Skip to main content

कुमार गंधर्व जयंती - चांगला लेख

लेखक मानस यांनी बुधवार, 09/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
स्त्रोत : महाराष्ट्र टाईम्स - एप्रिल ८, २००८ कुमार गंधर्वांची गायकी चित्रित करण्यासाठी एकदा जब्बार पटेल कॅमेरा घेऊन आले. मधु लिमये आणि ज्येष्ठ साहित्यिक विंदा करंदीकर त्यावेळी उपस्थित होते. मैफलीत कॅमेरा पाहून कुमारजींना आश्चर्य वाटले. पंडितजींनी जब्बारना विचारले , कॅमेरात किती मोठा रोल आहे ? थोडक्यात किती वेळाचे गाणे चित्रित करायचे आहे ? जब्बार यांनी सांगितले , पावणे चार मिनिटे. एका चीजेसाठी पावणे चार मिनिट म्हणजे फारच अवघड काम. पण पंडितजींनी घड्याळ लावले आणि सांगितले सुरू करा चित्रीकरण. त्यांनी तराणा सुरू केला. समा बांधली आणि बरोबर २२५ सेकंदात समेवर येऊन गाणे संपविले...

(...लवकर ये!)

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 08/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
कवि प्रदीप यांची सुंदर कविता '....लवकर ये' ही आमची प्रेरणा:) (ग्लासातला बर्फाचा तुकडा मदिरेला विनवतोय अशी कल्पना! म्हणजे शुध्द मराठीत 'ऑन दि रॉक्स!;) रिमझिम तू माझ्यावर; लवकर ये ! हो माझी 'ग्लेनफिडिच'; लवकर ये ! थंडगार एकटाच खणखणतो... देहाची वाफ किती दवडवितो... किणकिणतो, डुचमळतो अन् म्हणतो - -`सोड सोड तू बाटली; लवकर ये `! तेच भक्त; तूच मदिरा त्यांची! पेग 'विसावा' पुन्हा 'पेटली' त्यांची! ऐक जरा; ऐक आरोळी त्यांची! पेग तो आता भर...लवकर ये ! सांग त्यांना वाट किती दावू मी? का सांग; त्यांची वाट अशी लावू मी ? वाट बघत कोरडा का राहू मी ?
Taxonomy upgrade extras

असम्भव

लेखक आंबोळी यांनी मंगळवार, 08/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
हि मालीका सुरवातीला त्यातील गूढतेमुळे बरी होती. पण आता विषय खुप ताणायला लागलेत. सासू-सुनेच्य मालिकेतील मधले २-४ भाग बुडले तरी जसा काही फरक पडत नाही तसे आता या मालिकेचे झाले आहे. त्यातील चान्गली लोके फारच बावळट आहेत. सुलेखाची आई , बाळ,शुभ्रा, प्रिया,इन्स्पेकटर भोसले, डोक्तोर , आदी,आजोबा हे एकमेकाशी या प्रोब्लेम विषयी अजिबात बोलत नाहित. (दुर्दैवाने यातले बरेचसे एकाच घरात रहातात किन्वा दिवसातून किमान एकदा तरी भेटतात.) या उलट सुलेखा लोकान्समोर रडारडी करुन त्याना सहज गन्डवते..... हे फारच बालिश आहे.

माझी फजिती....

लेखक धमाल मुलगा यांनी मंगळवार, 08/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी ! काय मोठ्या हौसेने आलात ना वाचायला, धमाल्याची कशी फजिती झाली ते? हं...असा नाही सोडणार तुम्हाला! इथे आपण आपापली झालेली फजिती एकमेका॑ना सा॑गूया! तेव्हढीच मजा! काय? पटत॑य का? चला, सुरुवात मी करतो. इयत्ता ११वी. टवाळपणाला नुकतेच नवे धुमारे फुटलेले. सकाळी कॉलेजमध्ये गेल्यापासून एकही लेक्चर न करता, माझ्या ल॑गोटीयारसोबत आख्ख॑ कॉलेजभर ऊतमात घालत फिरत होतो. जरा क॑टाळा आला की कुठं चहाच पी, कुठं वडापाव खा असा सुखनैव दिनक्रम चालू होता. साधारणतः दुपारचे ४ - ४:३० झाले असावेत.चहाची तल्लफ आली म्हणून कॅंटीनमध्ये शिरलो.

चैत्र शके १९३० मधील ग्रहराशीप्रवेश

लेखक धोंडोपंत यांनी मंगळवार, 08/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
लोकहो, चैत्र शके १९३० हा महिना विविध ग्रहराशीप्रवेशांनी गाजणारा महिना आहे. मंगळ आणि राहू असे दोन तापदायक ग्रह या महिन्यात राशी बदलत आहेत. नेपच्यून कुंभेत जातोय. मिथुनेत गेले अनेक महिने ठाण मांडून बसलेला मंगळ आता कर्केत जाईल. मिथुनराशीवाल्यांनी बिचार्‍यांनी खूप सोसले आहे. खरेतर साडेसाती संपल्यावर मधुमास येतो. पण शनीमहाराज गेले तरी मंगळमहाराज मिथुन राशीत ठाण मांडून होते. त्यात ते वक्री झाले, स्तंभी झाले आणि आता ३१ जानेवारीपासून मार्गी लागले आहेत. हा कुजस्तंभ फार वाईट असतो. गेल्या काही महिन्यात अनेक मिथुनराशीच्या जातकांच्या पत्रिका आम्ही पाहिल्या. सर्व बिचारे हैराण झालेले.

मॅडोनाला हवंय भारतीय मुल - येक बातमि

लेखक शरुबाबा यांनी मंगळवार, 08/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
'मटेरिअल गर्ल' मॅडोनाला भारताच्या संस्कृतीची भूरळ पडली आहे. तिने भारतातिल एक मुल दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे . दुवा - http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2933868.cms

वासंतिक पेय

लेखक स्वाती दिनेश यांनी मंगळवार, 08/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
वासंतिक पेयाखेरीज चैत्रोत्सव कसा बरं पूर्ण होणार?
प्रकार-१ ५,६ कैर्‍या,साधारण ३ वाट्या साखर/गूळ(कैरीच्या आंबटपणानुसार साखर जास्त घालणे),मीठ,केशर,वेलदोडे कैर्‍या उकडून घ्याव्यात. गर काढावा.मीठ,केशराच्या काड्या,वेलचीपूड घालावी त्याऐवजी केशरवेलची सिरपही वापरू शकता. साखर घालावी,चव पाहून हवी असल्यास अजून साखर घालावी. हा बलक बरणीत भरून फ्रिजमध्ये ठेवला तर ४,५ दिवस राहू शकतो.
Taxonomy upgrade extras

चैत्रोत्सव!

लेखक स्वाती दिनेश यांनी मंगळवार, 08/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
वसंत आल्याची वर्दी कोकिळकुहुने दिली आहेच.मिपावरही 'एप्रिलफळे' आणि 'लोणची' तेच सर्वांना सांगत आहेत. घरोघरी आता चैत्रगौर मांडली जाईल. कैरीचे पन्हे ,आणि द्रोणामध्ये आंब्याची डाळ हळदीकुंकवाचा 'मेन्यु' असेल.ओल्या हरबर्‍यांनी ओटी भरली जाईल आणि घरोघरी चटपटे चणे, हरबर्‍याची उसळही केली जाईल.असा चैत्रोत्सव साजरा होत असताना आंबे पिकल्याची चाहूल लागेल आणि मग आमरसपुरीच्या मेजवान्या झडतील.
Taxonomy upgrade extras