Skip to main content

मुंबईतील हॉटेलमधील नवीन नियम

लेखक देवदत्त यांनी शनिवार, 12/12/2009 18:10 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईतील हॉटेल संघटनेने लागू केलेल्या नव्या नियमापासून ताटात घेतलेले अन्न टाकल्यास पाच रू. दंड आकारण्यात येणार आहे. वाढती महागाई व अन्न धान्याची कमतरता हे मुख्य कारण असल्याचे सांगत आहेत. तसेच ग्लासातील वाढलेल्या पाण्याचाही अपव्यव टा़ळण्यात येणार आहे. (स्टार माझावरील बातमी येथे वाचा. व्हिडीयोचा नेमका दुवा मिळाला नाही.

बदक आणि राजहंस

लेखक प्रशांत उदय मनोहर यांनी शनिवार, 12/12/2009 15:58 या दिवशी प्रकाशित केले.
"नको लाजवु बदकास राजहंसा पुरे आता लटकी तुझी प्रशंसा दैवयोगे तू हंस जाहलासी मित्र बदकाला परी विसरलासी लाभली तुजला मान डौलदार मानसात तुझा त्यामुळे विहार रसिकजन ते भाळले मानसाला राजहंसाचा होय बोलबाला." राजहंसाला बदक वदे ऐसे हंसमन ते जाहले हरवलेसे आठवे त्याते बाल्य लोपलेले कुरूपाला तै लोक हासलेले मित्र बदकाला राजहंस बोले "स्मृती बाल्यातिल आठवू नको रे जरी मैत्री दृढ आपुली असे रे भेटता दोघां यातना किती रे! कटू बाल्यावर सोडिले जळासी रसिकजन मी रिझविले मानसासी जाणतो मी, लटकी असे प्रशंसा मानसास्तव पाहती राजहंसा जोवरी माझी डौलदार मान तोवरी माझा मानसात मान लोपता हे सौंदर्य विसरतील बदकरूपाते कोण भाळती

गेले आडवे मांजर!

लेखक मानस६ यांनी शनिवार, 12/12/2009 14:35 या दिवशी प्रकाशित केले.
गेले आडवे मांजर, चुके ठोका काळजाचा, मांजर बी हळू बोले, गेला उंदीर हातचा! आज हाये अमावस्या, वाटे धाक-धुक फार, झाला पोरगा वकील, आली दारावर तार ! कसंनुसं वाटे मले, लेक दारात शिंकली, परं माह्या येड्या मना, तिले सर्दी भाय झाली ! पडे हातातुन खाली , कुंकवाचा ग करंडा, पर धनी आने घरी, भरलेला बैलगाडा! जाता तिघे जन संगे, म्हने कामे बिघडती, पर लेकरु आजारी, संगे माय-बाप जाती ! जीव वरती खालती, विझे देवाचा ह्यो दिवा, कर थोडा त ईचार, आली जोरात ही हवा ! भारी लवे डावा डोळा, काय वाईट आनखी? पर आली दारावर, बगा साईची पालखी ! -मानस६

(डिजीटल किंवा साधी) फोटोग्राफी - एक कला की विज्ञान ?

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 12/12/2009 09:26 या दिवशी प्रकाशित केले.
(डिजीटल किंवा साधी) फोटोग्राफी - एक कला की विज्ञान ? डिस्क्लेमर : या काथ्याकूटात मिपावर असणार्‍या फोटोग्राफरांना व कलादालनात फोटो टाकणार्‍यांना दुखावण्याचा अजिबात हेतू नाही. या बाबत मागेच मी एका धाग्यात या बद्दल चर्चा करण्याबाबत विचारले होते. साधा फिल्मवरचा फोटो घ्या किंवा आताचे डिजीटल कॅमेरॅवरचे काढलेले फोटो घ्या, फायनल रिझल्ट (फोटो) तुमच्या हातात येईपर्यंत तुम्हाला कोणतेतरी तांत्रीक हत्यार वापरावी लागते किंवा त्या हत्यारांद्वारे केलेली क्रिया वापरावी लागते.

