Skip to main content

आवरताना काल मिळाल्या काही कविता...

लेखक अनिरुद्ध अभ्यंकर यांनी बुधवार, 29/10/2008 18:16 या दिवशी प्रकाशित केले.
आवरताना काल मिळाल्या काही कविता लिहिलेल्या मी सार्‍या होत्या तुझ्याच करता लिहायचो मी पत्र तुला दररोज पानभर जपुनी ठेवली ती सारी मी न पाठवता तुझ्या संगती घालवलेले क्षण सोनेरी आले नाही कधीच पण ते मज गोठवता दिलेस तू ते फूल आजही वहीत आहे गंध तुझा मज करतो वेडा वही उघडता अजून येती डोळ्यांमध्ये अश्रू अवचित वाट वेगळी करणारा तो क्षण आठवता कधी एकटा असलो की मी रडून घेतो सवयीने मग येते आता हुकुमी हसता खूप ठरवले सारे सारे विसरायाचे कुणास आले सांगा पहिले प्रेम विसरता? -अनिरुद्ध अभ्यंकर

लक्ष्मीपूजन कसं केलत?

लेखक येडा खवीस यांनी बुधवार, 29/10/2008 18:05 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार काल "लक्ष्मीपूजन" होतं...पुजनाची वेळ संध्याकाळी ०६.०५ ते ०८.३८ होती. तुम्ही घरी लक्ष्मीपुजन केलं का ? आणि नेमकं कसं केलतं? आमच्याकडे... श्रीयंत्र पुजन, नैवेद्य, श्रीसुक्ताच्या १६ आवृत्त्या, लक्ष्मीकवच, महालक्श्म्याष्टक पठन करुन नंतर श्रीविद्येच्या मुलमंत्राचा जप केला आणि प्रार्थना केली..

युपीच्या कामगाराचा मारहाणीत मृत्यु.....

लेखक ब्रिटिश टिंग्या यांनी बुधवार, 29/10/2008 16:52 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, नुकतीच मटामध्ये ( http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3651344.cms ) ही बातमी वाचण्यात आली. धरमदेव राय या युपीच्या कामगाराचा काही मराठी तरुणांची केलेल्या मारहाणीत मृत्यु झाला.

मी हिन्दु आहे का?आणि कशासाठी?

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 29/10/2008 13:31 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर बर्‍याच साधक बाधक चर्चा होत असतात. हल्ली काही सनातन विचारांचे लोक कोणत्याही प्रश्नाचा संबन्ध हिन्दु असण्याशी जोडतात. महाराष्ट्रासारख्या विवीधतेने नटलेल्या प्रदेशात असंख्य प्रकारचे लोक रहातात. बहुतेक सगळे जण मूलतः कधीतरी हिन्दु च होते. राजकीय/ आर्थीक/ झुंडशाही/ दडपशाही मुळे काहींच्या पूर्वजानी अन्य धर्म स्वीकारले. त्यांच्या चाली रीति बदलल्या.आजच्या घडीला सनातन विचारप्रणाली प्रमाणे हिन्दु धर्म हाच सर्वश्रेष्ठ आहे खरेतर आजच्या घडीला सर्वच धर्म कालबाह्य झाले आहेत. ते ज्याकाळे निर्माण झाले ती राजकीय भौगोलीक परिस्थिती आता राहिली नाही.

"झुंजुमुंजु" चा दिवाळी अंक.

लेखक रामदास यांनी बुधवार, 29/10/2008 13:12 या दिवशी प्रकाशित केले.
आपले मिपा सदस्य श्री.उदय तानपाठक यांचा दिवाळी अंक "झुंजुमुंजु" प्रकाशीत झाला आहे.श्री. तानपाठक केवळ हौशीपोटी आणि मराठीच्या प्रेमापोटी दरवर्षी हा अंक प्रकाशीत करतात.(दिवाळी अंकाचे अर्थशास्त्र सर्वसाधारणपणे तूटीच्या अंदाजपत्रकाचे असते). आपली नोकरी सांभाळून वेळच्यावेळी ,चुका टाळून,(मराठीतील एका लोकप्रिय दिवाळी अंकात प्रकाशक एक पान घालायचे विसरले आहेत.),रास्त किमतीत हा दिवाळी अंक त्यांनी आणला आहे. आता या अंकाच्या खास गोष्टी.

