Skip to main content

वार्षिक करभरणा संबंधी एक विचार.....

लेखक गांधीवादी यांनी मंगळवार, 17/08/2010 10:36 या दिवशी प्रकाशित केले.
आपण सगळे नुकतेच होत असलेले CWG च्या नावानी खडे फोडून दमलो, पण हे सर्व करीत असताना एक तीव्र जाणीव झाली कि आपण हे सर्व कितीही प्रयत्न केले तरी नियंत्रित करू शकत नाही कारण आपण आपले मत दर पाच वर्षांनी देऊन ते नियंत्रण गमावलेले असते. एकदा का आपले मत पेटीमध्ये गेले कि आपण परत लोकशाहीचे गुलाम होतो. नंतरची पाच वर्षे सरकार विरुद्ध आपण काहीच करू शकत नाही. फार फार तर आपण आंदोलने, चर्चा सत्रे, जनहित याचिका दाखल करू शकतो. पण परिणाम सर्वांना माहित असतात. पैसा कुठे, कसा व किती खर्च करायचा हे आपण सरकारला ठामपणे सांगू शकत नाही.

फरसाण पराठा

लेखक पिंगू यांनी मंगळवार, 17/08/2010 06:55 या दिवशी प्रकाशित केले.
थोडसं अवांतर ह्या पाककृतीबद्दल.. ही पाककृती एका वर्तमानपत्रात आली होती.. नक्की कुठंल वर्तमानपत्र होतं ते काही आठवत नाही.. पण पाककृती मात्र हमखास आठवते... काय करणार..शेवटी मी पडलो एक खादाड मिपाकर.. ;-) आता पाककृतीकडे वळूया.. साहित्यः गव्हाचं पीठ आणि मैदा, तेल. सारणाचं साहित्यः पाव किलो फरसाण, सुके खोबरे अर्धी वाटी, १०० ग्राम तीळ, चिंचगुळाची चटणी.. कृती: चला प्रथम सारण बनवून ठेवुन द्या. सारणासाठी फरसाण मिक्सरमधून भरड वाटून घ्या. सुके खोबरे किसून भाजून घ्या. तसेच तीळसुद्धा भाजून घ्या. वाटून घेतलेले फरसाण, खोबरे आणि तीळ एकत्र करा.

गोडाधोडाचे पदार्थ

लेखक सुनील यांनी मंगळवार, 17/08/2010 00:13 या दिवशी प्रकाशित केले.
माजी मालकांनी एकदा पक्वान्नांच्या निवडणूका घेतल्या होत्या. पण तेव्हाचे पर्याय अगदीच विस्कळीत होते. आज श्रावण सोमवारी आम्हाला गोडाधोडाची आठवण झाली आणि आठवण आली त्या निवडणूकांची. पण आम्हाला जात्याच विस्कळीतपणा मान्य नाही. म्हणून आम्ही गोड पदार्थांचे वर्गीकरण केले. ते खालील प्रमाणे - १) दुध अथवा दुग्धजन्य पदार्थापासून बनवलेले. २) खोबर्‍यापासून बनवलेले - उदा. खोबर्‍याच्या वड्या, नारळीभात, मोदक इ. ३) बेसनापासून बनवलेले - मैसूर पाक, बेसनलाडू, सोनपापडी इ. ४) अन्य - रवालाडू, पेठा इ. पहिल्या वर्गाचे दोन उपवर्गात विभाजन करता येईल - १अ) दूध नासवून केलेले - उदा.

बोल कसा वागु................

लेखक शानबा५१२ यांनी सोमवार, 16/08/2010 23:51 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या आयुष्यात एखादी व्यक्ती खुप खास असते,अत्यंत महत्वाची असते.कधी कधी जीवनात त्याच व्यक्तीकडुन ईतक्या ईतक्या अनपेक्षित प्रतिक्रीया/प्रतिसाद्,उत्तरे,टीपण्या येतात की वेड लागयची पाळी येते. ह्याच पार्श्वभुमीवर,एक कथा कथन करत आहे. मी तुला सर्वच दील, तुझ्याकडुन कधीच काही न मागता, तु ह्याला 'वासना' हे नाव दीलस, बोल कसा वागु मी शहाण्यासारखा? आपण रोजच भेटत होतो, एकत्र घरी जात होतो, थोड्या दीवसांनी तुला मला बघायचही नव्हत, बोल कसा वागु मी शहाण्यासारखा? तुला कोणीतरी त्रास देत होतं, मी त्याला चुकीची 'आठवण' करुन दीली, तु ह्याला 'गुंडागिरी' बोललीस, बोल कसा वागु मी शहाण्यासारखा? तुझ्या एका मैत्रीणीची अड

खळ्ळ खटॅक

लेखक तिमा यांनी सोमवार, 16/08/2010 20:49 या दिवशी प्रकाशित केले.
बाबा मोबाईलवर कोणाचे तरी डॅमेजिंग एक्झरसाईज घेताहेत. आई मोबाईलवर गॉसिप करत खिदळते आहे. सोनु वर्तमानपत्र वाचायचा प्रयत्न करतो आहे. सोनु : बाबा बाबा, खळ्ळ खटॅक म्हणजे काय ? बाबा : अरे, व्हिडिओमधे चेहेरा दाखवू नका म्हणजे झालं तर. बाकी साहेब सांभाळून घेतील. सोनु : आई, खळ्ळ खटॅक मंजे काय ? आई : ते तुझ्या बाबांना विचार रे! अगं, तर मी काय म्हणत होते ? ....... सोनु : बाबा सांगाना ! (तेवढ्यात बाबांचा फोन संपतो) बाबा : हं, सोन्या, मी सांगतो हं! कांच फुटली की आवाज कसा येतो माहिती आहे ना ? तोच तो आवाज. सोनु : बाबा, पण मॉलमधे कशी काच फुटेल ?

सोमवारची कहाणी

लेखक जागु यांनी सोमवार, 16/08/2010 14:23 या दिवशी प्रकाशित केले.
कहाणी सोमवारची आटपाट नगर होते. तिथे एक ब्राम्हण राहात होता. त्याचा एक शिष्य होता. रोज तळ्यावर जाई, स्नान करी, रोज शंकराची पूजा करी, वाटेत वेळूचे बेट होते. तो परत येऊ लागला म्हणजे मी येऊ? मी येऊ? असा ध्वनी उठे. हा मागे पाही, तो तिथे कोणी नाही, त्या भितीने तो वाळू लागला. तेंव्हा गुरुजींनी विचारले, "खायला-प्यायला वाण नाही, बाबा असा रोड का ? "खायला प्यायला वाण नाही, हाल नाही, अपेष्टा नाही, स्नान करुन येते वेळेस मला कोणी तरी 'मी येऊ? मी येऊ? असं म्हणतं, मागे पाहतो तो कोणी नाही, याची मला भीती वाटते. गुरुजी म्हणाले, "भिऊ नको, माग काही पाहू नको ! खुशाल त्याला ये म्हण!