Skip to main content

आनंदाची बातमी..! :)

लेखक विसोबा खेचर यांनी रविवार, 01/03/2009 10:54 या दिवशी प्रकाशित केले.
एक निवेदन... कळवण्यास अत्यंत आनंद होतो आहे की मिपावर शुद्धलेखन विषयक लेखांवरील, चर्चांवरील बंदी आता उठवण्यात आली असून मिपावर एक शुद्धीचिकित्सक विभाग सुरू करण्यात आला आहे.. :) माननीय मिपाकर सतिशराव हे या विभागाचे प्रमूख असतील व तात्या त्यांच्या हाताखाली त्या विभागातील एक दुय्यम क्लार्क म्हणून काम पाहील! :) सतिशरावांनी प्राणिपात कोटि कोट आणि मोकलाया दाहि दिश्या या दोन कविता मिपावर लिहून तात्याच्या कानफटात मारली आहे आणि शुद्धलेखन विषयक झणझणीत अंजन समस्त मिपाकरांच्या डोळ्यात घातले आहे.

अक्षराची किमया.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 01/03/2009 04:58 या दिवशी प्रकाशित केले.
"माझं जेव्हा शब्दाबद्दलचं ज्ञान वाढत गेलं,तेव्हा माझा आत्मविश्वास आणि माझं धैर्य पण वाढत गेलं.त्यानंतर मी ठरवलं,की माझ्या बहिणी आणि माझे भाऊ ह्यांना पण सुशिक्षीत केलं पाहिजे.आणि ते सुद्धा त्यांना शिकायचं असेल तेव्हडं." आमच्या लहानपणी एक गोपिकाबाई नांवाची बाई घरकामाला यायची.आमच्या राहत्या घरापासून जवळ जवळ चार मैलावर ती राहायची.रोज सकाळी आठ वाजता यायची ती संध्याकाळी काळोख होता होता निघून जायची.तिला दोन तिन मुली होत्या.त्यातली धाकटी चमेली तिच्याबरोबर नेहमीच असायची.ती जशी शाळेत शिकायच्या वयाची झाली तेव्हा तिला मी नेहमीच म्हणायचो, " चमेली तू खूप शिक.शिकलीस का तुला जगायला मजा येणार.आणि तुझ्या आईसा

साबूदाण्याचे वडे

लेखक रेवती यांनी रविवार, 01/03/2009 03:25 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य: दोन वाट्या भिजलेला साबूदाणा, दोन वाट्या खमंग भाजलेल्या दाण्याचे बारीक कूट, एक टेबलस्पून शिजवलेली वरई, एक छोटा बटाटा उकडून,छोटा चमचा अख्खे जिरे, भाजून केलेली जिरेपूड अर्धा छोटा चमचा, लाल तिखट, मीठ, चवीपुरती साखर, तळायला तेल. कृती: भिजलेल्या साबूदाण्यात तेलाखेरीज सर्व जिन्नस घालून नीट कालवावे. शिजलेल्या वरईच्या गुठळ्या मोडाव्यात. कालवताना हाताला तेल लावावे,पाण्याचा हात शक्यतो लावू नये. तयार पिठाचे लाडूएवढे गोळे करावेत व तळहातांमध्ये दाबून चपटा आकार द्यावा.

भारतीय संगीत आणि ऑस्कर

लेखक रामोजी यांनी रविवार, 01/03/2009 03:06 या दिवशी प्रकाशित केले.
रेहमान ला ऑस्कर मिळाल्यानंतर तात्या एकाहून एक सुंदर गाण्यांचे दुवे देत आहे. परंतू ऑस्कर ला मारलेली कोपरखळी मात्र खटकते. आपली गाणी परदेशी लोकांना आवडतीलच आसे नाही. रेहमान ला ऑस्कर मिळालेल्या गाण्या पेक्षा ही ऑस्कर न मिळालेल्या लगान ची गाणी अधीक चांगली होती. ऑस्कर ही काही परमोच्य दाद नाही. खुद्द लतादिदी व आशाताइं नि ही रेहमान चे ऑस्कर बद्धल अभिनंदन केले आहेच.

?

