Skip to main content

माझ्या 'गोव्या'च्या पुडीत

लेखक अडगळ यांनी मंगळवार, 03/08/2010 00:11 या दिवशी प्रकाशित केले.
(कै . कवी बोरकर आणि त्यांचे वाचक , मागितली तरी क्षमा करणार नाहीतच , म्हणुन मग क्षमा न मागताच लिहीतो.) माझ्या 'गोव्या'च्या पुडीत, गड्या, तुतारी वाजते, नसानसातून जणू , ब्रम्ह फुगडी खेळते. माझ्या संभाजी बिडीत, झाले केवड्याचे श्वास, फुले मेंदूत मोगरा, दिवेलागणीचे भास, माझ्या मनाच्या मातीत, फुले तंबाखूचे मळे, झाले आभाळ चुन्याचे, दाढेआड चंद्र खेळे. माझ्या रस्श्याच्या वाटीत, मटणाचा महामेरू, पोटा लागली तडस, चला फुलचंद मारु. माझ्या जगत्या कुडीत, आले माहेराला सारे, घ्यावा जीवाचा जोगवा, सारी उघडली दारे.
काव्यरस

जीवन म्हणजे मुशायरा

लेखक अजय जोशी यांनी सोमवार, 02/08/2010 20:27 या दिवशी प्रकाशित केले.
बोचता गुलाबी गजरा फाटला मनाचा सदरा खळाळतो नेहमी जिथे असतो तेथे उथळ झरा र्‍हदय ओतले शेरातुन म्हणा बरा की म्हणा खरा शेर बनावे र्‍हदय र्‍हदय जीवन म्हणजे मुशायरा आयुष्याचा असे 'उला' नंतरचा 'सानी' मिसरा औषध घेऊ प्रेमाचे करू जरासा अहं बरा करू काळजी का तुमची? असे मरा की तसे मरा जितका हसतो मी, तितका- मनीं खोलवर असे चरा दु:ख दिलेस मला; असु दे .., तुझाच मी; नाही उपरा जरी आज ओळखते जग अजून थोडा धीर धरा - अजय जोशी, पुणे

जाहीर आभारप्रदर्शन सोहळा.....

लेखक जाई अस्सल कोल्हापुरी यांनी सोमवार, 02/08/2010 19:30 या दिवशी प्रकाशित केले.
... मला माझ्या एका छान मित्राचे आभार मानायचे आहेत... .....कशाबद्दल?..... ....कारण त्याने माझं एकटेपण दूर केलं... ....मला व्यक्त होण्यासाठी...... माझ्यातल्या impulsive जाई ला मुक्तपणे व्यक्त व्हायला एक स्थान दिलं.... ... अनेक प्रकारचे....वेगवेगळ्या विचारसरणीचे.....खुप छान मित्र दिले.... ....जे काही थोडंसं लिहावंसं वाटतं ते लिहायला संधी.....

<घागरा>

लेखक अवलिया यांनी सोमवार, 02/08/2010 17:57 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा... मोगरा... आणि आमचे परममित्र .. होय तोच तो ... निवासी लांडगा ;) आज भल्या दुपारी , कुठुन हा घागरा कडमडला. कॅफेमध्येच डोळ्यासमोर , तुझा मुखडा सुर्यासारखा अवतरला. मग त्या सोनेरी किरणात , मी सर्वांगी न्हाऊन निघालो. तुझ्या मदहोश हसण्यामध्ये , नकळत स्वत:ला हरवुन गेलो. जेंव्हा पुर्ण जाग आली , माझ्या गालावर खुलली होती लाली. खरं सांग बये , ही करामत आपोआप झाली , की दुपादुपारी तुझ्या हातांनी , बिन तोड गोलंदाजी केली .
काव्यरस

रावण पिठले......झणझणित.....

