थोडसं अवांतर ह्या पाककृतीबद्दल.. ही पाककृती एका वर्तमानपत्रात आली होती.. नक्की कुठंल वर्तमानपत्र होतं ते काही आठवत नाही.. पण पाककृती मात्र हमखास आठवते... काय करणार..शेवटी मी पडलो एक खादाड मिपाकर.. ;-)
आता पाककृतीकडे वळूया..
साहित्यः गव्हाचं पीठ आणि मैदा, तेल.
सारणाचं साहित्यः पाव किलो फरसाण, सुके खोबरे अर्धी वाटी, १०० ग्राम तीळ, चिंचगुळाची चटणी..
कृती:
चला प्रथम सारण बनवून ठेवुन द्या. सारणासाठी फरसाण मिक्सरमधून भरड वाटून घ्या. सुके खोबरे किसून भाजून घ्या. तसेच तीळसुद्धा भाजून घ्या. वाटून घेतलेले फरसाण, खोबरे आणि तीळ एकत्र करा.
चिंचगुळाची चटणी करताना चिंच आणि गूळ थोड्या पाण्यात भिजत ठेवा. थोड्या वेळाने मिक्सरमधून फिरवून घ्या आणि वरील मिश्रणात ओतून सारण बनवून घ्या. सारण बनवताना त्यात वेगळं पाणी अथवा तेल घालण्याची गरज नाही.
आता पीठ मळून घ्या आणि त्याचे लिंबाएवढे गोळे बनवा. प्रत्येक गोळ्याची एक पारी बनवा आणि त्यात सारण भरुन चांगला गोळा बनवून लाटून घ्या. लाटून झालेले पराठे तव्यावर भाजून घ्या..
सर्व्ह करताना दह्यासोबत सर्व्ह करा.
लेखात चित्र चढवून दिले आहे. - संपादक मंडळ
लेखात चित्र चढवून दिले आहे. - संपादक मंडळ
वाचने
6264
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
मजेदार पाककृती...
फोटो
फरसाण चितळ्यांचे कि काका
छानच आहे हो पराठा. हा घ्या
पहिल्यांदाच ऐकतीये हा
छान रेसिपी . मी असा बारि़क
संपादक मंडळाचे आभार
हम्म...फरसाण अन पराठा
मस्त...
करुन पाहा आणि मग सांगा