ही रेसिपी दिल्ली ला ब्रेकफास्ट साठी केली जाते व या नंतर गरम गरम जिलेबीवर ताव मारतात. ( ही माहीती ऐकीव आहे.)
१ वाटी उडीद डाळ
२ टे.स्पून लाल मिरची पावडर
१ टे.स्पून जिरे पावडर
१ टे.स्पून बडीशेप
१ टे.स्पून धने
१ टे.स्पून गरम मसाला
१ टे.स्पून ओवा
१ टे.स्पून हळद
मीठ चवीपुरते
कणीक
तेल
उडीद डाळ ५ ते ६ तास भिजत ठेवावी. नंतर पाणी काढून टाकून मिक्सर मधून बारीक करावी. बडीशेप व ओवा जाडसर पावडर करावी. वाटलेल्या डाळीत सर्व मसाले , मीठ घालून एकत्र भिजवावे. या डाळीत बसेल इतकी कणीक घालून नेहमीप्रमाणे कणीक भिजवावी. पु-या लाटून तेलात तळून घ्याव्यात. या पु-या जास्त पातळ लाटू नये. कडक होतात.
या पु-या बरोबर खाली दिलेली बटाट्याची भाजी छान लागते.
४ मध्यम बटाटे,
२ टे.स्पून गरम मसाला
१ टे.स्पून मिरची पावडर
मीठ चवीपुरते
तेल, मोहरी, जिरे, हळद, कोथींबीर
बटाटे उकडून घ्या . बारीक तुकडे करा. ग्रेव्ही जर घट्ट आवडत असेल तर थोड्या फोडी कुस्करून घ्या. फोडणी साठी तेल गरम करा. जिरेमोहरी , हळद टाकून बटाटे टाका सर्व मसाले टाकून मीठ टाकून छान हलवून घ्या. २ वाट्या पाणी टाका. पाणी आवडी नुसार कमी जास्त टाका. ग्रेव्ही थीक हवी असेल तर कुस्करलेला बटाटा टाका. कोथींबीर बारीक चिरून टाका. एक उकळी काढा. गरम गरम पुरी बरोबर सर्व करा.
वाचने
6536
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
साधारण
ह्या बटाट्यच्या
आम्ही
मस्त
दालपुरीभाजी . .
छान.
हेच म्हणते..
In reply to छान. by शितल
फोटो
रेसिपी आवड्ली
"या डाळीत बसेल इतकी कणीक" म्हणजे किती?
बसेल इतकी कणीक?
डाळ
In reply to बसेल इतकी कणीक? by मिना भास्कर
छान आहे रेसिपी..
१ टे. स्पून????
चव महत्वाची आहे!
In reply to १ टे. स्पून???? by प्रभाकर पेठकर
बरे झाले....
In reply to चव महत्वाची आहे! by मिना भास्कर
पेठक्ररकाका,