Skip to main content

स्मार्ट रेस

लेखक विनायक प्रभू यांनी गुरुवार, 25/09/2008 20:12 या दिवशी प्रकाशित केले.
It has been observed that a newborn baby's response to the stimulus provided by the environment has been increasing in leaps and bounds i.e. in the time frame from prenatal stage to neonatal stage, the feotus and later a newborn is receiving various enhansed stimulus that will impact his/her future response in the out side world . The other question yet to be answered properly is the impact of stress the modern would be mother undergoes during pregnancy and its long term impact on psyche of the child. Doctorate in Child Development केलेल्या विदूषी चे उद्गार आहेत हे माझ्या प्रष्नाला.

एका लग्नाची गोष्ट!

लेखक स्वाती दिनेश यांनी गुरुवार, 25/09/2008 19:40 या दिवशी प्रकाशित केले.
लग्न! दाराशी केळीचे खुंट,आंब्याचे टहाळे आणि झेंडूच्या फुलांची तोरणं,पैठण्यांची सळसळ, अत्तराचा दरवळ, करवल्यांचे मिरवणे,भटजींची बोहल्यावरची लगबग, "आता मुलीला आणा... मुलीचा मामा कुठे आहे? " अक्षता, मंगलाष्टका आणि 'तदेव लग्नं..' झालं की 'वाजवा रे वाजवा..' चा इशारा! होमाचा धूर,सप्तपदी, ते ४,५ दा साड्या बदलणे,विहिणींच्या ओट्या, मानपान, रुसवेफुगवे, व्याही भेटी, पंगतीतला आग्रह, जिलेब्यांची ताटे आणि संध्याकाळचे आईसक्रीम! असं किवा यातलं कोणतंच दृश्य जरी मानहाईमच्या चर्च च्या दाराशी अपेक्षित नव्हतं तरी इतकी सामसूम सुद्धा अपेक्षित नव्हती.३ चा मुहुर्त आणि आम्ही २.३० ला तिथे पोहोचलो म्हणजे वेळेतच होतो.

लेकरू

लेखक स्वाती फडणीस यांनी गुरुवार, 25/09/2008 16:50 या दिवशी प्रकाशित केले.
लेकरू ======================== ती इतकी निरागस! ती इतकी सुंदर! ती इतकी बोलकी! ती इतकी चंचल! तिच ते खट्याळ हसणं, तिच ते सशावाणी उड्या मारणं, तिच ते फुलपाखरा सारखं कुणाही भोवती भिरभिरणं. तिचं आई बरोबर बोट धरून फिरणं.. तिच देवळात तल्लीन होवून डोलणं.. तिच कुणाला ही आपलंसं करणं... तिच कुणात ही मिसळून जाणं... तिच माझ्या दिशेनं धावत येणं.. माझं घाबरत पुढे सरकणं तिच्या आईच्या डोळ्यात डोकावणारी उदास खंत एकदा बोलली ती माझ्याशी... आता मी आहे. पण माझ्या पुढं? चाळीस पंचेचाळिशीचं लेकरू सांभाळू तरी कसं!! ======================== स्वाती फडणीस ................... ११-०३-२००८
Taxonomy upgrade extras

सिनेमा पॅराडिसो.. काही प्रकाशचित्रे

लेखक भडकमकर मास्तर यांनी गुरुवार, 25/09/2008 14:49 या दिवशी प्रकाशित केले.
सिनेमा पॅराडिसो ... इटालियन फ़िल्म... १९९० चे बेस्ट फॉरीन फ़िल्मचे ऑस्कर घेतले या फ़िल्मने... अप्रतिम सिनेमा आहे. जरूर बघा... या फ़िल्मचे काही कॅप्चर्स मी काढले आहेत आणि मी स्वतः मिक्स करून काही फोटो तयार केले आहेत ते इथे डकवतोय....त्यामुळे हा धागा कलादालनात टाकला आहे ... साल्वाटोर नावाचा इटलीतला मोठा सिनेदिग्दर्शक .....३० वर्षांनी तो गावात पुन्हा परतला आहे... त्याच्या लहानपणाची, सिनेमा शिकण्याची, घडण्याची फ़्लॆशबॆक तंत्राने सांगितलेली ही गोष्ट आहे...

