Skip to main content

भटकंती हरीशचंद्र गडाची

लेखक jaypal यांनी मंगळवार, 17/11/2009 01:08 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, खुप दिवस झाले "एखादा ट्रेक हवा यार " असे म्हणत अनेक दिवसांत , अनेक कप चहा रिचवत अनेक अवांतर गप्पा झाल्या पण फुलों की घाटी नंतर ट्रेक असा झालाच नाही. एके रात्री (भरत परमारचा) १० वाजता फोन आला १२ व १३ सप्टेंबर ला हरिशचंद्रगड ट्रेक ठरला आहे, "तुझं काय ते लवकर कळव." अशी विचारणा झाली. शनिवार-रविवार असल्याने नकाराचा प्रश्नच नव्हता तात्काळ "होकार" कळवुन मोकळा झलो. हरिशचंद्रगडाची स्वप्नं बघता बघता १२ सप्टेंबरचा शनिवार एकदाचा उजाडला. सकाळी ६.३० वाजता टेंभिनाक्यावर (ठाणे) सर्वजण जमलो आणि क्वालीसने पुढचा प्रवास सुरु झाला. एकुण सव्वा ७ जणांचा ग्रुप. वयोगट ६ (हो हो केवळ ६) ते ६० वर्षे.

एक अजनबी पाकिस्तानी नागरिकाशी झालेली चर्चा!

लेखक सुधीर काळे यांनी सोमवार, 16/11/2009 22:38 या दिवशी प्रकाशित केले.
ही एक १०० टक्के सत्य घटना आहे. मागे मी एकदा मलेश्यातील क्वाला लुंपूर या शहरी गेलो होतो. संध्याकाळी काम संपवून जरा दिवसा-उजेडी हॉटेलवर परत आलो. हॉटेल शेजारीच एक पार्क होता म्हणून एक चक्कर मारायला तिथं गेलो. का कुणास ठाऊक, पण पार्कमध्ये कोणी चिटपाखरूही नव्हतं. एक-दोन फेरफटके मारल्यावर हिंदुस्तानी चेहेर्‍याचा एक पंचविशीतला तरुण कांहींसा "खोया-खोयासा" चेहरा करून एका बाकड्यावर बसलेला दिसला. आधी आपल्या देशाचा असावा म्हणून मी त्याला "हॅलो" केले. तो थोडासा बुजलेला दिसत होता. कांहींसा बिचकत-बिचकत अवघडतच तो उभा राहिला व "आप कहाँसे हैं?" असे त्याने मला विचारले. मी म्हटलं "मै हिंदुस्तानी हूँ|".

कातरवेळ

लेखक निखिल देशपांडे यांनी सोमवार, 16/11/2009 17:04 या दिवशी प्रकाशित केले.
शनिवारी सकाळी लवकर ११-१२ वाजे पर्यंत उठायचा प्लॅन होता. पण कुठले काय??? सकाळी ७ वाजता फोन वाजला... पहातो तर सिंगापुरातुन फोन..!!! नाही हो सिंगापुरच्या काकांचा नव्हता... एक जुना कलिग सकाळी सकाळी एक इश्श्यू मधे अडकला होता. त्याचा प्रॉब्लेम सोडवता सोडवता झोप चांगलीच उडाली.... आता इतक्या भल्या पहाटे(!) उठून काय करावे ते कळतच नव्हते. पेपर वाचून झाला... त्यात काही तरी सचिन च्या कार्यक्रमाच्या आयोजकांनी मराठी वृत्तपत्रांना बोलवले नव्हते तरी दुसर्‍या दिवशीचा अंक सचिन स्पेशल काढण्यात येणार असे लिहिले होते. चालू द्या!!!!

मेल्या, तुला रे काय कळतंय त्या माडी चुकलो नाडीग्रंथातलं?

लेखक शशिकांत ओक यांनी सोमवार, 16/11/2009 16:29 या दिवशी प्रकाशित केले.
श्री हैयो व अन्य नाडी ग्रंथ प्रेमी मित्र हो, आपणास धनंजयांचे व्यक्तिमत्व त्यांच्या माहितीपुर्ण व सखोल प्रतिसादांमुळे फारच आदरणीय व जवळचे वाटते तसेच मलाही वाटते. त्यांनी त्यांच्या स्याद्वाद लेखातील एका प्रतिसादाला उद्देशून तुमच्याशी (श्री हैयोंशी) खरडवहीतून प्रतिसाद दिल्याचे आपण कळवल्याने मला त्यातील मजकुराला थोडी दखल देणे गरजेचे वाटले म्हणून...
खरे पाहता दोहोबाजूंच्या वितर्काचे जे मूळ, त्या प्रमाणांचे ओझे दोन्हीही बाजूस अधिकाधिक तुल्यबल होणे सहजशक्य असल्यास प्रात्यक्षिक करणे हे सुचविले जाते.

नार्सिसस....

