Skip to main content

<strong>खेळ मांडला.....</strong>

लेखक उदय सप्रे यांनी बुधवार, 13/01/2010 10:02 या दिवशी प्रकाशित केले.
आम्हीच निवडून दिलेले नेते आमच्याच पैशांवर स्थूल होतात आणि मग आमचेच प्रश्न "स्थूल्"मानाने सोडवतात (?????) तेंव्हा ओठी येणारी ही वीराणी .....

धान्यापासून दारुच्या विरोधात उपोषण

लेखक hemant यांनी बुधवार, 13/01/2010 10:01 या दिवशी प्रकाशित केले.
धान्यापासून दारू बनविण्याच्या घातक निर्णयामुळे महाराष्ट्रात धान्याचे दुर्भिक्ष्य होईल, समाजात दारू वाढेल, युवा पिढी व्यसनी होईल आणि राजकारण्यांचे खिसे भरतील. याला आमचा विरोध आहे. शासनाच्या निर्णयाचा निषेध म्हणून व यामुळे ज्या लोकांवर उपासमारीची वेळ येईल त्यांच्या दु:खाच्या सह-अनुभूतीसाठी आम्ही निर्माणचे युवा, एक जानेवारी 2010 पासून वैयक्तिक पातळीवरील प्रतिकात्मक अशा एक दिवसीय उपोषणाची मानवी साखळी तयार करत आहोत. आमचे दोन प्रतिनिधी नव्या वर्षाची सुरुवात या संकल्पाने करताहेत व त्यानंतर रोज काही नविन सहकारी ही साखळी पुढे चालवतील.

गवगवा.....

लेखक उदय सप्रे यांनी बुधवार, 13/01/2010 09:43 या दिवशी प्रकाशित केले.
गवगवा..... बघ पुन्हा शब्द आले अन् अर्थ नवा ल्याले अंधारी अडखळता तू तुजसाठी दिवा झाले ! हरवलेला सूर तुझा लोपले संगीतही शब्द तेच , साद तीच दुवा खरी, दवा झाले ! मग बहरलीस तू अशी विसरलीस सहज मला तूच माझे विश्व सखे, तुझे अस्तित्व....वानवा झाले ! ताकद बघ शब्दांची सह्स्त्र लोक गुणगुणले माझ्या भावनांचा पक्षी - एक आपोआप थवा झाले ! आलीस मग परतून तू मन मोरपिशी हवा झाले ऊष्ण तुझ्या अश्रूंचे स्पर्श माझ्या शवा झाले ! शब्द माझे गाऊन तू लोळतेस ऐश्वर्यी संपल्या म्या भणंग
काव्यरस

मी भटकंती का करतो?

लेखक भटकंती अनलिमिटेड यांनी बुधवार, 13/01/2010 01:39 या दिवशी प्रकाशित केले.
"मी भटकंती / ट्रेक्स का करतो?" मला कुणी हा प्रश्न विचारलात एका शब्दात मी म्हणेन "खाज"..!!! हो हेच उत्तर आहे खरे. पण जेव्हा मी स्वतःलाच हा प्रश्न विचारतो तेव्हा असे उर्मट उत्तर देऊ शकत नाही. [कुणापेक्षाही स्वतःचा आदर करावा माणसाने :-) ] एक तर हा प्रश्नच का असावा? उलट प्रश्न असा असावा: तू (आणि आणखी मोजके काहीजण) सोडून बाकी लोक भटकंती / ट्रेक्स का करत नाहीत? असो करणं - न करणं ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण जेव्हा मी खरंच स्वत:ला असे विचारतो तेव्हा माझा आतला आवाज काय बरे सांगत असतो? असाच एके दिवशी तंद्रीत काही उत्तरं ऐकू आली मला माझ्याच आतमधून.

छंद दे..

लेखक प्राजु यांनी मंगळवार, 12/01/2010 23:32 या दिवशी प्रकाशित केले.
गर्दकाळी रात्र सारी, तेवणारा चंद्र दे जीवघेणी ही निराशा, जीवनाला स्पंद दे.. ध्येय नाही फ़ार मोठे जीवनाचे माझिया सत्य व्हावे, स्वप्नं ऐसे, पाहण्या आनंद दे.. नको कोसळ भिजवणारा तापलेल्या भूमिला चार थेंबानी खुलावा, आगळा मृदगंध दे.. बधिर झाल्या भावनांची कास का मीही धरू? वेदनेला पेलण्याला, या उरी आक्रंद दे.. रोज जोडूनी तुटावे हे असे धागे नको जीवनाला बांधणारा एक प्रेमऽबंध दे .. मी न मीरा, मी न राधा, ना तयाची प्रेमिका दर्शनाने मुग्ध व्हावे, तोच देवकिनंद दे.. स्तोम नाही प्रार्थनांचे, दक्षिणेची लाच ना लीन व्हावे ज्या पुढे मी, त्या तुझा बस्स! छंद दे.. - प्राजु