लेखक जाई अस्सल कोल्हापुरी यांनी सोमवार, 02/08/2010 17:49 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : १ वाटी साधारण मध्यम आकारात चिरलेला कांदा / पात १ वाटी तेल १ वाटी तिखट (कोल्हापुरी मसाला वाले तिखट (कांदा लसुण मसाला तिखट) असेल तर उत्तम १ वाटी डाळिचे पीठ २ वाट्या गरम पाणी (कांदा चिरताना पाणी तापवायला ठेवावे..म्हणजे ऐन वेळी उकळते मिळेल) कोथिंबीर १ वाटी फोडणीचे साहित्य मीठ : चवीपुरते (नाहीतर बाकी सगळं १ वाटी आहे म्हणुन..

दयाळू

लेखक सौरभ परांजपे यांनी सोमवार, 02/08/2010 17:40 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या मनाला कसा उमजून टाळू? मोग-याचा गजरा कोणत्या केसात माळू? कोणत्या युगात जन्म घेतला मी येथला हर एक पापी कनवाळू माझ्या पवित्रतेचे का मांगता पुरावे? सीतेला तुम्हीच दिलेत चितेत जळू मला भोगणारा, माझाच सखा होता कोणत्या खांद्यावर विसावून अश्रू गाळू माझ्या सहिष्णूतेला त्यांचा आक्षॆप होता त्यांतला कोणीच नव्हता इतका दयाळू

प्रश्न

लेखक सौरभ परांजपे यांनी सोमवार, 02/08/2010 17:38 या दिवशी प्रकाशित केले.
जीवंतपणी जीवाला का जाळतात प्रश्न? तिरडीवर ही मेले छळतात प्रश्न दिवसभर उत्तरे शोधून थकलो मी थडग्यात देखील साले डसतात प्रश्न चितेवर सुटकेचा निश्वास घेतला मी प्रेत जळले तरी राहतात प्रश्न माझ्या चितेची सोय मीच केली घट्ट नात्याची वीण उसवतात प्रश्न पतनाचा माझ्या ’आगाज’ मीच केला बरेचवेळा माणसाला घडवतात प्रश्न मी न केला कधी कोणास प्रश्न उगाच केविलवाणे करतात प्रश्न निरंतन संघर्षाचा ’यल्गार’ मीच केला जन्मभर पुरुन परत उरतात प्रश्न आर्थिक, कौंटुंबिक, राजकिय, सामाजिक प्रश्न सामान्य माणसाला फक्त नाडतात प्रश्न एक-एक करुन सोडवायला सारे घेतले भूमितिय पद्धतिने अचानक वाढतात प्रश्न
काव्यरस

'मोगरा'

लेखक दिलीपकुमार यांनी सोमवार, 02/08/2010 17:38 या दिवशी प्रकाशित केले.
आज भल्या पहाटे , कुठुन हा मोगरा दरवळला. झोपेमध्येच डोळ्यासमोर , तुझा मुखडा सुर्यासारखा अवतरला. मग त्या सोनेरी किरणात , मी सर्वांगी न्हाऊन निघालो. तुझ्या मदहोश हसण्यामध्ये , नकळत स्वत:ला हरवुन गेलो. जेंव्हा पुर्ण जाग आली , तुझ्या गालावर खुलली होती लाली. खरं सांग प्रिये , ही करामत आपोआप झाली , की सकासकाळी माझ्या ओठांनी ,

कॉर्पोरेट / कॉलेज पार्ट्या, ग्रामस्थ आणि तारतम्य ...

लेखक छोटा डॉन यांनी सोमवार, 02/08/2010 17:25 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावरच्या सदस्य आणि वाचकांपैकी अनेकजण कुठल्या कुठल्या कंपन्यात काम करत असतील, कोण कॉलेजात शिकत असेल, इतर कोणी कुठल्या सामाजिक संस्थांमध्ये काम करत असेल. मला मग एक सांगा की हे 'कॉर्पोरेट / कॉलेज पार्ट्या ' हे प्रकरण तुम्हाला नविन आहे का हो ? जरा खालच्या लिंकवरची बातमी वाचा ... http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6246549.cms त्याचा थोडक्यात गोषवारा असा की ...
फ्रेण्डशीप डे ' च्या निमित्ताने थेऊर येथील एका बंगल्यात आयोजिण्यात आलेल्या विनापरवाना दारू पार्टीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी अचानक धा