अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणार्या `झी मराठी' या दूरचित्र वाहिनीवरील `आयडिया सारेगमप लिटल चॅम्प' ही स्पर्धा सध्या चर्चेत आहे. या स्पर्धेत पनवेल येथील कु. मुग्धा वैशंपायन ही को.ए.सो. के.व्ही. कन्याशाळेची विद्यार्थिनी अंतिम फेरीत पोहोचली आहे.
त्यासाठी तिचे कौतुक करावे, यात दुमत नाही; परंतु याचाच फायदा घेऊन तिला अंतिम फेरीसाठी शुभेच्छा व जिंकून येण्यासाठी जास्तीतजास्त लघुसंदेश पाठवा, या आशयाची भित्तीपत्रके सर्व पनवेल भागात लावण्यात आली आहेत, तसेच तो कसा करायचा ? याची इत्थंभूत माहिती त्यात दिली आहे. अनेक वाहिन्या व भ्रमणध्वनी कंपन्या लोकांच्या भावनांना हात घालून प्रचंड नफा मिळवतात, हे मागेच `इंडीयन आयडॉल' या कार्यक्रमात समोर आले आहे; परंतु नाटके व चित्रपट यांतून होणारे देवतांचे विडंबन रोखण्यासाठी अशी भित्तीपत्रके लावून विडंबन रोखता आले असते. करमणुकीच्या कार्यक्रमासाठी लघुसंदेश पाठवून ५ रुपये खर्च करणारे एक रुपयाचा दूरध्वनी करून वाहिन्यांवरील विडंबनाचा निषेध नोंदवू शकतात. आज देशात फटाके फुटल्याप्रमाणे दहशतवादी बाँबस्फोट करत आहेत. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी कधी असे फ्लेक्स लावून आवाहन केल्याचे दिसत नाही. राष्ट्र व धर्म संकटात असतांना अशा प्रकारे अनावश्यक गोष्टींवर खर्च करणे योग्य वाटते का ? अशी वेळ उद्या आपल्यावर आल्यास आपल्यालादेखील कोणी मदत करणार नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे. म्हणून राष्ट्र रक्षणासाठी संघटित होणे, ही काळाची गरज आहे.
वाचने
4204
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
पहील्यांद
कार्य
राष्ट्र व
सनातन तुमचा मुद्दा अगदी योग्य आहे.
ह्यालाच बांग देणे म्हणतात.
आमच्या
In reply to ह्यालाच बांग देणे म्हणतात. by वेताळ
प्रति
>>>क्रुपया
In reply to प्रति by सनातन
धंधा
In reply to >>>क्रुपया by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
बरोबर आहे
In reply to धंधा by विनायक प्रभू
असे काही नाही.
चुकिचा समज
राष्ट्र रक्षणासाठी संघटित होणे, ही काळाची गरज आहे
एकच उपाय