श्री हैयो व अन्य नाडी ग्रंथ प्रेमी मित्र हो,
आपणास धनंजयांचे व्यक्तिमत्व त्यांच्या माहितीपुर्ण व सखोल प्रतिसादांमुळे फारच आदरणीय व जवळचे वाटते तसेच मलाही वाटते. त्यांनी त्यांच्या स्याद्वाद लेखातील एका प्रतिसादाला उद्देशून तुमच्याशी (श्री हैयोंशी) खरडवहीतून प्रतिसाद दिल्याचे आपण कळवल्याने मला त्यातील मजकुराला थोडी दखल देणे गरजेचे वाटले म्हणून...
खरे पाहता दोहोबाजूंच्या वितर्काचे जे मूळ, त्या प्रमाणांचे ओझे दोन्हीही बाजूस अधिकाधिक तुल्यबल होणे सहजशक्य असल्यास प्रात्यक्षिक करणे हे सुचविले जाते. तसेही, नाडिग्रंथांबद्दल नाडिविरोधकांनी निर्मिलेले अनेक वाद आहेत असे नाडिग्रंथांवर विश्वास ठेवणारे म्हणतांत. नाडिविरोधकांच्या ह्या संशयच्छेदसिद्धीसाठी शाब्दिक वादापेक्षा प्रात्यक्षिक सोपे ठरू शकेल, हेच मला सुचवायचे होते. एकास-एक प्रमाण नसले तर "सर्वथैव" अयोग्य असा माझा वादच नाही. आपला वितर्क कोठे अर्धवट होतो आहे, ते दाखवून देणे हाच माझा केवळ उद्देश आहे. असो. आपल्या लेखनावरून काहीसा असा समज होतो की आपणाजवळील प्रमाण तेच आणि तेवढेच सत्य मानून वितर्क करणे योग्य असल्याचे आपणास सुचवायचे आहे. त्याहीउपर, आपला प्रात्यक्षिकास सर्वेथैव विरोध असल्याने, आपला वितर्क हा अर्धवट होतो आहे हे कदाचित आपण मान्य करणार नाही.नाडीग्रंथांबाबत प्रात्यक्षिकाच्या प्रमाणाला विरोध करून सर्व नाडी विरोधक आपण वितर्क करत आहोत हे त्यांना पक्के माहित असूनही त्यांना तो करावा लागतो कारण त्यांचे सर्व तर्क शब्दप्रामाण्यावर आधारित आहेत. डॉ.नारळीकर काय, डॉ. दाभोलकर काय, फार काय येथे हिरीरीने लेखन करणारे श्री. प्रकाश घाटपांडेकाका काय किंवा मैत्रिणीच्या गप्पांतून नाडीला विनोदी म्हणणारी अदिती काय, बाकीचे सोडा या सर्वांचे तात्विक गुरू डॉ. अब्राहम कोऊर काय, सर्व एक जात असे घडत असावे असे जे म्हणतात, त्यांनी आपापले नाडी ग्रंथ पहावेत - कदाचित स्व. किंवा कै. डॉ.कोऊरांना सोडून अन्यांनी त्याची वही व कॅसेट व पट्टीचे पुरावे श्री. हैयोंच्या तमिळ लिपीज्ञानाचा लाभ घेण्यासाठी सादर करावेत त्यातून प्रत्यक्ष प्रमाणाची शहानिशी होईल. त्यानंतर मग कोणीही आपणांस शीर्षकातील उल्लेखाने हिणवणार नाही. पहा पटतय का ते.
वाचने
3352
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
आयला ..
+१
In reply to आयला .. by टारझन
+२
In reply to +१ by अवलिया
नाडीग्रंथ
नाय हो
In reply to नाडीग्रंथ by विसोबा खेचर
निषेध!
बाकी काही
हॅहॅहॅ