एक अजनबी पाकिस्तानी नागरिकाशी झालेली चर्चा!
ही एक १०० टक्के सत्य घटना आहे.
मागे मी एकदा मलेश्यातील क्वाला लुंपूर या शहरी गेलो होतो. संध्याकाळी काम संपवून जरा दिवसा-उजेडी हॉटेलवर परत आलो. हॉटेल शेजारीच एक पार्क होता म्हणून एक चक्कर मारायला तिथं गेलो. का कुणास ठाऊक, पण पार्कमध्ये कोणी चिटपाखरूही नव्हतं. एक-दोन फेरफटके मारल्यावर हिंदुस्तानी चेहेर्याचा एक पंचविशीतला तरुण कांहींसा "खोया-खोयासा" चेहरा करून एका बाकड्यावर बसलेला दिसला. आधी आपल्या देशाचा असावा म्हणून मी त्याला "हॅलो" केले. तो थोडासा बुजलेला दिसत होता. कांहींसा बिचकत-बिचकत अवघडतच तो उभा राहिला व "आप कहाँसे हैं?" असे त्याने मला विचारले.
मी म्हटलं "मै हिंदुस्तानी हूँ|".
हे ऐकून तो आणखीनच बिचकला.
ते लक्षात आल्यावर मी त्याला विचारलं, ""आप कहाँके हैं?"
"मैं पाकिस्तानी हूँ|" तो म्हणाला.
"कोई बात नहीं| चलो साथमें घूमते हैं|" मी म्हणालो.
तो माझ्याबरोबर चालू लागला. आधी थोडा गप्पसा होता, पण थोड्या वेळाने बोलू लागला. मूळचा पेशावरचा रहिवासी, पण तो थायलंडमध्ये शिंपीकाम करायला आला होता व क्वाला लुंपूरला व्हिसाच्या कामासाठी एक दिवस आला होता. पेशावरला एक बायको होतीच, पण त्याने थायलंडमध्ये आणखी एक लग्न केले होते व या नव्या बायकोबरोबर तो तिथे रहात होता.
"आप ऐसे कैसे कर सकते हैं?" मी विचारले.
"उसमे कोई नयी बात नहीं जी| वहाँ हम सभी लोग ऐसेही करते हैं!" तो उत्तरला.
आता काय बोलायचे म्हणून मी जरा विचारात पडलो. पण तो त्याच्या पेशावरच्या बायकोबद्दल आपणहून बोलू लागला. त्याने त्याच्या नात्यातल्याच मुलीशी लग्न केले होते. "ऐसे क्यूं" या प्रश्नाला उत्तर देतांना तो म्हणाला "यही रिवाज अच्छा है। घरमें बाहरके रिश्तेके साथ बाहरके (म्हणजेच वधूचे नातेवाईक) लोग आकर खामखाँ बात खराब कर देते हैं। राईका पर्बत बना देते हैं। इसलिये रिश्तेवालीसे शादी करनेसे घरके तमाम सवाल घरके अंदरही रहते हैं, बाहर नहीं जाते। इसलिये हम रिश्तेमेंही शादी-ब्याह करते हैं।"
मी तर हा विचार ऐकून चकितच झालो.
"मगर रिश्तेदारोंसे शादी करनेसे बच्चे ठीक नहीं पैदा हों तो?" मी विचारले.
"ऐसी कोई बात नही जी|" उत्तर. अज्ञानात केवढे सुख आहे!
मग कसे कुणास ठाऊक, पण आमचे संभाषण संततीनियमनाकडे वळले.
"अपनी अमदनीमें अगर हम बच्चोंकी परवरिश अच्छी तरहसे नहीं कर सकते तो आप फॅमिली-प्लानिंग क्यूँ नहीं करते? क्यूँ उसके खिलाफ हैं?" मी विचारले.
"अरे साहब, ऐसा करनेसे आप अगले नबीको जनम लेनेसे रोक रहे हैं ये आपने कभी सोचा है? जिसका जनम हमने रोका वो कलका बडा सायंटिस्ट हो सकता था, कोई बडा लीडर, बडा नबी हो सकता था! उसका जनम रोकना बिल्कुल गलत है!"
मी अवाक् झालो! कां कुणास ठाऊक, पण त्याच्याशी झालेले हे संभाषण व त्यातला त्याचा युक्तिवाद इतक्या वर्षांनंतरही माझ्या लक्षात राहिला आहे. कुटुंबनियोजन का करू नये तर आपण जो गर्भ राहू दिला नाहीं तो आईनस्टाईनचा असू शकतो किंवा नव्या संताचा, नव्या प्रेषिताचा असू शकतो हा त्याचा मुद्दा बिनतोड होता. पण अशा विचारांवर विश्वास ठेवणारा तो मला आतापर्यंत भेटलेल्या माणसांत पहिलाच व एकुलता एक माणूस होता. विचार करण्याची ही एक अनोखी रीत होती यात कांहीं शंका नाहीं.
कोणी असे विचार त्याच्या मनात बिंबविले असतील व त्यावर त्याचा कसा विश्वास बसला असेल हाही एक विचार करण्यासारखा व जास्त सखोलपणे अभ्यास करण्याजोगा विषय आहे असे आजही मला वाटते.
हळू-हळू आमच्यातले संभाषणाचे विषय संपले, अंधारही पडू लागला होता. मग आम्ही एकमेकांचा निरोप घेतला.
पण तो पोरगेलासा भांबावलेला किडकिडीत तरुण आजही मला माझ्या मनःचक्षूपुढे दिसतो आणि त्याचे हे विचारही माझ्या लक्षात राहिले आहेत.
