Skip to main content

टॅलेंट सर्च कंटिन्यूज.. मॅसेच्युसेट्स मधली दाक्षिणात्य अनुषा

लेखक बहुगुणी यांनी रविवार, 23/08/2009 19:44 या दिवशी प्रकाशित केले.
या वेळी सापडलीय मॅसेच्युसेट्सची एक बहुतेक कानडी सात-एक वर्षांची चिमुरडी, अनुषा (ती कदाचित तामीळही असू शकेल, इथली 'विकास' वगैरे मंडळी बहुतेक खात्री करू शकतील). मला ती सापडली, ते लता मंगेशकरांचं मोगरा फुलला यू ट्यूब वर load होत नव्हतं म्हणून 'दुधाची तहान ताकावर' या न्यायाने समोर आलेल्या व्हिडिओवर क्लिक केल्यावर.

II राजे II

लेखक प्रभो यांनी रविवार, 23/08/2009 16:29 या दिवशी प्रकाशित केले.
पुर्वेतिहास : दि. २१.०८.२००९ . श्रावण कालच संपलेला....विकांताचा बेत असा ठरलेला की राजेंच्या राजधानीस भेट द्यावी. थोडक्यात ठरलेला बेत असा....भाड्याने रथ (पक्षी चारचाकी) घेउन सकाळ सकाळ (पहाटेचे ५.३०) राजेंच्या राजधानी साठी कूच करायचे. राजेंचे दर्शन घेउन संध्याकाळी घरी परत. पुर्वेतिहास समाप्त दि.

पुन्हा एकदा...

लेखक हृषीकेश पतकी यांनी रविवार, 23/08/2009 00:41 या दिवशी प्रकाशित केले.
मन्मनीच्या चांदण्याला एकदा प्राशून जा | जागले हृदयांतरी जे तू कधी फुलवून जा || स्वप्न आणि सत्य दोन्ही का सारखे माझ्याचसाठी | संदर्भ वेड्या भावनांचे तू एकदा लावून जा || मी बोलावता येणे तुझे मज नित्यनेमाचेच आहे | भेटण्या मजला सखे माझ्याविना येऊन जा || भाव या डोळ्यातला अश्रूंसवे झरतोच आहे | नच साध्य जे ते वर्ज्य हे माझ्या मना शिकवून जा || घेऊ नको तू सोबतीला या अक्षरांची माळ ही | उमलेल जे श्वासातूनी शब्दांविना सजवून जा || अंतरीचे गीत माझ्या मी कधीचे गात आहे | साथ दे भोळ्या सुरांची अन तया जुळ्वून जा || बहरेन मी आता नव्
काव्यरस

मदत हवी आहे - घरगुती मिनीगॅस

लेखक वेदश्री यांनी रविवार, 23/08/2009 00:26 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार! दर मोठ्या शुभमुहूर्ताला गरजेनुसार (आणि उपलब्ध 'प' जीवनसत्व किती आहे ते चाचपूनही!) घरात काहितरी नवे घेण्याचा माझा प्रयत्न असतो. उद्या गणेशचतुर्थी आहे आणि सद्ध्याची गरज आहे घरगुती गॅसचे कनेक्शन. भारत गॅस एजन्सीकडे नाव नोंदवून आज सात महिने होऊन गेले पण कनेक्शन मिळण्याचा काहीच पत्ता दिसत नाहीय. स्वतःचे कनेक्शन तात्पुरते मला वापरायला द्यायला काही दोस्त (ज्यांचे गॅस कनेक्शन आता ते पाईप्ड गॅसची सोय असलेल्या सोसायटीत रहायला गेल्याने तसेच पडून आहे) तयार असले तरी 'परावलंबित्व जितके कमी तितके श्रेयस्कर' अशा माझ्या स्वभावाला ते पटत नाहीय.

गणपती बाप्पा मोरया!!!

