Skip to main content

(धोतरत्र्य )

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 30/07/2009 23:05 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा http://misalpav.com/node/8753 धोतरत्र्य चोपन्नपदरी वहीची मास्तराने केली धोतर चतुर चिरफ़ाड भाद्रपदाच्या द्वितीय दिवशी भादरले डोके भरपूर परजावुनी कित्येकां छडीने रंगवली ढुंगणावर पानेच्यापाने पांजरपोळी कडब्याच्या विरहाने व्याकूळ शोकाकुल बैल ओरडलो असा की थिजले तैल बसले आता सपत्नीक मूर्तीमंत लेखनिक टक टकाक टक टकाक टपल ढुम् टु...र्र..... ठूस्स..... (शेवटचे आवाज टाईपरायटरमध्ये अडकून धोतर फाटल्याचे आवाज आहेत असे समजावे. गैर समज नको)
काव्यरस

(कट्ट्यानंतरचे कवित्व)

लेखक पिवळा डांबिस यांनी गुरुवार, 30/07/2009 23:03 या दिवशी प्रकाशित केले.
कच्चा माल ह. घ्या... लालभडक मिसळीने केली आतड्यांची विकल चिरफाड मिपाकट्ट्याच्या द्वितीय दिवशी तासभर 'बसून' काढले भरताड घामाघूम शरीर ओथंबली मने धुंद पार्टीचे परिणाम आता भोगणे पंजरी कमोडच्या थकलेला भीष्म तेजस्वी तळपला मामलेदारी ग्रीष्म म्हणायलाच सपत्नीक तिच्या शिव्या अगणित पँक पूंक फुर्र ढूम :)

चारित्र्य

लेखक शरदिनी यांनी गुरुवार, 30/07/2009 22:28 या दिवशी प्रकाशित केले.
चारित्र्य चोपन्नकशी चित्रकूटाने केली चारित्र्याची चतुर चिरफ़ाड भाद्रपदाच्या द्वितीय दिवशी खुदुखुदु डोकावे अलवार भरतार भंगुनी कित्येक ओथंबली मने झुरली जर्जर गळाठली पाने पंजरी बाणांच्या शोकाकुल भीष्म असा तळपला भयाकारी ग्रीष्म बिल्वदल सपत्नीक मूर्तीमंत मेकॅनिक चपल ड्रुपल टपल ढुम् ३० जुलै २००९ ,पुणे

झोपडपट्टी?

लेखक ऋषिकेश यांनी गुरुवार, 30/07/2009 18:31 या दिवशी प्रकाशित केले.
झोपडपट्टी ही तोडावया हवी झाली मज घाई सौंदर्याची उगारले हात शेवटचे शस्त्र विनाशाचे अस्त्र कोसळले रोडरोलर ते खोपट्याशी नेले शिव्याशाप दिले जमावाने पहिले खोपटे तोडूनिया देता होईल शांतता कायमची इतक्यात तिथे मजला दिसली उभी भांडीवाली आमचीच त्याच गर्दीत हो माझा वॉचमन, बघतो रोखून माझ्याकडे बायको मुलांच्या उभा बरोबर माझा ड्रायव्हर घोळक्यात माझ्या तान्ह्याला जी आंघोळ घालते आज ती रडते घरासाठी अचानक माझ्या मनी काय आले यंत्र बंद केले शांतपणे अर्थ श्रीमंतीचा क्षणात बदले मनात पसरे संभ्रमच ह्या झोपडपट्ट्या कशा तोडायच्या खूणा श्रीमंतीच्या तिच्याकडे माझ्या श्रीमंतीच्या खूणाच पुसल्या म्हणू कसा मला श

आजच्या पुरुषांसाठी सप्तपदी धोकादायक का आहे?

लेखक युयुत्सु यांनी गुरुवार, 30/07/2009 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
हिंदू विवाह कायद्यात लग्न कायदेशीर ठरण्यासाठी ठरण्यासाठी आवश्यक मानला गेलेला सप्तपदी हा विधी आवश्यक आहे का? हा प्रश्न मला अनेक वर्षे सतावत आहे. आणि सध्या तरी माझे असे मत आहे की हा विधी व त्याच्या अभिप्रेत अर्थाकडे गंभीरतेने बघितले तर नक्कीच धोकादायक आहे. विशेषत: पुरुषांसाठी तो जास्त धोकादायक आहे. सप्तपदी या विधीचा उगम झाला तेव्हाची सामाजिक परिस्थिती (लग्नसंस्था) आणी काळाच्या ओघात या विधीचे अस्तित्व टिकून राहणं हे मला खूप विसंगत वाटतं...फ्रिट्स स्टाल या लेखकाचे "रिच्युअल्स अँड मंत्राज- रूल्स विदाउट मीनिंग" नावाचे एक पुस्तक मोतीलाल बनारसीदास या प्रकाशकानी प्रसिद्ध केले आहे.

पावसाळी छायाचित्रण....

लेखक नानबा यांनी बुधवार, 29/07/2009 21:39 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाळा सुरु झाला की आमच्यासारखे भटके थोडेच गप्प बसतात???? या पावसाळ्यात निसर्गाची काही रुपं मी माझ्या कॅमेर्‍यात बंदिस्त केली आहेत. आपण आस्वाद घ्याल आणि प्रतिक्रिया द्याल तर आनंद...

एक नवे गीत हवे आहे...

लेखक नानबा यांनी बुधवार, 29/07/2009 21:11 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतंच आकाशवाणीवर " हरि हा माझा प्राण विसावा" हे एक सुंदर गी त ऐकण्यात आलं..... हे गीत mp3 मध्ये कुणाकडे मिळेल का???