Skip to main content

'मोगरा'

'मोगरा'

Published on सोमवार, 02/08/2010 प्रकाशित मुखपृष्ठ
आज भल्या पहाटे , कुठुन हा मोगरा दरवळला. झोपेमध्येच डोळ्यासमोर , तुझा मुखडा सुर्यासारखा अवतरला. मग त्या सोनेरी किरणात , मी सर्वांगी न्हाऊन निघालो. तुझ्या मदहोश हसण्यामध्ये , नकळत स्वत:ला हरवुन गेलो. जेंव्हा पुर्ण जाग आली , तुझ्या गालावर खुलली होती लाली. खरं सांग प्रिये , ही करामत आपोआप झाली , की सकासकाळी माझ्या ओठांनी , कांही गोड आगळीक केली .
लेखनविषय:

याद्या 3774
प्रतिक्रिया 6

आताशाच कुठल्याश्या कवितेत वाचले, तिचा चेहरा त्याला म्हणे पावसासारखा वाटला, आता तुम्हाला सूर्यासारखा वाटतोय? अरे काय चाल्लय काय? असो, दादा कोंडक्यांच्या एकटा जीव सदाशिव ह्या चित्रपटातील गाण्याची आठवण झाली! डोल्यानं त्यानं केली मस्करी, खुना उमटल्या गालावरी....

कविता आवडली.

बाकी, हा आमचा मोगरा, याच्यावर आमचा फार जीव. फुले वेचिता बहरू कळियासी आला.........