चाफा-पंचप्राण
चाफ्याच्या पाच पाकळ्यांनी एकत्रितपणे पंचप्राण पेलले आहेत.याचा गंध कोमलपणा ,बहरण्याची मुक्त छटा आपल्या पंचइंद्रीयांना अमूर्त आनंद देते.देवचाफा ,गुलाबी रंगाचा चाफा ,सोनचाफा या प्रकारच्या फुलांच्या सुगंधाच्या राशींनी परिसर घमघमला आहे.वसंतोत्सवामध्ये चाफ्याच्या फुलांची रेलचेल फांद्याफांद्यावर दिसते.दगडाला पाझर फुटणे जसे ओलावा देते,तसेच डहाळीवर चाफ्याची असंख्य फुललेली फुले ओबड धोबड फांद्यांची शोभा वाढवतात.
काहीसा पोपटी देठ मनामध्ये सुखाची नांदी सांगतो.तर अर्धोन्मिलित उमललेल्या अवस्थेतील सोनचाफा समाधिस्त भासतो.
चाफ्याच्या फुलांनी परसबागा ,उद्याने,मंदिरे राऊळे अगदी मनोहर केला आहे.सकाळच्या ,दुपारच्या आणि वेचून घेतलेल्या यां संध्याकाळच्या तिन्ही प्रहारेच्या या बहरलेल्या फुलांनीअनेकांच्या मनात कायमचा वसंत टवटवीत ठेवला आहे.ओंजळीत वेचून घेतलेल्या पंचपाकळ्यांनी पंचप्राण अलगद मिठीत घेण्याचे तत्व शिकवले आहे.
-भक्ती
याद्या
9858
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
वा !
अलवार भावना...
चाफ्याचे फूल मला अतिशय आवडते.
देवचाफा कसा असतो?? गुलाबी
In reply to चाफ्याचे फूल मला अतिशय आवडते. by श्रीगुरुजी
पांढराशुभ्र नसतो. मळकट
In reply to देवचाफा कसा असतो?? गुलाबी by बापूसाहेब
झखड = झाड
मुक्तक आवडले..
गोष्ट पटली
In reply to मुक्तक आवडले.. by बापूसाहेब
सहमत आहे ....
In reply to मुक्तक आवडले.. by बापूसाहेब
_/\_
In reply to मुक्तक आवडले.. by बापूसाहेब
आयुष्याच्या शेवटी आलेल्या
In reply to _/\_ by Bhakti
चाफ्याच्या फुलांशी नाते जोडले
In reply to आयुष्याच्या शेवटी आलेल्या by बापूसाहेब
तो-"ये कोनसी जगाह है?" ती-"ये मेरी जगाह है,कही नहीं मिली तो यही मिलूंगी"...अस म्हणत सिनेमातील गौप्य चाफ्याचा झाडाशी उलगडत.मस्त लिहिले आहे
नक्की कोणता चाफा
खूप सुंदर
सर्वांचे खुप खुप आभार.
अहाहा....!
पन्नासेक वर्षांपूर्वीचं ना हे
In reply to अहाहा....! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आयला, तुम्ही दोघेही मसाला
In reply to पन्नासेक वर्षांपूर्वीचं ना हे by गवि
.
In reply to आयला, तुम्ही दोघेही मसाला by प्रचेतस
कोणी यांना आवरेल काय ?
In reply to पन्नासेक वर्षांपूर्वीचं ना हे by गवि
कातिल..
In reply to अहाहा....! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तिच्या अंगणातला चाफा तिच्यासारखाच, निघाला. बहरलाच नाही. माझ्या परसातला चाफा नेहमीच गच्च फुलतो, बहरतो, पूर्वीही आणि आत्ताही.....!बाकी सर हळवे झाले म्हणजे बातच और.. तुमच्या या आठवणींची मिपा २०२० दिवाळी अंकासाठी वाट पाहिली होती..पण तुमचा लेख नाही दिसला त्यात.. धन्यवाद! :)