Skip to main content

खिडकी

लेखक अनन्त्_यात्री यांनी शुक्रवार, 19/03/2021 12:57 या दिवशी प्रकाशित केले.
क्षितिजावरचा निळसर पर्वत कातळमाथा ढगात घुसळत भूशास्त्राला कोडी घालत खोल ठेऊनी लाव्हा धुमसत पुरातनाचे सूक्त गुणगुणत नभरेषेवर उंच उसळुनी दिसे अनाहूत माझ्या खिडकीत निळे पाखरू पहाटफुटणीत पंखभिजवत्या दवास झटकत चोच मुलायम पिसात फिरवीत पंखांतील अचपळ बळ जोखीत साद घालुनी अधीर, अवचित नभांगणाला उभे छेदुनी उतरे अलगद माझ्या खिडकीत आखीव रेखीव खिडकी चौकट निळ्या नभाचा कापुनी आयत इंद्रजाल निळसर पसरवुनी जड चेतन द्वैताला मिटवीत

स्त्रीत्वाचा सन्मान

लेखक ज्योति अळवणी यांनी शुक्रवार, 19/03/2021 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
स्त्रीत्वाचा सन्मान नका होऊ नतमस्तक मी कोणी देवता नाही.. नका म्हणू अष्टभुजा; मी काली-भवानी नाही! कधी मखरात... कधी वेश्यागारात... मान मात्र कधीच नाही! मनुष्य जन्म माझा ही; एवढंच स्वीकारणं का शक्य नाही? जग तुझ्या मनासारखं... तुला कोणतंही बंधन नाही! एकदा तिला हे सांगून तर बघा... अवकाशला गवसणी घालणं खरंच अशक्य नाही!!!

पुस्तकं की Audio Books?

लेखक आगाऊ म्हादया...... यांनी शुक्रवार, 19/03/2021 10:40 या दिवशी प्रकाशित केले.
Storytel, Amazon audible बुक्स ह्या गोष्टी आपल्याला फारशा नवीन राहिलेल्या नाहीत, किमान ऐकून तरी माहित झाल्या आहेत. मी उत्सुकतेपोटी हे प्रकरण नेमकं आहे तरी काय हे बघावं म्हणून किमान ६ महिने वापरून बघितलं आहे. अनेकांनी मला विचारलं की “कसं वाटतं रे audio book ऐकताना?”, मी ही तेव्हा नेमका ह्याच प्रश्नावर विचार करत होतो. काहीतरी राहून जातंय असं काहीतरी जाणवायचं मला पण audio book ही सोय चांगली वाटायची. म्हणूनच मला त्याबद्दल नेमकं काय वाटतं हे ठरवायला बराच वेळ लागला. आपण पुस्तक वाचतो नेमकं काय करतो? सुरुवात होते मुखपृष्ठ न्याहाळण्यापासून. चित्र, लेखक आदी गोष्टी मनात साठवत आपण मलपृष्ठ बघतो.

भीड......

लेखक कर्नलतपस्वी यांनी शुक्रवार, 19/03/2021 01:02 या दिवशी प्रकाशित केले.
पता नही था कि दिन भर गये है। चलो बुलावा आया है,यमदूत आये , उसे चलने के लिए बोले। बंदा बोला जनाब इतनी भी क्या जल्दी है। अभी आये हो मेहमान नवाजी तो करने दो। जिंदगी मे एक बार ही आते हो। खातीर तवाजा करना हमारी फितरत है। यमदूत बोले हमे उल्लू मत बनाओ। जिस शाख पर तुम बैठे हो कुछ दिन पहले वो हमारी थी। हमे पता था तुम कहां होंगे इसलीये हमारी ड्युटी लगी है। जब रियायत हमे नही मिली तो तुम्हे क्यू?

एक विचार

लेखक कर्नलतपस्वी यांनी गुरुवार, 18/03/2021 07:29 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे एक निसर्ग प्रेमी मीत्र, यांनी ट्विटर वर गुलबक्षीच्या फुलांबद्दल माहिती दिली. वाचता वाचता सहज एक विचार डोक्यात आला आणी मन पन्नास वर्षे मागे गेल.विचार आला की नाती कशी असावीत, गुलबक्षीच्या वेणीसारखी, सहजपणे एकमेकात गुंफलेली . लहानपणी आमच्या परसदारी गुलबक्षीची रोपे होती. झुडूपवर्गीय, नाजुकशी ,हिरवीगार पाने, नाजुक , रंगबिरंगी फुलांनी बहरलेली. फुलांचे रूपांतर हलक्याफुलक्या काळ्या छोट्या बियां मधे व्हायचे. ती छोटीशी बि बंद ओठांवर ठेवून फुकंरीने जास्तीत जास्तं वर उडवायची आसा आम्हां मुलांचा खेळ. फुले फुलण्याची वेळ साधारण संध्याकाळी चार साडेचार वाजता.