लेखक शितल यांनी रविवार, 01/03/2009 01:20 या दिवशी प्रकाशित केले.
तू एक स्वप्न आहेस की सत्य? हा तुझा आभास का तुझी जाणीव करून देणारा अलगद स्पर्श? मनाला काहीच उमजत नाही ... आणि शरीरालाही. सगळे विसरून वर्तमानात जगायचे, तरी घुसमट होते. मनाच्या कोपर्‍यात, खोल कुठेतरी एक साद ऐकू येत आहे. आवाज ओळखीचा वाटतोय पण आज तर माझाच आवाज मीच विसरले आहे! तुझ्या सादाला प्रतिसाद द्यायला टाळतेय... का? कारण तू सत्य का तुझा मृत्यू सत्य? ... शरीर म्हणते तू आज जगात नाहीयेस, मन म्हणते तू मला सोडुन कुठे ही दूर नाही... फक्त माझ्यासाठी... मृत्यू नंतरही माझ्याजवळ.
Taxonomy upgrade extras

गदीमा आणि सुरेश भट

लेखक रामोजी यांनी शनिवार, 28/02/2009 23:46 या दिवशी प्रकाशित केले.
ग दि माडगूळकर आणि सुरेश भट हे दोघेही महान कवी. त्यांची तुलना करणे हे फारच कठीण आहे. तरी देखील गदिमा अधिक श्रेष्ठ वाटतात. भटांनी अनेक उत्तम गझला, भावगीते आपल्याला दिली तर गदीमांनी अनेक विविध काव्यप्रकार दिले..लावणी, भावगीते, अभंग, गीतरामायण इत्यादि. भटांच्या कवीता त्यांचि महान प्रतीभा दर्शवतात, तर गदिमांचे काव्य वाचून वाटते कि अरे किती सोपे शब्द आहेत. ह्या दोन महान व्यक्तिंच्या काव्यशैली चा अभ्यास हा एखाद्या शोधनिबंधाचा विषय आहे.

खूण

लेखक सौरभ वैशंपायन यांनी शनिवार, 28/02/2009 23:09 या दिवशी प्रकाशित केले.
जा सखे गं शोधुन ये मोहन मुरलीवाला, कुठे हरवला? ना कळे, ना क्षण उसंत जीवाला - १ काल रातीला भेट जाहली कालिंदिच्या तीरी, श्याम - सावळा समोर आणिक चुकार पावा करी - २ रात्रभर जागी होती चांदणवेडि चंद्रकला, जरा स्पर्शता तरंग उठले कालिंदिच्या गुढ जला - ३ स्पर्श असे कि मोरपिस जणु शरीरभर थरथरते, क्षितीजावरती शुक्र मनोहर रात्र अशीच सरते - ४ श्याम - सावळ्या मिठीत अवचित किनखापी जर खुपते कुणा न कळता ओठांवरची अजुन पण खूण जपते - ५ - सौरभ वैशंपायन.

उडीद डाळीच्या पु-या व बटाट्याची भाजी

लेखक मिना भास्कर यांनी शनिवार, 28/02/2009 22:34 या दिवशी प्रकाशित केले.
ही रेसिपी दिल्ली ला ब्रेकफास्ट साठी केली जाते व या नंतर गरम गरम जिलेबीवर ताव मारतात. ( ही माहीती ऐकीव आहे.) १ वाटी उडीद डाळ २ टे.स्पून लाल मिरची पावडर १ टे.स्पून जिरे पावडर १ टे.स्पून बडीशेप १ टे.स्पून धने १ टे.स्पून गरम मसाला १ टे.स्पून ओवा १ टे.स्पून हळद मीठ चवीपुरते कणीक तेल उडीद डाळ ५ ते ६ तास भिजत ठेवावी. नंतर पाणी काढून टाकून मिक्सर मधून बारीक करावी. बडीशेप व ओवा जाडसर पावडर करावी. वाटलेल्या डाळीत सर्व मसाले , मीठ घालून एकत्र भिजवावे. या डाळीत बसेल इतकी कणीक घालून नेहमीप्रमाणे कणीक भिजवावी. पु-या लाटून तेलात तळून घ्याव्यात. या पु-या जास्त पातळ लाटू नये. कडक होतात.

निमित्त ८ मार्च ...

लेखक मनीषा यांनी शनिवार, 28/02/2009 22:12 या दिवशी प्रकाशित केले.
( मार्च महिन्यातील ८ तारखेला विशिष्ट महत्त्व प्राप्त झाले आहे . ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून मानला जातो. अर्थात ३र्‍या जगातील देशातील महिलांना त्याची माहिती आणि महती किती असेल हा एक प्रश्नच आहे . पण आता वर्षातील ३६५ दिवसां मधील एक दिवस महिलांना देण्यात आला आहे . भारताचाच नाही तर जगातील प्रगत अशा युरोपियन देशांचा किंवा अमेरिकेचा इतिहास पाहिला तर सगळीकडे महिलांना नेहमीच दुय्यम स्थान दिले गेले आहे. त्यांना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी खूप मोठा लढा द्यायला लागलेला दिसतो ... अर्थात त्याला काही अपवाद आहेत . पण ते फक्त नियम सिद्ध करण्यापुरतेच..