जे जाणवतं ते नेहमीच सत्य नसतं........
गेला महिनाभर नीलिमा हळूहळू परंतु पद्धतशीर चाललेला प्रयत्न पाहत होती. पहिले काही दिवस तिला काहीतरी वेगळे आहे असे जाणवले असले तरी, छे! उगाच शंका घेते आहेस. असे स्वतःलाच ती सांगत होती. कालच्या घटनेने तर स्पष्ट दिसलेच. तातडीने यावर बोलायला हवेय हे कळतही होते पण कसे हे समजत नव्हते. नेहाशी आज मनमोकळे बोलून पाहावे, कदाचित ती मार्ग सुचवील म्हणून ती तिच्याकडे निघाली होती.
" अग, किती उशीर? मला वाटले आता येतच नाहीस. " नेहाने नेहमीप्रमाणे गोंधळ सुरू केला. " काय बाईसाहेब, फारच गंभीर दिसता आहात. कोणी प्रपोज केलेय का? घरी सगळे ठीक आहे ना? तू आजारी तर दिसत नाहीस. चेहरा का कोमेजला आहे?
मिसळपाव