तुम्हाला हे वाचून काय वाटले?
याद्या
20790
प्रतिक्रिया
73
मिसळपाव
हॅ हॅ हॅ
+१
In reply to हॅ हॅ हॅ by चतुरंग
+२
In reply to +१ by दिपाली पाटिल
कसली
+१
In reply to कसली by टारझन
संधी मिळाल्यास अशा लोकांशी मी आवर्जून बोलतो
In reply to कसली by टारझन
कैच्याकैच !!
In reply to संधी मिळाल्यास अशा लोकांशी मी आवर्जून बोलतो by सुधीर काळे
मग आम्ही
In reply to कैच्याकैच !! by टारझन
अगदी सहमत!
हं..
एक क्षणिक
बीथोव्हन
यातली बहुसंख्य मुलं उपाशी पोट भरण्यासाठी कसाबच बनणार!
त्याला
पाकिस्तान
चला, एक तरी प्रतिसाद बरा आला!
In reply to पाकिस्तान by JAGOMOHANPYARE
:-)
In reply to चला, एक तरी प्रतिसाद बरा आला! by सुधीर काळे
२१ अपेक्षित
In reply to :-) by सहज
काही पर्याय .. ह.च घ्या!
In reply to २१ अपेक्षित by सुनील
बस, आपकीही कमी थी|
In reply to काही पर्याय .. ह.च घ्या! by ३_१४ विक्षिप्त अदिती
आपापसांत
In reply to बस, आपकीही कमी थी| by सुधीर काळे
'आपापसात
In reply to आपापसांत by ३_१४ विक्षिप्त अदिती
हबिणंडण
In reply to बस, आपकीही कमी थी| by सुधीर काळे
खत्रुड
In reply to काही पर्याय .. ह.च घ्या! by ३_१४ विक्षिप्त अदिती
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
+१
In reply to खत्रुड by नंदन
श्री. परिकथेतील राजकुमार-जी
In reply to +१ by परिकथेतील राजकुमार
श्री.
In reply to श्री. परिकथेतील राजकुमार-जी by ३_१४ विक्षिप्त अदिती
:)
हि हि हि
In reply to :) by ब्रिटिश टिंग्या
बिचारा गरीब पाकिस्तानी....किव येते हो त्याची.
अहो माझा निषेध कशाला?
In reply to बिचारा गरीब पाकिस्तानी....किव येते हो त्याची. by वेताळ
ह्या
In reply to अहो माझा निषेध कशाला? by सुधीर काळे
अरे क्या
काका...
माझा मुद्दा मी वाचकांना समजावून सांगण्यात कमी पडलो!
In reply to काका... by वि_जय
रिपोर्ताज
In reply to माझा मुद्दा मी वाचकांना समजावून सांगण्यात कमी पडलो! by सुधीर काळे
माझ्या
In reply to रिपोर्ताज by प्रकाश घाटपांडे
काय सांगता काय चुचु तै....
In reply to माझ्या by पर्नल नेने मराठे
घाटपांडेसाहेब व चुचु
In reply to माझ्या by पर्नल नेने मराठे
दुबईतील
In reply to घाटपांडेसाहेब व चुचु by सुधीर काळे
धन्यवाद!
In reply to रिपोर्ताज by प्रकाश घाटपांडे
नेहमीसारखा
In reply to रिपोर्ताज by प्रकाश घाटपांडे
पण ही फॅक्टच आहे........
काका, तुमचा
चांगला आहे लेख
एक अजनबी
मला
In reply to एक अजनबी by कानडाऊ योगेशु
दिलगीर आहे
In reply to एक अजनबी by कानडाऊ योगेशु
हं
पूर्णपणे सहमत.
In reply to हं by ऋषिकेश
प्रेषित
जरा विस्ताराने!
In reply to प्रेषित by JAGOMOHANPYARE
सुधारणेला बंदी!
In reply to जरा विस्ताराने! by सुधीर काळे
देवसाहेब! अ
In reply to सुधारणेला बंदी! by प्रमोद देव
काका
चांगले
In reply to काका by समंजस
इतकेच
मुलामा
In reply to इतकेच by प्रदीप
सहमत
In reply to मुलामा by प्रकाश घाटपांडे
पाकिस्तान
ज्याला अॅबरेशन म्हणता येईल ते फक्त मॉर्मॉन धर्माबद्दल ऐकलं होतं
In reply to पाकिस्तान by स्वाती२
>>>>पाकिस्ता
In reply to पाकिस्तान by स्वाती२
काळे काका,
चालायचेच
In reply to काळे काका, by पक्या
प्रकाश-जी
In reply to काळे काका, by पक्या
सुधीरजी,लेख--------
वैशालीताई,
In reply to सुधीरजी,लेख-------- by वैशाली हसमनीस
हे प्रासंगिक लेखन
नाड्या ओढता ओढता एकमत...
In reply to हे प्रासंगिक लेखन by शशिकांत ओक
अगदी सेरा पेलिन व ओप्रा यांच्यातली गट्टी?
In reply to नाड्या ओढता ओढता एकमत... by भोचक
अगदी सेरा पेलिन व ओप्रा यांच्यातली गट्टी?
In reply to नाड्या ओढता ओढता एकमत... by भोचक
नाड्या
In reply to नाड्या ओढता ओढता एकमत... by भोचक
नाड्या ओढता ओढता एकमत...
In reply to हे प्रासंगिक लेखन by शशिकांत ओक