Skip to main content

दारी उभा गे साजण

लेखक मितान यांनी गुरुवार, 05/08/2010 20:34 या दिवशी प्रकाशित केले.
तो: एक विचारु ? ती: ह्म्म.. विचार की.. तो: तिच्या गावी जातोय तर एकदा भेटेन म्हणतोय.. ती:( कातर,व्याकूळ झालेले डोळे लपविण्यासाठी मान फिरवून ) बघ. म्हणजे ठरव तूच ! तो: एकदा भेटूनच येतो. ती: परवा सकाळी येशील नं घरी? तो: हो. तो जातो. ही सैरभैर. ही भेटण्याआधी ती याच्या आयुष्यात होती. लाटेसोबत आलेल्या शिंपलीसारखी. दुसर्‍या लाटेबरोबर निघूनही गेली....हिला त्या जखमा दिसल्या तेव्हा दातओठ खाऊन जिवाच्या कराराने त्या पुसण्यासाठी किती झगडली ! आणि आज पुन्हा तो म्हणतोय............ रात्रभर कूस बदलत आभाळातल्या चांदण्या मनात टोचवून घेत राहिली. चांदण्याही मग हक्काने टोचत राहिल्या.

मावळतीला रंग शोधणारा ढग मी...

लेखक फ्रॅक्चर बंड्या यांनी गुरुवार, 05/08/2010 19:05 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाळ्यात इंद्रधनुसवे रंगणारा पावसाचा थेंब मी अन कधी कधी सात रंगाशी नाते जोडणारा इंद्रधनू मी माझ्या पंखांसाठी फुलांचा रंग वेचणारे फुलपाखरू मी अन कधी रंगासाठी आसुसलेला रंगपेटीतला कुंचला मी तुझ्या डोळ्यात माझ्या स्वप्नांसाठी रंग शोधणारा वेडा मी अन कधी उन्हाळ्यात उन्हासवेच रंगणारा प्रियकर गुलमोहर मी कधी पहाटेला सूर्यासवे भगव्यात रंगणारा शुक्रतारा मी अन कधी मावळतीला स्वत:साठी रंग शोधणारा ढग मी

जीव तुझा कासावीस ...

लेखक वैभव देशमुख यांनी गुरुवार, 05/08/2010 17:11 या दिवशी प्रकाशित केले.
तू गं उभी अंगणात माफी मागताना मला एका हातामधी झाडू एक कानापाशी गेला आधी पुंजा गोळा केला पुन्हा पांगून टाकला तुझं अंगण झाडणं असं उन्हाच्या वेळेला हसू फुटलं तरीही हसू दाबलं ओठात गेलो उठून घरात खोट्या रागाच्या भरात दार लावून घेतलं डोळा फटीशी लावला जीव तुझा कासावीस मी गं होताना पाहिला... - वैभव देशमुख

माझे मत

लेखक सविता शिरगावकर यांनी गुरुवार, 05/08/2010 16:37 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव ह्या संकेतस्‍थळाशी माझी ओळख झाली ती अगदी अपघाताने. ऑफिसच्‍या कामानिमित्‍ताने आंतरजालावर विहरत असताना सहजच ह्या संकेतस्‍थळाशी गाठभेट झाली. जसजसे मिपा वरील लेख आणि त्‍यावरील प्रतिक्रिया/प्रतिसाद वाचत गेले तसतशी मिपा च्‍या प्रेमात पडत गेले. कित्‍येकदा तर (मी मागेच म्‍हटल्‍याप्रमाणे) मिपा सदस्‍यांनी एकमेकांची घेतलेली फिरकी वाचून मी मनसोक्‍त हसले आहे आणि त्‍यांच्‍या हजरजबाबीपणाला मनोमन दाद ही दिली आहे. मिपाच्‍या सदस्‍यांचे विविध विषयांना स्‍पर्श करणारे लेख, त्‍यांचा अभ्‍यास, कविता आणि त्‍यावरील विडंबने वाचून आपणही ह्या कुटुंबातील एक व्‍हायचेच हे ठरवले होते.

मैत्र जीवाचे

लेखक जिप्सी यांनी गुरुवार, 05/08/2010 14:29 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणीच शिवचरित्र वाचून भारावून वगैरे गेलो होतो. त्यानंतरच्या काळात शिकारकथा,जंगलकथा ई. प्रकार वाचून तर जंगल,डोंगर दर्यांची जास्तच ओढ वाटायला लागली. कोल्हापुरात राहत असल्यामूळ पन्हाळा भरपूरदा बघितलेला होता,इतर पण डोंगर चढून उतरून झाले होते. पण यालाच ट्रेक म्हणतात हे माहित नव्हतं. पुढ पुण्यात आल्यावर 'ट्रेक' या विषयाची थोडीफार माहिती कळायला लागली,आजूबाजूच्या पोरातली काही पोर शनिवार,नारायण,सदाशिव म्हणावं तसं तोरणा,राजगड,सिंहगड म्हणत होती. मग ह्यांच्यात घूस,त्यांच्या बरोबर जा करत ट्रेकिंगची गोडी लागून गेली.

