मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पुण्याला जात आहात... तेथील भामट्यांपासून सावध राहा' !!!!!!!

छोटु · · काथ्याकूट
खाली ल बातमी ही म.टा.मधे आलेली !!! 'सायबर भामट्यां'चा व्हायरस! पुण्याला जात आहात... तेथील भामट्यांपासून सावध राहा', असा इशारा देण्याची रीत तशी जुनीच. फसवणूक करणाऱ्यांसाठी, इतरांना गंडा घालणाऱ्यांसाठी 'पुणेरी भामटा' हा शब्द रूढच झालेला. काळाच्या ओघात बदलत गेलेल्या पुण्यासोबत गंडा घालण्याची रीतही बदलली असून 'आयटी हब' झालेल्या या शहरातील 'सायबर भामट्यां'चा सुळसुळाट ही सगळ्यांसाठीच डोकेदुखी होऊन बसली आहे. सन १६६५ ते १९७५ या काळात पुण्यात मोठे बदल झाले. वाढते औद्योगिकरण दुष्काळ या घटकांमुळे ग्रामीण भागातील लोक पुण्याकडे वळले. बेरोजगारी भेडसावू लागल्याने गैरमार्गाने, फसवून पैसा कमवण्याचे प्रकार सुरू झाले. या फसवणुकीच्या ठराविक पद्धती होत्या. रस्त्यावर सोन्याच्या बांगड्या किंवा पाटल्या ठेवायच्या. रस्त्यावरून जाणाऱ्या कुणी त्या घेतल्यास 'थांब...पोलिसांना सांगतो' अशी भीती दाखवायची. मग घाबरलेली व्यक्ती त्याच्याकडे असलेले पैसे आणि वस्तू देऊन स्वत:ची सुटका करून घ्यायची! याशिवाय अंगावर चिखल, घाण टाकून लक्ष विचलित करून लुबाडण्याचे प्रकारही होत असत. याच पुणेरी भामटेगिरीचे नवे अवतार सायबर विश्वात अवतरले आहेत. पुण्यात आयटी पार्क झाल्यानंतर विविध राज्यांमधील तरुणांचे लोंढे पुण्यात येऊ लागले. त्यांतील अनेक सायबर गुन्ह्यांत गुंतले आहेत. ठिकठिकाणच्या सायबर कॅफेंमध्ये जाऊन काहीजण गुन्हे करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. डेबिट किंवा क्रेडिट कार्डांचा पासवर्ड मिळवून त्याद्वारे एटीएम सेंटरमधून लाखो रुपयांची लूट करणाऱ्यांचे प्रमाण वाढते आहे. याशिवाय बेबसाइट हॅक करणे, बनावट ई-मेल पाठवून फसवणूक करणे असेही प्रकार सुरू आहेत. या 'सायबर भामट्यां'ना आळा घालणे, हे एक मोठेच आव्हान पोलिसांपुढे उभे राहिले आहे. अहो पण हे जे काही लिहीले आहे ते खरे का !! तुम्हाला काय वाट्ते मिपा कर !!! तुमचा छोटू !!!

वाचन 6326 प्रतिक्रिया 0