांनी एकत्र राहून काम वाटून घेण्याचे ठरवले. असा त्यांचा बहुपेशीय जीव तयार झाला. नंतर त्याची वाढ होत गेली व कामेही वाढत गेली. मग आळशी, कामचुकार पेशींची केस, नखे झाली, ताकदवान पेशींचे स्नायू झाले.

उकडीचे मोदक

लेखक शेखर यांनी शुक्रवार, 28/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी उकडीचे मोदक खायचे आहेत का? चला तर मग ते कसे बनवतात ते पाहु. साहित्य ४ वाट्या किसलेला ओला नारळ २ वाट्या कुटलेला अथवा किसलेला गुळ १/२ चमचा वेलदोडे पुड अथवा जायफळ पुड ३ वाट्या तांदुळाचे पीठ ३ कप पाणी ३ चमचे लोणी १/२ चमचा मीठ कृती एका भांड्यात खोवलेला ओला नारळ, गुळ, वेलदोडे पुड अथवा जायफळ पुड एकत्र करा व ते मिश्रण बर्‍यापैकी कोरडे व मोकळे होई पर्यंत गरम करा व नंतर बाजुला ठेवा. हे मिश्रण गरम होई पर्यंत , दुसर्‍या बाजुला एका भांड्यात पाणी गरम करा. त्या पाण्यात चिमुटभर मीठ आणी थोडेसे लोणी टाका. हळुहळू त्या पाण्यात तांदुळाचे पीठ सोडा व ढवळत रहा.

प्लाझ्मा स्क्रीन्////एल सी डी स्क्रीन

लेखक मनापासुन यांनी शुक्रवार, 28/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली दुकानात गेले की गोंधळायला होते. फ्लॅट टी व्ही घेताना प्लाझ्मा स्क्रीन्////एल सी डी स्क्रीन असे दोन ऑप्शन मिळतात. दोन्हीतला फरक दुकानदार सुद्धा सांगु शकत नाही...प्लाझ्मा स्क्रीन्////एल सी डी स्क्रीन यात नक्की फरक्काय? आणि त्यातील कोणती टेक्नॉलॉजी चांगली? शिवाय एकाच कंपनीच्या दोन मॉडेल मधे सुद्धा रंग छटा वेगळ्या दिसतात. हे असे का होते? मनापासुन

चेहरा

लेखक सुवर्णमयी यांनी शुक्रवार, 28/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
आभास फक्त होता, मी थांबले कितीदा माझ्याच सावलीने धास्तावले कितीदा पाने झडून गेली,पक्षी उडून गेले मातीस घट्ट धरूनी मी ठेवले कितीदा गर्दीत माणसांच्या का ओळखू न आला? मी चेहऱ्यास माझ्या धुंडाळले कितीदा पत्ता जुनाच होता, रस्ता तसाच होता मुद्दाम आठवांना सांभाळले कितीदा जाई होऊन वाघ फिरणे होते तसे नफ्याचे ( गाढव मनात त्याच्या ओशाळले कितीदा)

कुणी बाइ गुणगुणले.....रानारानात गेलीबाइ शीळ

लेखक मनापासुन यांनी शुक्रवार, 28/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
कुणी बाइ गुणगुणले..... रानारानात गेलीबाइ शीळ...... बाई या पावसाने ( संगीत/गायक पु ल) ही गाणी कोणाला आठवतात का? असल्यास त्या कविता इथे द्याल का... आपणास मनापासुन धन्यवाद देइन....

मराठी गाणी...आवडती..मनातली!!

लेखक धमाल मुलगा यांनी शुक्रवार, 28/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
अगदी खर॑ सा॑गायच॑ तर जुनी मराठी गाणी अस्सल सोन्याहूनही सु॑दर! पण गेल्या काही दिवसा॑पुर्वी दोन मराठी चित्रपटातली गाणी ऐकली आणि मलातरी खुपच आवडली. वाटल॑ चला आपल्या मिपाकरा॑ना पण सा॑गुया. पहिल॑ गाण॑ आहे "तू निरागस च॑द्रमा" छान वाटल॑ ऐकताना... तू निरागस च॑द्रमा, तू सखी मधुशर्वरी चा॑दणे माझ्या मनीचे , पसरले क्षितिजावरी.... आणि दुसर॑ "हा च॑द्र तुझ्यासाठी" हा च॑द्र तुझ्यासाठी, ही रात तुझ्यासाठी, आरास ही तार्‍या॑ची गगनात तुझ्यासाठी.. चित्रपट बहुधा सावरखेड-एक गाव असावा. तुमची आवडती गाणी?

एक आवडती आणि एक नावडती

लेखक मनस्वी यांनी शुक्रवार, 28/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
जरा हलकेफुलके : मिसळपाव या आपल्या आवडीच्या संकेतस्थळाबद्दल आपली एक आवडती आणि एक नावडती गोष्ट लिहावी. माझ्यापासूनच सुरुवात करते. आवडती : मिसळपाववर सर्व प्रकारचे नमुने आहेत (म्हणजे लेखक, कवि, गायक, वादक, अन्नपुर्णा, बल्लवाचार्य, विडंबक, मजेशीर, विनोदी, रागीष्ट, चिडके, खुशालचेंडू, उद्योगी, रिकामटेकडे, भांडकुदळ, प्रेमळ, चतुर, अभ्यासू, साहित्यिक, डॉक्टर, आयटीवाले, शेअरबाजारवाले, ज्योतिषी, देशस्थ, परदेशस्थ, लहान, थोर....) आणि या सर्वांना मराठीबद्दल अस्मिता आणि अभिमान आहे.

आयुष्य....."सप्टेंबर २००५" ला लिहिलेली एक कविता

लेखक उदय सप्रे यांनी शुक्रवार, 28/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्य तेंव्हा "सायरा बानो" सारखं असतं इकडून तिकडे हिंडण्याचं चकाट्या पिटत फिरण्याचं .....जेंव्हा आपलं वय "एक ते चार" असतं ! आयुष्य मग "गीता बाली" सारखं होतं पुष्कळ वेळ बागडण्याचं, मग पुस्तकांशी झगडण्याचं .....जेंव्हा आपलं वय "पाच ते आठ" असतं ! आयुष्य डोलणार्‍या "वहिदा" सारखं होतं क्षणात गिरकी घेण्याचं , बर्‍याचदां फिरकी घेण्याचं .....जेंव्हा आपलं वय " नऊ ते बारा " असतं ! आयुष्य आता "नूतन" सारखं होतं प्रसंग कित्येक हसण्याचे, अपुर्‍या प्रयत्ना