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी सोमवार, 16/11/2009 15:27 या दिवशी प्रकाशित केले.
"जिनियस माणसं कधी-कधी माथे फिरल्यासारखी वागतात त्याचं कारण काय असेल?" प्रा. बिरुटे, अवलियाला विचारत होते. प्रो. देसाई सुटीवर असल्यामुळे प्रा.बिरुटे अवलियांना घेऊन तळ्याकाठी बसले. एकेक भाजलेला शेंगदाणा टाइमपास म्हणून खातांना असा अचानक प्रश्न विचारल्याने अवलिया नेहमीप्रमाणे भांबावल्या सारखा झाला. "अवलियासेठ तुला सांगतो. मराठी माणसं एकत्र आली म्हणजे फ्लॅट घेतला का ? पोरीच्या लग्नाचं जमलं का ? कार्यालयातले बॉस काय म्हणताहेत ? काय म्हणतं राजकारण ? असे काही सामान्य प्रश्न विचारतात. " "हो तर ! जगरहाटीत अनेक प्रश्न सामान्य माणसाच्या मागे हात धुवून लागलेले असतात.

जाणता अजाणता......

लेखक किलबिल यांनी सोमवार, 16/11/2009 14:53 या दिवशी प्रकाशित केले.
धाडधाड जिना उतरुन जुई जेवणाच्या टेबलजवळ आली. नेहमीप्रमाणे खर्रsssss आवाज करत खुर्ची ओढून घेऊन बसली.समोरच्या प्लेटमधला शिरा खाणार तेवढ्यात आई म्हणाली,"सागरचा फोन आला होता." जुईला ठसका लागता लागता राहिला. "काय म्हणत होता?" "तू काल त्यांच्या घरी जाणार होतीस का? का आली नाहीस म्हणून विचारत होता." "हं... नाही जमलं. अनुच्या घरी गेलो होतो सगळ्या. उशीर झाला." "अगं मग एक फोन करायचास त्याला. वाट बघत होता म्हणे.." "हं..... अजुन काही म्हणाला का?" "नाही. पण तुला फोन करायला सांगितलंय त्याने." "ठीक आहे करेन नंतर. निघु मी?" आईच्या उत्तराची वाटही न बघता जुई पळाली.. तिला तो विषयच नको होता... सागर...समीर...

नवीन वसाहत

लेखक अरुण मनोहर यांनी सोमवार, 16/11/2009 12:27 या दिवशी प्रकाशित केले.
ताजी खबर, ताजी खबर भुतीण पारावरून ओरडली लगबगीने सरसर सरसर पारंबी धरून खाली आली - रात्र काळी, सळसळ झावळी समंध भारी, मुंजे किरकीरी जखिणी, हडळी आणि भुतावळी झाडांवर जमली सारी बिरादरी - कशाला उगाच मारतेस बोंबा उलटे झुलते वेताळ विचारते जरा थांबा, खाली घ्या टांगा सांगते सारे, भुतीण फिस्कारते - आपला सगळा मोहल्ला चालला येथून दुसरीकडे जागा देतील संपला जुना सहवास इथला कबरीतून काढून भांड्यात ठेवतील - बिरादरी भुमीवर वसाहत बांधून जागा भरणार, माणसे रहाणार हाडे खोदून, थोडीशी निवडून, एकावर एका बॉक्समधे ठेवणार ***१ - मज्जा ने मज्जा, केकाटला मुंजा नवीन घर, हायराईज रिसॉर्टवर ए तुला नाही भेजा, म्हणाला कुब्जा तूच म
काव्यरस

रोखठोकपणा

लेखक अमृतांजन यांनी सोमवार, 16/11/2009 10:15 या दिवशी प्रकाशित केले.
अनेकांना असे वाटते की, ’आपण बुवा एकदम रोखठोक बोलून टाकतो; आहे काय अन नाही काय!’ पण मुळात मला असे वाटते की, रोखठोकपणा म्हणजे नक्की कसा हे त्या व्यक्तिला माहिती नसते आणि त्यामुळे अनेकदा त्या तथाकथित रोखठोकपणाचा आव आणल्यामुळे समोरील माणूस दुखावला जाण्याचीच शक्यता जास्त असते. इंग्रजीमधे ज्याला "असर्टीव्हनेस" म्हणतात तो जरा रोखठोकपणाचा सौम्य प्रकार असतो असे मला वाटते पण खात्री नाही. माझे प्रश्न असे आहेत- १. रोखठोकपणा म्हणजे नक्की काय? २. रोखठोकपणा आणि असर्टीव्हनेस ह्यात फरक काय? ३. रोखठोकपणा कधी उपयोगी पडतो? व नाही?

मदत हवी आहे

लेखक खडूस यांनी सोमवार, 16/11/2009 08:27 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्याकडे जुन्या पद्धतीचा HMV चा (साधारण ३० वर्षे जुना) record player आहे. पण आता कालौघात त्याची पिन खराब झाली आहे. पुण्यात त्याची पिन कुठे मिळेल हे जाणकार सांगू शकतील काय?