Skip to main content

कॉलेज कट्टा भाग - अंतिम

लेखक मराठमोळा यांनी शुक्रवार, 16/07/2010 01:24 या दिवशी प्रकाशित केले.
---भाग - १ --- ---भाग - २ --- ---भाग - ३ --- ---भाग - ४ --- ---भाग - ५ --- "ज्या पोरी पोरांवर जाळं टाकायला सुरुवात करतात, त्त्यांच्यावर नजर ठेवुन मोका मिळताच त्यांना खलास करायचं" - रुपेश सगळ्यांचे रक्ताळलेले सैतानी डोळे एकमेकाकडे बघत होते. आतल्या ज्वालामुखीला वाट मिळाली होती.

एका स्थळात लिहिली, जी धोरणे अनेक

लेखक केशवसुमार यांनी गुरुवार, 15/07/2010 22:49 या दिवशी प्रकाशित केले.
केसुरंगाशेठांचे विडंबन झळकले तेव्हा आम्ही चौपाटीवर भेळ खाण्यास गेलो होतो.. तिथे काही जालकंटकांची एक टोळि ही आली होती..

एका स्थळात लिहिली, जी धोरणे सुरेख

लेखक केसुरंगा यांनी गुरुवार, 15/07/2010 22:45 या दिवशी प्रकाशित केले.
काल जालभ्रणकरताना मिपाच्या दिशेने बराच धुरळा उडलेला दिसला. नक्की काय झाले पाहण्यासाठी आम्ही तिथे गेलो तर काही जालकंटक आणि पाध्ये यांच्यात चौपाटीवर खडाजंगी चालू होती.. धोरणे, अन्याय , आणीबाणी, गुंड, आयोजक, यजमान, कुत्रे, डुक्कर, इंदिरा गांधी वगैरे वगैरे शब्द फेकाफेकी सुरु होती.
काव्यरस

शिरगाव मध्ये सुरू असलेल्या संगणक शिक्षणावरील ब्लाग

लेखक शनआत्तार यांनी गुरुवार, 15/07/2010 19:51 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार आमच्या शाळेत चालणा-या संगणक शिक्षणावर स्वाती देसाई हीने एक माहीती पट तयार केला होता त्याचे परीक्षण एका ब्लाग आले आहे ते आपल्या माहीती साठी व वाचना साठी देत आहे Monday, 1१1ly 13, 20१० A DOCUMENTARY REVIEW ON ICT HARVEST ICT Harvest a film is made by Swati Desai a creative consultant. This film is made with financial support from HIVOS and Comet Media Foundation 2007.From 2002 to 2007, NIIT an IT Training and Developing Organization undertook a study investigation what children did when left themselves with a computer and a high speed internet connection.

गोड गोड माणूस .

लेखक हेमंत रायकर यांनी गुरुवार, 15/07/2010 19:42 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार .मी हेमंत रायकर. व्यवसायानी प्रकाशक. आमचा हा व्यवसाय जयहिंद प्रकाशन -रायकर ब्रदर्स या नावानी प्रसिध्द आहे. आमचे वडील (कै) ग.का. रायकर यांनी हा व्यवसाय सुरु केला आणि नावारुपाला आणला. तो काळ मराठी साहीत्याचा -मराठी मासिकांचा -दिवाळी अंकांचा सुवर्णकाळ होता. श्री दीपलक्ष्मी आधी मासिक होते. सध्या श्री दीपलक्ष्मी हा दिवाळी अंक नियमीत स्वरुपात येतो. या व्यवसायाच्या निमीत्ताने माझ्याकडे उत्तमोत्तम साहीत्याचा खजीना उपलब्ध आहे. या खजीन्यातून काही निवडक लेख मिसळपावच्या वाचकांना द्यायचा मनसुबा आहे*. या मालीकेतला हा पहीला लेख जयवंत दळवींचा आहे.

मी न माझा………

लेखक निरन्जन वहालेकर यांनी गुरुवार, 15/07/2010 12:37 या दिवशी प्रकाशित केले.
मी न माझा……… गुंतलो इतुका ईश्कांत तुझिया राहिलो अता मी माझाच नाही. आभासत नाही ज्या गंधात तू, तो गंध मज मोहीत नाही. जी वाट जात नाही तुज घरां, वाटेवरून त्या मी जात नाही. ज्या फुलांत ना कोमलता तुजसम, ती फुले मी वेचीत नाही. हृदय वेदना ज्यां नं जाणवती तुला, वेदनाचे अशा मज दुखः नाही. भेटली आताच पाहिले डोळे भरुनी, विरहाचे आता मला दुखः नाही. सामावली श्वासांत, रंध्रा रंध्रात तू, अस्तित्व मजला तुजवीण नाही निरंजन वहाळेकर

कव्वाली : अशी ग कशी सोडूनी जाते तू मला

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 15/07/2010 10:40 या दिवशी प्रकाशित केले.
कव्वाली : अशी ग कशी सोडूनी जाते तू मला
अशी ग कशी सोडूनी जाते तू मला | करू मी काय विचारू कसे मी तूला ||धृ|| वाटे जीवन आता हे सारे आले संपुष्टात | नश्वर शरीर हे आत्मा कसा राहील त्यात सांभाळू काय कसे मला न समजेना | शेवटचे भेट मला हे ही बोलवेना ||१|| कधी काळी आठवण जरी माझी आली | नकोस भेटू कसे म्हणू मी त्या वेळी हुरहुर लागे नेहमी माझ्या जीवा | आठवणी जुन्या साधती कावा ||२|| पावसाचे थेंब जेव्हा सोडतात मेघांना | हुरहुर लागते तेव्हा त्यांना तशीच हुरहुर लागली मला तेव्हा | सोडून गेलीस जेव्हा तू
काव्यरस

हिंदू धर्म, वर्णव्यवस्था वगैरे वगैरे

लेखक अप्पा जोगळेकर यांनी गुरुवार, 15/07/2010 10:07 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना - हजारो वर्षे उलटून गेली, हजारो संकटे येऊन गेली आणि असंख्य राजकीय, सामाजिक स्थित्यंतरेदेखील घडून गेली पण आमच्या हिंदू समाजाचे व्यवच्छेदक लक्षण जे की जातीव्यवस्था ते अजूनही अत्यंत चिवटपणे तग धरुन आहे. प्राप्त परिस्थितीत आमच्या आजच्या भारतीय राष्ट्रास अत्यंत हानिकारक ठरलेल्या आणि हिंदू समाजास न्यूनतः चार सहस्त्र जातींमध्ये विभागणार्‍या या व्यवस्थेच्या उगमाबद्दल, 'Origins of the caste system' या लेखामध्ये मी थोडासा ऊहापोह केला होता. यासंदर्भात आणखीन काही गोष्टी वाचनात आल्या म्हणून या लेखाचा पसारा मांडत आहे.

अमेरिकेतील दहावी बारावी ची वर्षे

लेखक पारुबाई यांनी गुरुवार, 15/07/2010 06:10 या दिवशी प्रकाशित केले.
भारतामधील शिक्षण पद्धती ही अमेरिकेतील शिक्षण पद्धतीपेक्षा अनेक बाबतीत निराळी आहे.भारतामध्ये ज्याप्रमाणे दहावी आणि बारावीची वर्षे आयुष्याला दिशा देतात तशी इथे नववीपासून बारावीपर्यंतची चार वर्षे आयुष्याला दिशा देणारी असतात.अमेरिके मधला विद्यार्थी कोण कोणत्या आघाड्यावर लढत असतो? कशी असतात ही नववी ते बारावी ची चार वर्षे ?