अपडेटं द्या मंडळी!!

लेखक यशोधरा यांनी गुरुवार, 05/08/2010 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यंतरी नोकरी, जागा, रहाण्याची जागा, राज्यबदल वगैरे सगळ्या गदारोळात बरेच दिवस मिपावर यायला जमलं नाही. अर्थात त्यामुळे मी नक्कीच बर्‍याच रोचक घटना वगैरे मिसल्या असणार! आता अभ्यास करायला फारसा वेळही नाहीये,तर कृपया मदत करा! तेह्वा मिपाकरहो, ज्ञानदानाचं पुण्य कमवायची ही तुम्हां सर्वांना एक सुवर्णसंधी आलीये त्याचा लाभ उठवा आणि फटाफट अपडेट्स द्या पाहू! काय काय घडलंय आणि काय बिघडलंय त्याचं!

एक विनंती......

लेखक utkarsh shah यांनी गुरुवार, 05/08/2010 12:11 या दिवशी प्रकाशित केले.
अलिकडे काही लेखांच्या प्रतिक्रिया पाहुन ही खात्री पटली की बर्‍याच जुन्या अनुभवी मि.पा.कराना नवीन आयडींचे फारच कौतुक आहे. त्यांचे ते अनमोल सल्ले , टिपण्या वगैरे मनाला फारच भावले. पण राहुन राहुन एकच प्रश्न पडला की खरच इतक्या मोटिव्हेशन ची गरज होती का? जर मोठी लोकच जर लहानांना समजुन घेन्यात कमी पडताहेत , तर कोनालाच दोष देन्यात अर्थ उरत नाही. कदचित तुमच्या तोडिचे लेखन जमत नसेल ही कोणाला, याचा अर्थ असा तर नाही ना की लगेच मिसळ्पाव ने नविन लोकांना वाव देवुच नये. इथे तुमच्याकडे बघुन इतरजण प्रेरित होत आहेत लिहण्यासाठी. आणि आपण मात्र त्यांची पुरतीच खिल्ली उडवत आहात.

मुखवटे आणि चेहरे

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी गुरुवार, 05/08/2010 11:31 या दिवशी प्रकाशित केले.
काल ऐन संध्याकाळी नेट कनेक्शन डाउन झाले आणि डोक्याला शॉट लागला. शेवटी वैतागुन शटर खाली केले आणि चुकला फकिर मशीदीत ह्या न्यायाने आम्ही चौपाटीची वाट चालायला लागलो. लांबुनच एका आईसक्रीमच्या गाडीला टेकुन बसलेला आमचा नानबा दिसला आणि चौपाटीवर आल्याचे सार्थक झाल्यासारखे वाटले. नाना एक भली मोठी पेन्सील, कागद , खोडरबर आणि टोकयंत्र घेउन बसला होता. "नानुssssssssडी काय विडंबन करतोयस का टॅक्स रिटर्न ?" मी आनंदाने साद घातली. मात्र "ये रे भाड्या !" च्या ऐवजी "राम राम" ऐकायला आले आणि आम्ही सावध झालो. नान्याचा मुड आज वेगळाच लागल्याचे लक्षात आले. "काय नानबा ?

एकटीच होते बरी मी एकटीच होते खरी

लेखक झुम्बर यांनी गुरुवार, 05/08/2010 11:30 या दिवशी प्रकाशित केले.
एकटीच होते बरी मी एकटीच होते खरी तु आला अचानक बदलवून गेलास जन्मांतरी का तु दाखवले मला काट्यातही फुलती फुले वेदनाही माझी का अशी जी तुझ्यापाशीच खुले ग्रीष्मवेदना वेचताना का दाविल्या श्रावण सरी एकटीच होते बरी मी एकटीच होते खरी आसवे ही सुख आणती अन सुखानेही येते रडे तुझ्या स्पर्शी कवितेलाही प्राजक्ती स्वप्न पडे अश्रुनाही का तु दिले कोंदण सुखाचे भरजरी एकटीच होते बरी मी एकटीच होते खरी झोपलेल्या स्वप्नंफुलांना जाग आणली नवी वठून गेल्या फांदिलाही हुंकारली कोवळी पालवी का राखेतुनी घडवली पुन्हा मूर्त ही कारीगरी एकटीच होते बरी मी एकटीच होते खरी जायचेच होते तुला तर का आणले श्वास तु भंगल्या
काव्यरस