लेखक अथांग सागर यांनी शनिवार, 22/08/2009 22:08 या दिवशी प्रकाशित केले.
गणपती बाप्पा मोरया!!!! सर्व गणेशभक्तांना गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!!! --(गणेशभक्त) अथांग सागर

एक गाणे आणि शुभेच्छा

लेखक विनायक पाचलग यांनी शनिवार, 22/08/2009 21:59 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. सर्व मिपाकराना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आपल्या लाडक्या मिपाला २ वर्षे पुर्ण झाल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन. असो,तर मुळ सांगायचा मुद्दा असा की आत्ता झी टॉकीजवर आयुष्यावर बोलु काही चे पुनःप्रक्षेपण चालु आहे. आणि मगाशीच मी त्यात एक गाणे ऐकले. हे गाणे खरेतर मी काही दिवसापुर्वीच यु नळीवरुन उतरवुन घेतले आहे, व सध्या त्याचे पारायण चालु आहे,अगदी या गाण्याव लिहायचे,त्याचे रसावलोकन का रसग्रहण जे काही म्हणतात ते करायचेच असे ठरवुन मनात लेखही तयार केला होता.

अनप्लॅन्ड उत्साहः अर्थात्, "अ‍ॅक्सिडेंटल वडे"!

लेखक बहुगुणी यांनी शनिवार, 22/08/2009 21:58 या दिवशी प्रकाशित केले.
इथे सगळंच unplanned आहे, म्हणून फोटो आधी, मग पाककृती, आणि साहित्यसूची नाहीच! (का ते पुढे कळेलच!) फक्त लक्षात घ्यायची गोष्ट एकच मंडळी - तयारीला वेळ जवळपास शून्य, प्रत्यक्ष पाककृतीचा वेळ १० मिनिटे! आणखी एक आठवडाभर भरपूर काम केल्यानंतरची शुक्रवारची संध्याकाळ, ८ वाजता घरी एकटाच, बाहेर खाऊन कंटाळा आलेला. मि पा वाचता वाचता चावायला चिवडा काढायला गेलो तर microwave मध्ये भाजून ठेवलेले पांढरे स्वच्छ शेंगदाणे दिसले, म्हंटलं आज साबुदाण्याची खिचडी! पण साबुदाणा भिजवायला निदान सहा-सात तास तरी हवेत.

गणेशवंदना

लेखक क्रान्ति यांनी शनिवार, 22/08/2009 21:18 या दिवशी प्रकाशित केले.
बाप्पा मोरया! काही दिवसापूर्वी देवकाकांनी 'एखादी ५-६ ओळींची छोटीशी बंदिशीसारखी रचना केलीस का? असं विचारलं, आणि नुकतीच मशकूर अली खान यांची मालकौंसातली "मुरख मन मेरे" ही बंदिश ऐकून तिच्यात मराठी शब्द बसवता येतील का, असा विचार करता करता ही गणेशवंदना मनातून कागदावर उतरली. उद्या गणेशचतुर्थी, आणि मिपाचा वर्धापनदिन.
काव्यरस

पसाभरं

लेखक शैलेन्द्र यांनी शनिवार, 22/08/2009 18:23 या दिवशी प्रकाशित केले.
शुष्क नभातुन टाहो कातर, खंडीत धरणी भेगा पाचर, पिवळ्या सुकत्या गवतावरती, पुन्हा पाडं रे रिमझीमती सर.. मान झुकवुनी गुरे चालती, हलवीत हुंगित लाळ गाळती, खपाटलेल्या पोटी त्यांच्या, पडेल कैसा दाणा कणभर? भेगांमधुनी ऊसळे अंकुर, परि कोवळे का क्षणभंगुर, आटली विहीर पान्हा तळ्भर, कसे पाजावे तान्हं वावर? सुटता वारा भुरभुर माती, आसवांनी का भिजेल शेती? घाम गाळण्या त्राण राहुदे, इतके तरि दे दान पसाभर..
काव्यरस

मिपाचा दुसरा वर्धापन दिन....

लेखक तात्या अभ्यंकर यांनी शनिवार, 22/08/2009 12:07 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, उद्या भाद्रपद शुद्ध चतुर्थी, अर्थात गणेश चतुर्थी...! लालबागच्या राजाच्या कृपेने मिपाची निर्मिती होऊन दोन वर्ष पूर्ण होत आहेत.. आपणा सर्व मिपाच्या मायबाप सभासदांच्या, वाचकांच्या, हितचिंतकांच्या आशीर्वादामुळेच केवळ मिपाची आजपर्यंतची वाटचाल शक्य झाली आहे. यापुढेही मिपावर आपले असेच प्रेम राहो हीच त्या गजाननाचरणी प्रार्थना.. सर्व मिपाकरांना गणेशोत्सवाच्या अनेकानेक शुभेच्छा!