नमस्कार मंडळी,
खुप दिवस झाले "एखादा ट्रेक हवा यार " असे म्हणत अनेक दिवसांत , अनेक कप चहा रिचवत अनेक अवांतर गप्पा झाल्या पण फुलों की घाटी नंतर ट्रेक असा झालाच नाही. एके रात्री (भरत परमारचा) १० वाजता फोन आला १२ व १३ सप्टेंबर ला हरिशचंद्रगड ट्रेक ठरला आहे, "तुझं काय ते लवकर कळव." अशी विचारणा झाली. शनिवार-रविवार असल्याने नकाराचा प्रश्नच नव्हता तात्काळ "होकार" कळवुन मोकळा झलो. हरिशचंद्रगडाची स्वप्नं बघता बघता १२ सप्टेंबरचा शनिवार एकदाचा उजाडला. सकाळी ६.३० वाजता टेंभिनाक्यावर (ठाणे) सर्वजण जमलो आणि क्वालीसने पुढचा प्रवास सुरु झाला.
एकुण सव्वा ७ जणांचा ग्रुप. वयोगट ६ (हो हो केवळ ६) ते ६० वर्षे. खरं नाही वाटत हे घ्या
मधोमध जी उभी आहे ती माझी छोटी हिरोइन "जिया परमार" संपुर्ण गड एकटीनेच अनवाणी (उचलुन घ्यावे लागले नाही) चढली. तिच्या डाव्या हाताला तीचे बाबा भरत परमार(हे पण गेली ८/९ वर्शे अनवाणीच फिरतात व्यवसाय= चार्टड आकौंटंट). ६० चे मयेकर काका देखिल उत्साहाला कुठेच कमी नव्हते. अधुन मधुन म्हणायचे "कॅमे-या मुळे जड आसेल ना, द्या द्या मी थोडावेळ घेतो".
हरिशचंद्रगडावर जाण्यासाठी माझ्या माहिती प्रमाणे दोन मार्ग १ला.खुबीफाटा - खिरेश्वर मार्गे. माळशेज घाट पार केल्यावर डाव्या बाजुस हा फाटा लागतो.पिंपळवाडी धरणाला लागुनच रस्ता आहे.२ रा - (अहमद्)नगर जिल्ह्यातील पाचणइ गावातुन. आम्ही खुबीफाटा - खिरेश्वर मार्गे जाणार होतो. गप्पांच्या नादात कल्याण पार पडल्याचे कळलेच नाही, आणि आता मुरबाड देखिल मागे पडले होते. हळुहळु गप्पा कमी होत गेल्या आणि सकाळच्या थंड हवेत मंडळींनी चालत्या गाडीतच ताणुन दिली. माळशेज घाटातील मारुतिच्या समोर नारळ फोडता फोडता सकाळचे ९.३० वाजले होते. चहा, बिस्कीटे व नंतर प्रसादाच्या खोब-याचा तोबरा भरुन प्रवास परत चालु झाला. घाटातील हे एक द्रुश्य
खुबीफाट्यास येइपर्यंत १०.३० वाजले होते. गाडीतुन उतरुन सगळ्यांनी आपापल्या सामानांची मोजणी केली आणि ड्रायव्हरला पुढिल सुचना देउन परत ठाण्यास रवानगी केली. उन पावसाचा लंपडाव चालु असल्याने कॅमेरा बाहेर काढला नव्हता पण वातावरणच असं काही भरलेल अन भारावलेल होतं की शेवटी कॅमेरा काढलाच.
आमच्या स्वागतास हे फुल आणि पाखरु तयारच होते.
वर आमच्या उजव्या बाजुस दिसते आहे ते पिंपळ्वाडी धरण. डाव्या हातास असलेल्या माणसांच्या व वाहनांच्या गर्दीची चौकशी केल्यावर कळले की २ महीने झाले तीथे " रावण" या चित्रपटाचे शुटींग चालु आहे. आम्हि तिकडे दुर्लक्ष करुन प्रवास चालु ठेवला.खिरेश्वर गावातिल एका घर वजा हाटेलात चहा पोहे हादडुन साधारण १२.३० वाजता नव्या दमाने चढाइस आरंभ केला.
