Skip to main content

संडे स्पेशल (उंदियो)

लेखक स्वाती राजेश यांनी गुरुवार, 10/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
उंदियो हा गुजराथी प्रकार आहे..तरला दलाल च्या रेसिपी मधे थोडा बदल केला आहे. साहित्यः १/२ किलो सुरती पापडी १/२ किलो कंद १/४ किलो बटाटे लहान १/४ किलो रताळी १/४ किलो वांगी लहान ३ कच्ची केळी मेथी पकोडा: १ मेथी पेंडी बेसन १ टे.स्पून ओवा, हळद, पाव चमचा खायचा सोडा मीठ मसाला: अर्धा नारळ खोवलेला तीन चतुर्थांश कप कोथिंबीर अर्धा कप पातीचा लसूण(पाती सकट चिरणे) २ टी.स्पून धने पावडर २ टी.स्पून जिरे पावडर १ टे.स्पून हिरवी मिरची, आलं पेस्ट २ टी.स्पून तिखट ४ टी.प्सून साखर १ टे.स्पून लिंबु रस मीठ चवीनुसार हिंग आणि तेल फोडणीसाठी १.प्रथम सुरती पापडी अर्धवट सोलावी.
Taxonomy upgrade extras

उपकरणे घेताना

लेखक वरदा यांनी गुरुवार, 10/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
मला स्वयपाकघरात बर्‍याचशा गोष्टी घेताना कळत नाही काय घ्यावं इथं अमेरीकेत सुमीत चा मिक्सर मिळत नाही (म्हणजे मिळतो पण फारच महाग)आणि बाकीचे साधे मिक्सर जाम रद्दड असतात. अगदी साध्या सुरीत सुद्धा इतके प्रकार असतात की समजत नाही काय घ्याव. मी मेसीज मधून मस्त ४ सुर्‍यांचा सेट आणला आणि तो एवढा घाण आहे १ महिन्यानंतर आता कांदा कापायलाही त्रास होतो. ह्या विकेंडला जाऊन परत द्यावा लागेल. तुम्ही कुठुन कुठल्या ब्रँडची उअपकरणे घेता हे इथे सांगाल का? आणि मग ही कुठलीही उपकरणे असतील अगदी स्क्रू ड्राईव्हर आणि तत्स्म गोष्टी असल्या तरी चालेल. सुरुवात करु कॉफी मेकर आणि मिक्सरने.

भडकमकरांचे करीअर गायडंस वर्ग ..... भंगडा पॉप आर्टिस्ट ... भाग १

लेखक भडकमकर मास्तर यांनी गुरुवार, 10/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या स्पर्धेच्या युगात नवयुवक भांबावून गेला आहे.... मागे पडण्याच्या भीतीने घाबरला आहे, पण आता चिंता नको...आम्ही आलो आहोत आमचे करीअर गायडंस वर्ग घेऊन...प्रत्येक भागात एका नवीन करीअर ची ओळख करून द्यायचा प्रयत्न करू... आपल्याला गायक व्हायचे आहे काय? .. सुरेल गळा नाही, मेहनत नको, गुरूकडे शिकायला वेळ नाही? काही हरकत नाही...

एप्रिल फळ (४)

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 10/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
विजूभाऊंनी सांगितल्याप्रमाणे हे लेखन आता अद्ययवत करण्यात आलेले आहे. - जनरल डायर. बाजारात आंब्यांचा दरवळ असतो. कोठेही नजर फिरवली तरी आंबेच आंबे नजरेस पडतात.

टोमॅटो पुलाव

लेखक प्रभाकर पेठकर यांनी गुरुवार, 10/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः जुना बासमती तांदूळ - २ वाट्या लालबुंद टोमॅटो - ५-६ नग आलं - १ इंच कढी लिंब - २ काड्या काश्मिरी मिरची पावडर - १ टी स्पून (अथवा तिखट रंगहीन असेल तर किंचीत लाल रंग) मीठ - चवीनुसार. साखर - चवीनुसार. तेल - ३ टेबल स्पून जिरं - १ टी स्पून बारीक चिरलेली कोथिबीर - सजावटीसाठी. तयारी: तांदूळ २०-२५ मिनिटे भिजत टाकावेत. गॅस वर पाणी उकळवून त्यात टोमॅटो टाकावेत. २-३ मिनिटे उकळवून ते उकळत्या पाण्यातून काढून बर्फाच्या (किंवा साध्या) पाण्यात टाकावेत.
Taxonomy upgrade extras