४. रेव्ह. रॉबर्ट काल्डवेल : द्रविड चळवळ, तमिळींची प्रादेशिक आणि राजकीय अस्मिता

लेखक चौथा कोनाडा यांनी बुधवार, 17/03/2021 18:13 या दिवशी प्रकाशित केले.
आधीचा भाग: ३. रेव्ह. रॉबर्ट काल्डवेल : तमिळ भाषाभ्यास व द्रविडी भाषांचे तुलनात्मक व्याकरण तमिळ भाषा शिकल्यानंतर त्यांनी त्यातील साहित्यावर मनापासून प्रेम केले आणि त्याच्या वैशिष्ट्यावर संशोधन करण्यास सुरवात केली. " द्रविडी भाषा समुह " हा शब्दप्रयोग करणारे ते पहिले भाषा अभ्यासक होते. तमिळ बरोबरच त्यांनी तेलगू, कन्नड आणि मल्याळममधील समानतांबद्दल प्रचंड संशोधन केले.

चाफा-पंचप्राण

लेखक Bhakti यांनी बुधवार, 17/03/2021 18:03 या दिवशी प्रकाशित केले.
चाफ्याच्या पाच पाकळ्यांनी एकत्रितपणे पंचप्राण पेलले आहेत.याचा गंध कोमलपणा ,बहरण्याची मुक्त छटा आपल्या पंचइंद्रीयांना अमूर्त आनंद देते.देवचाफा ,गुलाबी रंगाचा चाफा ,सोनचाफा या प्रकारच्या फुलांच्या सुगंधाच्या राशींनी परिसर घमघमला आहे.वसंतोत्सवामध्ये चाफ्याच्या फुलांची रेलचेल फांद्याफांद्यावर दिसते.दगडाला पाझर फुटणे जसे ओलावा देते,तसेच डहाळीवर चाफ्याची असंख्य फुललेली फुले ओबड धोबड फांद्यांची शोभा वाढवतात. काहीसा पोपटी देठ मनामध्ये सुखाची नांदी सांगतो.तर अर्धोन्मिलित उमललेल्या अवस्थेतील सोनचाफा समाधिस्त भासतो. चाफ्याच्या फुलांनी परसबागा ,उद्याने,मंदिरे राऊळे अगद

Smart Watch

लेखक NiluMP यांनी मंगळवार, 16/03/2021 16:27 या दिवशी प्रकाशित केले.
नविन Smart Watch घावयाचा आहे बजेट ३००० ते ५०००. Requirements Activity Accuracy तगडी लाईफ Good Touch interface Good Looks

भयकथा १ : ऋण

लेखक साहना यांनी मंगळवार, 16/03/2021 12:57 या दिवशी प्रकाशित केले.
गावाच्या गोष्टींना मिळालेला उदंड प्रतिसाद पाहता एक नवीन मालिका सुरु करावीशी वाटली. गावाच्या गोष्टी संपल्या नसून आणखीन अनेक गोष्टी आहेत. यथावकाश प्रकाशित करेन. ह्या आधी भयकथा लिहिल्या नसल्याने हा नवीन प्रयोग करत आहे. नेहमीप्रमाणे चांगले वाईट प्रतिसाद द्यावेत. भयकथा लिहिणे कठीण गोष्ट आहे. विनोदी लिहिणे किंवा कारुण्यपूर्ण लिहिणे त्यामानाने सोपे, कारण एक चांगला विनोद सर्वानाच विनोदी वाटतो किंवा एखादी दुःखद कथा बहुतेकांच्या हृदयाला स्पर्श करून जाते. पण भयाचे तसे नाही. काही लोकांना सापाची भीती वाटते तर काहींना अंधाराची. काहींना उंचीची भीती वाटते तर काही लोकांना विदूषकाची.

मनोज दाणींच्या पानिपतवरील चित्रमय ग्रंथातील काही अन्य पेंटींग्ज - विजय सिंह गायिकांच्या संगीताचा

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 16/03/2021 12:37 या दिवशी प्रकाशित केले.
आस्वाद घेत आहेत असे दाखवणारे हे राजस्तानी शैलीचे पेंटींग आहे. ओक आणि मनोज दाणींचा व्हॉट्स अॅपवरचा संवाद ओक- ४९ वरील चित्राचे सूक्ष्म निरीक्षण करताना पाहून वाटते की त्यातून वेगवेगळ्या घटनांचा, काळाचा संदर्भ असावा. दाणी - paan 47 na? ti mulgi nasun rani asnyachi shakyataa pan aahe ! ओक - पसंद अपनी अपनी... ते चित्र असेच आहे कि त्यातून अनेक शक्यता दिसाव्यात. दाणी - museum title says a harem scene ... ओक - प्रत्येक गोष्टीला काळ वेळ लागते. सायंकालीन नृत्य, नाट्य, संगीत महफिल सकाळच्या लोटा परेडच्या वेळी शोभत नाहीत.