शान कि सवारी. असा एकदा ट्पावर बसुन प्रवास करायचा आहे
हिरवे हिरवे गार गालीचे ....हरीत त्रुणांच्या मखमालींचे
नभ उतरुं आल......अंग जिम्माड झालं
हाच तो"सरडा" केवळ याच्या वरतीच रंग बदलणारा म्हणुन शीक्का बसला आहे. माणसाची धाव कुंपणा पर्यंतच
दिल है छोटासा छोटिसी आशा. चांद तारोंको छुने की आशा
सुरवातिचा तोलारखिंडिचा दमछाक टप्पा पार पडला आणि हे पहा....
मोठ्ठ व्हायच असेल तर मुळं घट्ट पाहीजेत. (मलाच कळेना जगण्याची ही जिद्द कुठ्ली)
आता कड्याचा अवघड टप्पा सुरु झाला होता. पाठीवर सॅकच ओझं, कोरडा घसा, निसरडी वाट आणि "इकडे दरी तिकडे कडा" अशी अवस्था. पाय ठेवण्यास फक्त काही निसरड्या खोबणी, व सोबतीला सोसाट्याचा वारा आणि पावसाची रीपरीप. खर सांगतो खुप दडपण आल होतं(सभ्य भाषेत "फाटली" असं म्हणतात. आज अनुभव घेत होतो.) माझ आणि माझ्या छोट्या हिरोइनच. ती मात्र हावरेपणानी सगळ्यांच्या पुढे फुलपा़खरासारखी तुड्तुड्त होती. तीच्या बाबांनी तीला ३ वर्शांची असल्यापासुन भिमाशंकर ट्रेक ची सवय लावली आसली तरी माझ्या मनात उगाचच अपघताची शक्य शंका आणि धस्स होत होतं. (लाहनपणी आइ उशीरा घरी आली की, एकटा घरी असताना असं व्हायचं, आता मुलगा उशीरा आला की अस्स होतं.) ज्यांनी "हा " ट्रेक "या" मार्गाने केला आहे त्यांना माझ्या बोलण्याची कल्पना येइल. तुम्ही फोटो पाहुन करा....
थोडीशी जरी चुक झाल्यास "फोटोला हार" हा टप्पा पार करुन क्षणभर पठारावर निवात विसवलो. त्यातील काहि क्षण तुमच्या साठी.....(चोरलेले क्षण म्हणता येइल का हो?)
सध्याकाळी ४.३० /५ च्या सुमारास गुहेशी पोहचलो. राहण्याचा व जेवणाचा बंदोबस्त केला. शनिवार व रविवारी पाचणइ गावातिल काही लोक गडावरती जेवण, न्याहारी व चहाची सोय करतात.(रात्रीच जेवण सकाळचा नाष्टा व चहा सर्व अनलिमीटेड ७.२५ जणांसाठी केवळ रु.१०००) लिरील इष्टाइल आंघोळ करुन भटकंती सुरु केली. अर्थातच कॅमेरा होताच सोबतीला हा घ्या पुरावा...
रात्री पिठलं भाकरी, कांदा बटाटा रस्सा , भात आमटी सर्व चुलीवरचं भौ. शिजताना काय घमघमाट सुटला होता म्हणुन सांगु .जेवणावर उभा आडवा हात मारुन मंडळी ९ च्या आत ढाराढुर. गुहेतुन फक्त घोरण्याचाच आवाज येत होता. (वेगवेगळ्या गुहेत वेगवेगळे ग्रुप होते साधारण ४०/४५ जण असतील)
सकाळी सर्व विधि आटपुन चहा पोह्यांचा नाष्टा हाद्डला आणि निघालो कोकण कडा पाहायला.
आमच्या साठी निसर्गाने पायघड्या घातल्या होत्या.
मोत्यांची उधळण केली होती महराजा! किती वर्णु त्याची श्रिमंती? काय वर्णु त्याचा खजीना?