विडंबक

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 12/01/2010 21:10 या दिवशी प्रकाशित केले.
संदीप खरेची 'नास्तिक' ही कविता बरेच दिवस मनात ठाण मांडून होती, आणि आज अचानक अनेक दिवसांनी ....... एक खरा खुरा विडंबक जेव्हा कवींच्या टांकसाळीबाहेर थांबतो तेव्हा खरं तर साहित्यात भरच पडत असते की कोणीतरी आपल्यापुरता सट्ट्याशी का होईना, पण प्रामाणिकपणे चिकटून राहिल्याच्या पुण्याईची ! एक खरा खुरा विडंबक जेव्हा कवींच्या टांकसाळीबाहेर थांबतो तेव्हा होते निर्माण गरज कवींनी आपले काव्य पाडणे थांबवून टांकसाळीबाहेर येण्याची ! एक खरा खुरा विडंबक जेव्हा कवींच्या टांकसाळीबाहेर थांबतो तेव्हा शोधक नजरेने पाहत राहतो सभोवतालच्या कविता,
काव्यरस

डिप्लोमाधारकांची मुस्कटदाबी

लेखक अमृतांजन यांनी मंगळवार, 12/01/2010 20:30 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याकडे दहावीनंतरचा जो इंजि. डिप्लोमा आहे, तो केल्यानंतर हे विद्यार्थी जमले तर पुढे शिक्षण चालू ठेवतात अथवा कामधंद्याला लागतात. त्यांचे इंजि स्किल तसे बरेच चांगले असते व त्याबळावर ते पद आणि यश मिळवतात. त्यातुलनेने ग्रॅज्युएट झालेल्या सायन्स, कला, कॉमर्स, ई शाखांतून बाहेर पडलेल्या विद्यार्थांपेक्षा नोकरी मिळवण्यासाठी जास्त परीणमकता ह्या पदवीकेत असते हे म्हणले तर आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. असे पदवीकाधारी, ३ ते ४ वर्षांच्या कामानंतर नव्हे तर अगदी २० वर्षांच्या नोकरी-धंद्यानंतरही पदवीच्या तुलनेत खालीच धरले जातात. ह्यांना एम.बी.ए.

चालू करा तुमचे इंजन

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 12/01/2010 12:11 या दिवशी प्रकाशित केले.
सिचूयेशन: आप्ल्या पिच्चरचा बागाईतदार नायक निसता उंडारेल हाये. त्यो नुसता इकडतिकड पुढारपन करत फिरत आसतूया. त्येच्यावाली हिरवीन बायकू लय आंग मोडून शेतात कामं करतीया. आप्ला हिरो शेतात फिरकना झालाय. तवा काय व्हत त्ये हिरवीन गानं म्हनूनशान सांगती.

"रत्नपारखी शिवराय - भाग २ : कान्होजी जेधे".....एक झलक

लेखक उदय सप्रे यांनी मंगळवार, 12/01/2010 11:26 या दिवशी प्रकाशित केले.
सप्रेम नमस्कार मंडळी ! दिनांक ७ जून २००९ रोजी माझे पहिले पुस्तक "रत्नपारखी शिवराय - भाग १ : बाजी पासलकर" प्रकाशित झाले आणि त्याला उदंड प्रतिसाद मिळतो आहे.या छोटेखानी पुस्तिकेद्वारे मी काहि वाचकांच्या मनापर्यंत पोचलो याची साक्ष देणारे अनेक फोन्स , ईमेल्स , पत्र येतात त्यावरून लक्षात येते आहे.आता "रत्नपारखी शिवराय - भाग २ : कान्होजी जेधे" जे ८५ % लिहून झाले आहे पण गेले सुमारे सव्वा वर्ष ते ८५ % एव्हढेच पूर्ण राहिले आहे ते लिहायला घेण्याचा मानस आहे.यासाठी एक सुरेख संधी पण डोंबिवलीच्या रोटरी क्लब ने उपलब्ध करून दिली आहे - १६-१७ जानेवारीला रायगड्-प्रतापगड वारी (हो आम्हा शिवप्रेमींस