भक्ति-शक्ति

लेखक झकासराव यांनी बुधवार, 09/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
भक्ति शक्ति- निगडि येथील हे शिल्प. अर्थात हे पुर्ण शिल्प नाही. ह्याची कल्पना छान आहे. शिवाजी महाराजांच्या मागे मावळे आहेत आणि तुकाराम महाराजांच्या मागे वारकरी आहेत. आणि त्यांची भेट अस शिल्प आहे. हे पुर्ण शिल्प मला एकत्रीत कॅमेर्‍यात बंदिस्त नाही करता आल. त्याला कसलेला आणि अनुभवी छायाचित्रकार हवा :) ध्यास घेवुन आभाळाएवढी कामगिरि करणार्‍या ह्या दोन महामानवाना वंदन करतो.

संस्कृती!

लेखक धनश्रीदिनेश यांनी बुधवार, 09/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल आपण सर्वजण आपल्या मुलाना किति गोष्टी शिकवित असतो. गाणी, नाच, संगणक,विविध भाषा, पण किती जण मुलाना रामरक्षा, गीताश्लोक, हनुमान चालिसा, शिकवितात? अस का होतं , कधि याचा कोणी विचार केलाय का ? आपण मुलाना आपल्या धर्मापासुन वंचित का ठेवित आहोत? मी सध्या कतार मध्ये आहे. गेले १० महिने आहे . एक बघितलय स्पेशियली मुस्लिम , ख्रिश्चन लहानपासुनच कुराण, बायबल शिकवतात, ठरल्यावेळी प्रार्थना करायची म्हणजे करायचीच, आपल्याकडे गीता शिकवतात हे किती जणाना माहिति आहे ?

गे मला गे चंडिके...

लेखक केशवसुमार यांनी बुधवार, 09/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.

आमची प्रेरणा राजा बढे यांची अप्रतिम रचना दे मला गे चंद्रिके...

गे मला गे चंडिके, भीती तुझी
वाटते ही, ऐकुनी कीर्ती तुझी

देहगंधा वारि जाता रे सख्या
हासणे घोड्यापरी रीती तुझी

तुज गळा हा लाभलेला गर्दभी
सुस्वरे अन् रेकिते गीती तुझी

सोशितो मी झीज  केसांची अता
येवढी का बाळगू क्षीती तुझी

कंदील

लेखक आंबोळी यांनी बुधवार, 09/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
साधारण 4 वर्षापूर्वीची कथा आहे. माझे आई-वडील कोकण दर्शनला गेले होते. तीकडून येताना सावंतवाडीवरुन एक लाकडाचा नक्षीदार कंदील घेऊन आले. त्या कन्दीलात बल्ब लावायची सोय आहे. मी लगेच त्यात बल्ब लावून बघितला. सगळ्या घरातल्यानी त्या कंदिलाचे कौतुक केले. मग तो कंदील शोकेसमधे ठेऊन सगळेजण आपापल्या उद्योगाला लागले. पण दुसर्या दिवशी सकाळी आमच्या बाबांचे एक मित्र वारल्याची खबर आली. नंतर साधारण 2-3 महिने तो कंदील शोकेस मधे होता. दिवाळीच्या आगोदर 15 दिवस घरात अशी कल्पना मांडली गेली की नवीन आकाश-कंदील आणायच्या ऐवजी हाच कंदील आत लाइट लावून वापरावा.

एप्रिल फळ (३)

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 09/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
दुपारी मीठ मेतकुट वापरुन केलीली कैर्‍यांची आंबोळी आता थोडी रस्सेदार झालेली असते.....पानापानात ती पंचपक्वनाच्या दिमाखात स्थानापन्न होते.....बाबा एका बोटानेच त्याची चव बघतात्....सगळे एकमेकांकडे पहात असतात्....बाबा थोडावेळ काहीच बोलत नाहीत्...शांतता पसरते आणि बाबा तोंडने एकदम फास्टर फेणीच्या ष्टाईलमध्य टॉsssक्क करतात्..........महराज गडावर पोहोचल्याच्या तोफांचा तो इशारा असतो....छोटे एकदम खुशीत येतात. कैर्‍यांचा गड सर झालेला असतो. कैरी चे लाड इथेच संपत नाहीत.