भरपुर ढग असल्याने कड्यावरुन खालचे काहीच दिसत नव्हते उंचीचा अंदाज देखिल येत नव्हता. (म्हणुन डिसेंबर आखेर पुन्हा जाण्याचा विचार आहे) सुमारे २५००/२६०० फुट खोल आहे असे म्हणतात.
तिला तिचा फोटो आवडला म्हणुन लगेच इनाम सुध्दा
कोकण कडा पाहुन परत आलो आणि देवळं बघायला सुरवात केली.
फोटो काढताना कुणी मधे आल की, तिच्याआयला, पण इथे ......... सौदर्यात भरच पडली राव
अचानक पाउस आल्याने कॅमेरा आवरता घ्यावा लागला व ब-याच देवळांचे (सप्ततीर्थ, विष्णु, केदारश्वर इत्यादी) फोटो टिपता न आल्याचे दु:ख घेउन परतीचा प्रवास चालु केला. माझा पाय मुरगळुन सुजल्याने आल्या मार्गाने न परतता दुस-या टोळी बरोबर ओळ्खकरुन घेतली आणि पाचणइ मार्गे उतरायला सुरवात केली.
खाली पाचणइ गाव आहे.
काय उडी मारायचा विचार दिसतोय काय?
हा देखिल सोबतीला होता बर का?
तारमती व रोहिदास शिखरं चढायची राहुन गेली. या गडाचा विविध पुराणात(मत्स्यपुराण, अग्निपुराण, स्कंद पुराण) उल्लेख आढळतो. या गाडाची निर्मीती ६ व्या शतकातील मानली जाते. १४व्या शतकात संत चांगदेवांनी येथे उपासना केल्याची देखिल कहाणी आहे.
गडाबद्द्ल थोडसं तांत्रिक विवेचन
जिल्हा = (अहमद) नगर
समुद्र सपाटी पासुन उंची = ४५१० फुट
लेखन प्रेरणा= श्री.विमुक्त यांच्या कढुन

| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
20800
प्रतिक्रिया
52
मिसळपाव
प्रतिक्रिया
जय, मस्त
सुरेख
मी आलो परत की
मस्त फोटो
सही !!
मस्तं आहेत
मस्तच रे
सुरेख फोटो आणि वर्णन
हळवं व्हायला
In reply to सुरेख फोटो आणि वर्णन by संदीप चित्रे
मस्त फोटो
+१
In reply to मस्त फोटो by स्वाती२
अप्रतिम सफर रे जयपाल!
मस्त
फुलांचे,
आणि हो...
In reply to फुलांचे, by एकलव्य
+१
In reply to आणि हो... by एकलव्य
वा!
व्वा !!
In reply to वा! by विसोबा खेचर
व्व्वा!!
In reply to व्वा !! by टारझन
व्वाव्वा!!!
In reply to व्व्वा!! by घाटावरचे भट
वा वा वा
In reply to व्वाव्वा!!! by ३_१४ विक्षिप्त अदिती
अप्रतिम
सुंदर...
मस्तच्!!!
अ प्र ती म
झकास
गारेगार
अनवाणी का जातात??
In reply to गारेगार by झकासराव
सुंदर फोटो...
देखणे
मस्तच...
!!!
सुंदर फोटो
वा वा वा
पेरु फोटो
+१ जिया
अप्रतिम...
फारच सुंदर
कॅमेरा कोणता?
अप्रतिम
In reply to कॅमेरा कोणता? by jaypal
पेरु
अरे व्वा!
अप्रतीम
अप्रतीम
अप्रतीम
आभार
मस्त व्रुत्तांत...
हरिश्चंद्रगड द ग्रेट!
यासाठी # रिस्पेक्ट !
In reply to हरिश्चंद्रगड द ग्रेट! by स्पार्टाकस
असेच म्हणतो
In reply to यासाठी # रिस्पेक्ट ! by वेल्लाभट
स्वच्छंदी आणि वेल्लाभटाशी सहमत...
In reply to असेच म्हणतो by स्वच्छंदी_मनोज
सगळेच फोटो मस्त. विशेषतः