ओट फ्लेक्सची बिस्किटे

लेखक स्वाती दिनेश यांनी गुरुवार, 25/09/2008 14:06 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य - २५० ग्राम ओट फ्लेक्स,२०० ग्राम बटर,१२५ ग्राम साखर, १२५ ग्राम मैदा,२ टीस्पून बेकिंग पावडर,१ अंडे,१चिमूट मीठ वॅनिला अर्क १.५ चमचा कृती - मैदा+बेकिंग पावडर+१ चिमूट मीठ एकत्र करणे.बटर गरम करम करणे,त्यात हा बे.पा.+मीठ घातलेला मैदा घालणे, ओटफ्लेक्स घालणे,अंडे फोडून घालणे,वॅनिला अर्क व साखर घालणे व सगळे मिश्रण एकत्र करणे‌. बेकिंग ट्रे मध्ये बेकिंग पेपर ठेवणे.एका टेबलस्पूनमध्ये जेवढे मिश्रण येईल तेवढे एका बिस्किटासाठी बेकिंगपेपरवर स

खरडफळ्याचे संपादन अधिकार....

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 25/09/2008 13:48 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मिपाकर सभ्य स्त्रीपुरुषहो, आम्हाला कळवण्यास अत्यंत आनंद होतो आहे की मिपा कार्यकारिणी समितीचे सर्व सभासद, आणि आनंदयात्री जैनांचं कार्ट, १_६ विक्षिप्त अदिती या तिघांना खास करून खरडायच्या फळ्याच्या संपादनाचे सर्व अधिकार बहाल करण्यात येत आहेत.

अनुवाद मदत हवी आहे.

लेखक नीलकांत यांनी गुरुवार, 25/09/2008 12:11 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, लोकायत.कॉम हे मराठीतून संगणक तंत्रज्ञान विषयक लेखन करण्यासाठीचं संकेतस्थळ आहे हे आपणा सर्वांना माहितीच आहे. सध्या या संकेतस्थळावर वेगवेगळ्या विषयावर लेख लिहीने चाललेले आहे. यापैकी एक लेखमाला आहे मुक्तस्रोत सॉफ्टवेअर्स बद्दल. मुख्यतः लिनक्स विषयी मराठीतून तपशीलवार माहिती देण्याचा विचार आहे. हे करतांना एक अडचण जाणवली , ती म्हणजे या मुक्तस्रोत चळवळीचं सार सांगणार्‍या यांच्या परवाण्याचं मराठी भाषांतर उपलब्ध नाही आहे. मी लिनक्स कसं वापरावं याबद्दल लिहू शकतो मात्र या कायदेशीर परवाण्याचं मराठी भाषांतर करणं मला कठीण आहे.

बेकिग पावड्रर आणि बेकिग सोडा

लेखक किर्ति यांनी गुरुवार, 25/09/2008 11:50 या दिवशी प्रकाशित केले.
:? मला कुणी सान्गु शकेल का कि बेकिग पावडर आणि बेकिग सोडा यात फरक काय आहे कारण मी बरयाच केक मधे वाचले आहे दोन्हि वापरतात प्लिज हेल्प

पुण्याला जात आहात... तेथील भामट्यांपासून सावध राहा' !!!!!!!

लेखक छोटु यांनी गुरुवार, 25/09/2008 11:40 या दिवशी प्रकाशित केले.
खाली ल बातमी ही म.टा.मधे आलेली !!! 'सायबर भामट्यां'चा व्हायरस! पुण्याला जात आहात... तेथील भामट्यांपासून सावध राहा', असा इशारा देण्याची रीत तशी जुनीच. फसवणूक करणाऱ्यांसाठी, इतरांना गंडा घालणाऱ्यांसाठी 'पुणेरी भामटा' हा शब्द रूढच झालेला. काळाच्या ओघात बदलत गेलेल्या पुण्यासोबत गंडा घालण्याची रीतही बदलली असून 'आयटी हब' झालेल्या या शहरातील 'सायबर भामट्यां'चा सुळसुळाट ही सगळ्यांसाठीच डोकेदुखी होऊन बसली आहे. सन १६६५ ते १९७५ या काळात पुण्यात मोठे बदल झाले.