मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

साबूदाण्याचे वडे

रेवती · · पाककृती
साहित्य: दोन वाट्या भिजलेला साबूदाणा, दोन वाट्या खमंग भाजलेल्या दाण्याचे बारीक कूट, एक टेबलस्पून शिजवलेली वरई, एक छोटा बटाटा उकडून,छोटा चमचा अख्खे जिरे, भाजून केलेली जिरेपूड अर्धा छोटा चमचा, लाल तिखट, मीठ, चवीपुरती साखर, तळायला तेल. कृती: भिजलेल्या साबूदाण्यात तेलाखेरीज सर्व जिन्नस घालून नीट कालवावे. शिजलेल्या वरईच्या गुठळ्या मोडाव्यात. कालवताना हाताला तेल लावावे,पाण्याचा हात शक्यतो लावू नये. तयार पिठाचे लाडूएवढे गोळे करावेत व तळहातांमध्ये दाबून चपटा आकार द्यावा. आता तेल चांगले तापल्यावर आच मध्यम करून एका वेळी दोन दोन वडे तळून घ्यावेत. नारळाच्या उपासाच्या चटणीबरोबर वाढावेत. हे वडे कुरकुरीत होतात व दोन तीन दिवस टिकतात. लगेच संपवण्यासाठी करायचे असतील तर पाण्याच्या हाताने पीठ मळले तरी चालेल. वडे जर मऊ आवडत असतील तर लाल तिखटाऐवजी हिरवी मिरची वाटून, कोथिंबीर, ओला नारळ, आंबट दही / लिंबूरस वापरता येतो. Image removed. रेवती

वाचन 15769 प्रतिक्रिया 0