अनुवाद मदत हवी आहे.
नमस्कार,
लोकायत.कॉम हे मराठीतून संगणक तंत्रज्ञान विषयक लेखन करण्यासाठीचं संकेतस्थळ आहे हे आपणा सर्वांना माहितीच आहे. सध्या या संकेतस्थळावर वेगवेगळ्या विषयावर लेख लिहीने चाललेले आहे.
यापैकी एक लेखमाला आहे मुक्तस्रोत सॉफ्टवेअर्स बद्दल. मुख्यतः लिनक्स विषयी मराठीतून तपशीलवार माहिती देण्याचा विचार आहे. हे करतांना एक अडचण जाणवली , ती म्हणजे या मुक्तस्रोत चळवळीचं सार सांगणार्या यांच्या परवाण्याचं मराठी भाषांतर उपलब्ध नाही आहे. मी लिनक्स कसं वापरावं याबद्दल लिहू शकतो मात्र या कायदेशीर परवाण्याचं मराठी भाषांतर करणं मला कठीण आहे. त्यासाठी मिसळपाव वरील मित्रांना / वरिष्ठांना या परवाण्याचं मराठी भाषांतर करून देण्याची विनंती करीत आहे.
मुक्तस्रोत आणि त्या मागचा विचार जाणण्यासाठी ह्या परवाण्याचा उपयोग होईल असं वाटतं. मुक्तस्रोता मागची भूमीका सुध्दा लक्षात येईल. अनेक लोकांना या लेखाद्वारे लिनक्सची ओळख होईल. ओळख होतानाच त्या लोकांपर्यंत मुक्तस्रोतामागची भूमीका पोहोचली तर कदाचित मुक्तस्रोतात योगदान देणार्या मराठी संख्येत वाढ होईल आणि मराठीला त्याचा लाभ होईल.
अनुवाद खुप साचेबंद असावा का नसावा ते तुम्ही ठरवा. मात्र मुख्य हेतू आहे की त्या परवाण्यातील गाभा या अनुवादात असावा. त्या अनुवादासोबत मुळ परवाण्याचा दूवा देण्यात येईलच. त्यामुळे खुप कसरती कराव्या लागणार नाहीत.
मात्र या दस्तऐवजाला संदर्भमुल्य लाभू शकतं त्यामुळे ते अधीक आखीव असावं अशी कुणाची भूमिका असेल तर त्यावर सुध्दा विचार होऊ शकतो.
हे परवाणे जरा लांब आहेत.
लिनक्स जीएनयु लायसन्स : ३००० शब्द
जीपीएल : ५६६० शब्द
त्यामुळे एकट्याने हे काम न करता काही लोक एकत्र येऊन केल्यास लवकर होईल आणि या विषयावर चर्चा सुध्दा करता येईल.
परवाण्याचे दूवे देत आहे.
जीएनयु लायसन्स येथे आहे. http://www.linux.org/info/gnu.html
जीपीएल येथे आहे. http://www.gnu.org/copyleft/gpl.html
नीलकांत
वाचने
7642
वाचनखूण
प्रतिक्रिया
27
मी मदत करू
नीलकांत,
मी पण मदत
In reply to मी पण मदत by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
अवांतर
मी पण ...
मीही
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
मी ही मदत
In reply to मी ही मदत by विजुभाऊ
अवांतर
मदत करू शकेन
मी भाषांतर करू शकेन
याचाही अनुवाद
नीलकांत
मलाही सहाय्य करायला आवडेल.
ग्नू लायसन्स
काही अनुवाद
In reply to काही अनुवाद by धनंजय
अरेच्या
आता पर्यंत...
मला सुद्धा आवडेल
प्रोग्रॅम
चालेल.
आता पर्यंत
काही शब्दांसाठी
In reply to काही शब्दांसाठी by ३_१४ विक्षिप्त अदिती
-
आढावा.
सध्यस्थिती
In reply to सध्यस्थिती by नीलकांत
अनुवाद
अरेच्च्या..