अखेर सदा सरवरणकरांना काँग्रेसने आपल्याकडे खेचलेच...
यावेळी सत्ता मिळण्याची संधी असताना उद्धव ठाकरे यांनी आदेश बांदेकरसारख्या काल परवा सेनेत आलेल्या माणसाला माहिमचे तिकीट देऊन काय साधले? मिळणारी एक जागा आपणहून काँग्रेसला ( किंवा मनसेला) दिल्यासारखे आहे.
या निम्मित्ताने एक गोष्ट विचारावी वाटते. काहीही राजकीय अनुभव नसलेल्या कलाकारांची लोकप्रियता कॅश करण्यासाठी बरेचसे पक्ष ( प्रामुख्याने भाजपा) त्यांना उमेदवारी देते. या कलाकारांचा राजकीय performance (मराठी प्रतिशब्द..?) काय असतो ? एखादा दुसरा कलावंत सोडला तर बाकीचे बहुतेक शोभेचे बाहूले म्हणूनच राहतात आणि त्या पक्षाचे सच्चे कार्यकर्ते फक्त आयूष्यभर पक्षाचे मरमर काम करत राहतात. हेच उदाहरण मोठ्या नेत्यांच्या मुलांनाही लागू होते. त्या पुनम महाजन, अमित देशमूख आणि नितेश राणे यांचे असे काय कर्तुत्व आहे? खरं सांगायचे झाले तर पुनम महाजनचे नाव प्रमोद महाजन गेल्यावरच मला कळले. त्या आधी प्रमोद महाजनांना मुलगी आहे हे सुद्धा माहीत नव्हते.
स्वतः उद्धव ठाकरे ही ह्या घराणेशाहीमुळेच पुढे आलेत. (पण त्यांनी थोड्याफार प्रमाणात स्वतःचे कर्तुत्व दाखवले आहे). त्यामुळे त्यांना आदेश बांदेकरांना तिकीट देण्यास काहीच वाटले नसेल. मिलिंद वैद्य आणि सरवणकर यांच्या मधला तोडगा असे म्हणून "बांदेकर" ( काय पण ऑप्शन आहे..?), तोडफोड, हल्ले करणारांना उमेदवारी दिल्यास शिवसेनेत वाईट संदेश जाईल, अशी खात्री पटल्यानेच सरवणकर यांना तिकीट नाकारण्यात आले. हा वर खुलासा.
माझ्यामते "सर्वनाशे समुत्पने अर्धे त्यजन्ति पंडितः" या न्यायाने वैद्य किंवा सरवणकर यांच्यापैकी कोणातरी शिवसेनेने ठेवायला हवे होते. आता तर दोघेही नाराज झालेत. तसेच कालपरवा आलेल्यांना संधी मिळत आहे हे पाहून इतर शिवसैनिक सुद्धा नाराज होत आहेत.
तसे सरवणकरांना काही तासात तिकिट मिळाल्याने तेथील आस लावून बसलेले काँग्रेसचे उमेदवार ही नाराजच आहेत. त्यामुळे चुरशीची लढत होणार हे नक्की. याचा फायदा मनसे घेतोय का ते कळेलच.
(एक फक्त आपले दादा (कोंडके) होते, त्यांनी कोठलीही अपेक्षा न ठेवता शिवसेनेचा प्रचार केला. बांदेकरांनी सुरुवातीला तरी निदान हे करायला पाहिजे होते. )
खादाडमाऊ
वाचने
5741
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
चालूच राहणार
बंडखोरी
सर्(ले)
'
सहमत !
सध्या
छे, छे!!
In reply to सध्या by विदुषक
+ १
In reply to छे, छे!! by प्रदीप
सगळ्यांनाच पिडलय..
शेवटी काय...
In reply to सगळ्यांनाच पिडलय.. by सूहास (verified= न पडताळणी केलेला)
मुळातच शिवसेनेत आता हे काही नवे नाही.
निष्ठा ही एखाद्या पक्षाच्या विचारसरणीशी असते की ................
निष्ठा ?
आज
हेच
आम्हि मत
फासा
हे काय नवीनच...?
'सभा
In reply to हे काय नवीनच...? by योगी९००
ह्याचा
In reply to 'सभा by सुहास
हा नियम
In reply to ह्याचा by दशानन