फोटो संपादन

लेखक विनायक रानडे यांनी शनिवार, 12/12/2009 04:47 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या जिफ चित्राद्वारे मी प्रतिमा ग्राहकाने - प्रग्रा - कॅमेराने घेतलेल्या छाया चित्राचे कसे संपादन केले ह्याचा एक नमूना.

शनिवारचा ऊतारा.. अजुन एक दुविधा

लेखक हर्षद आनंदी यांनी शनिवार, 12/12/2009 03:44 या दिवशी प्रकाशित केले.
हे असं का? ते तसं का? या द्विधा मनस्थितीत, एक कोणीतरी जगत असतो कधी नाक मुरडत, कधी शिव्या घालत, कधी तोडफोड करत, माजोरड्यांविरुद्ध लढत राहतो, उंबर्याची बंधने झुगारुन, समाजाची चौकट ओलांडुन, नवे नवे पायंडे पाडत राहतो कारण.... हाडांच्या काड्या करुन, आयुष्याचे मातेरे करुन लाखोंच्या जगण्याचे मोल चुकविण्यासाठी टाकीचे घाव सोसणं सटवाईने कोरलेलं असत.........
काव्यरस

शनिवारचा उतारा - दुविधा

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी शनिवार, 12/12/2009 03:18 या दिवशी प्रकाशित केले.
एक फुलपाखरू दुविधेत टाकून गेलं... हे असं का? ते तसं का? या द्विधा मनस्थितीत, प्रत्येकालाच लिहावं लागतं कधी कंपूबाजांसारखं, कधी मालकाविरुद्ध धुडगूस करत, विडंबन पाडत रहावं लागतं कंपूविरुद्ध लिहीताना, आणिबाणीची बंधनं झुगारून, शुद्धलेखनाची चौकट ओलांडून पुढची लाईन पाडावीच लागते, कारण.... कवड्यांच्या दमड्या होऊन भरघोस मानधन मिळण्यासाठी आंतरजालातून बाहेर पडावंच लागतं............
काव्यरस

उपसंहार

लेखक दमनक यांनी शुक्रवार, 11/12/2009 19:37 या दिवशी प्रकाशित केले.
दोन बातम्या. काल बजाज स्कूटरच्या निधनाची आणि आज दिपुंच्या. एका युगाचा अंत झाला अनेक अर्थांनी. बजाज स्कूटरीला भारतीय मध्यमवर्गीयांचे प्रतीक मानले गेले, तसे दिपु हे भारतीय मध्यमवर्गीयांचे प्रतीक असे म्हटले तर अनेकांच्या भुवया उंचावतील. रूढार्थाने दिपु हे 'एनिथिंग बट मिडलक्लास'. विश्वभान, कालभान आणि या सर्वांच्या साक्षीने आत्मभान असलेला साहित्यिक. विसाव्या शतकातला 'फार महत्त्वाचा कवी'. या माणसाला मध्यमवर्गीय विचारसरणीत बसवणे शक्यच नाही. विचारसरणी ही मोठी मजेशीर गोष्ट आहे, नाही का ? जर एक विचारसरणी 'पुढे' गेली काय किंवा 'मागे' आली काय...

ऑनलाईन स्नेहसंमेलन

लेखक अमृतांजन यांनी शुक्रवार, 11/12/2009 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
थंडीचे दिवस आले की, शाळांमधे स्नेहसंमेलन होतात. त्यावरुन असा प्रस्ताव मांडावासा वाटला की, आपणही एक स्नेहसंमेलन घ्यावे पण ते ऑनलाईन असणे ही त्याची प्रमुख अट. असा प्रकार मराठी संस्थळाच्या इतिहासात प्रथमच होणार असल्यामुळे त्यास एक वेगळेच महत्व प्राप्त होईल. हे संमेलन मिपावरच व्हायला हवे असे नाही- एखादा नवा ब्लॉगस्पॉट करुनही शक्य आहे- जर येथे परवानगी नसेल तर. अशा ऑनलाईन स्नेहसंमेलनाचे स्वरुप कसे असावे ह्याबद्दल आपले काय मत आहे?