तीन काळी गाणी
ही गाणी 'काळी' आहेत, कारण त्यांना दु:खाची तीव्र झालर आहे. नैराश्याची, वैफल्याची गडद छटा ह्या गाण्यांवर आहे. ही तिन्ही गाणी चित्रगुप्त ह्या थोड्या दुर्लक्षिलेल्या पण अत्यंत गुणी संगीतकारांकडे रफीसाहेबांनी अप्रतिम गायिलेली आहेत. दु:खाच्या चढत्या श्रेणीने (माझ्या मते, अर्थात) मी ती येथे देतो. पहिली दोन गाणी राजेंद्रकृष्ण ह्यांची आहेत. तिसरे साहिरचे.
गाण्यात शब्द सर्वात महत्वाचे, त्यानंतर संगीत, गायन इ. सर्व. तेव्हा ह्या गाण्यांचे शब्द देत आहे, त्या नादात अपरिहार्यपणे लेख मोठा झाला आहे.
पहिले गीत आहे 'मेरा क़सूर क्या है?
मिसळपाव