रांगोळी प्रदर्शन - वर्तमानाचे प्रतिबिंब

लेखक सर्वसाक्षी यांनी बुधवार, 29/10/2008 12:06 या दिवशी प्रकाशित केले.
रांगोळी! मराठी माणसाच्या दिवाळीमध्ये नवे कपडे, फराळ, अभ्यंगस्नान, उटणे व दिवाळीअंक यांच्या इतकेच महत्वाचे स्थान रांगोळी व रांगोळी प्रदर्शनाला आहे. सध्या ठाणे येथे न्यु गर्ल्स स्कूल येथे रांगोळी प्रदर्शन सुरू आहे. गेली अनेक वर्षे मी हे 'बलवंत मित्रमंडळ' आयोजित प्रदर्शन महापालिका शाळा क्र. १९ येथे पाहत आलो आहे. यंदा शाळेचे पुनर्निर्माण कार्य सुरू असल्यामुळे प्रदर्शनाचे स्थळ बदलले आहे इतकेच, मात्र त्यातल्या कलाकारांचा सामाजिक दृष्टिकोन मात्र तसाच आहे.

आता संघटित होणे, ही काळाची गरज !

लेखक सनातन यांनी बुधवार, 29/10/2008 10:21 या दिवशी प्रकाशित केले.
अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणार्‍या `झी मराठी' या दूरचित्र वाहिनीवरील `आयडिया सारेगमप लिटल चॅम्प' ही स्पर्धा सध्या चर्चेत आहे. या स्पर्धेत पनवेल येथील कु. मुग्धा वैशंपायन ही को.ए.सो. के.व्ही. कन्याशाळेची विद्यार्थिनी अंतिम फेरीत पोहोचली आहे. त्यासाठी तिचे कौतुक करावे, यात दुमत नाही; परंतु याचाच फायदा घेऊन तिला अंतिम फेरीसाठी शुभेच्छा व जिंकून येण्यासाठी जास्तीतजास्त लघुसंदेश पाठवा, या आशयाची भित्तीपत्रके सर्व पनवेल भागात लावण्यात आली आहेत, तसेच तो कसा करायचा ? याची इत्थंभूत माहिती त्यात दिली आहे.

कार्तिक शुद्ध प्रतिपदा

लेखक सनातन यांनी बुधवार, 29/10/2008 10:17 या दिवशी प्रकाशित केले.
आज कार्तिक शुद्ध प्रतिपदा. हा दिवस बलीप्रतिपदा म्हणून ओळखला जातो. हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त आहे. हा दिवस `विक्रम संवत' कालगणनेचा वर्षारंभदिन म्हणून साजरा करतात. आज आपण बलीप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा या सणाचा इतिहास व हा सण साजरा करण्याची पद्धत यांविषयी माहिती पाहूया. बलीप्रतिपदा (दिवाळी पाडवा)इतिहास बलीराजा हा अत्यंत दानशूर होता. दारी येणारा अतिथी जे मागेल ते दान तो त्याला देत असे. `दान देणे' हा गुण आहे; पण गुणांचा अतिरेक हा दोषार्हच असतो. कोणाला काय, केव्हा व कोठे द्यावे, याचा निश्चित विचार आहे व तो शास्त्रात आणि गीतेत सांगितलेला आहे. सत्पात्री दान द्यावे.

'वेन्स्डे' जरूर पाहा

लेखक डॉ.प्रसाद दाढे यांनी बुधवार, 29/10/2008 09:09 या दिवशी प्रकाशित केले.
कालच बहुचर्चित 'वेन्स्डे' चित्रपट पाहिला. निव्वळ अप्रतिम आहे. सुजाण रसिका॑नी अवश्य पहावा. हा चित्रपट केवळ दीड तासाचाच आहे. गाणी, हिरो, हिरॉईन, कवायत नृत्ये नाहीतच. अनुपम खेर व नसरूद्दिन शाह या॑च्या कसलेल्या अभिनयाने चित्रपट अपेक्षित उ॑ची गाठतो हे सा॑गण्याचीही गरज नाही. सध्या सगळ्या जगाला ग्रासणार्‍या इस्लामी दहशतवाद ह्या समस्येवर हा चित्रपट आहे. दिग्दर्शकाचा (नीरज पा॑डे) या विषयाचा व एकूणच अतिरेकी आणि त्या॑च्या विरूद्ध लढणार्‍या पोलीस य॑त्रणेच्या कार्यपद्धतीचा सखोल अभ्यास सतत जाणवत राहतो.