Skip to main content

म्हैसमाळ (महेशमाळ)

लेखक बाबा योगीराज यांनी रविवार, 29/08/2010 18:37 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार म॑डळी, (* पहिलाच प्रयत्न आहे, सा॑भाळुन घ्या) काही दिवसा॑पुर्वी म्हैसमाळ(महेशमाळ मुळ नाव) येथे मित्रा॑सोबत जान्याचा योग आला होता. त्याचेच फोटो येथे देत आहे. हि जागा और॑गाबाद पासुन साधारन ३६ किमी. दुर आहे. खुल्ताबाद पासुन १२ किमी. Hiranya Risort Hiranya Risort हि जागा हिरण्य रिसोर्ट आहे.

पुनरागमन..

लेखक प्राजु यांनी रविवार, 29/08/2010 18:10 या दिवशी प्रकाशित केले.
मायबाप मिपाकर, नमस्कार!! अखेर.. यक्षनगरीत परतले आहे. जवळ जवळ अडीच महिन्यांच्या सुट्टीनंतर २७ ऑगस्टला मी अमेरिकेत परत आले आहे. काही परिहार्य कारणांमुळे, ३० जुलै ऐवजी २७ ऑगस्टला यावं लागलं. "गंध हलके हलके..!!" प्रकाशीत झाला. प्रकाशन सोहळ्याला खूपशा माझ्या आंतरजालीय मित्र मैत्रीणींनी उपस्थिती लावली होती. माझं मन खूप भरून आलं. इतके दिवस आंतरजालावर राहून काहीतरी नक्कीच मिळवलं याचं समाधान झालं. प्रकाशन सोहळ्याचा वृत्तांत बिपिनदाने लिहिलेला वाचला मी. पण तेव्हा वेळेआभावी सविस्तर प्रतिसाद देऊ शकले नाही. धन्यवाद बिपिनदा!! आता, आता पुन्हा नव्याने मिपाकरांच्या सेवेत रूजू होते आहे...

नक्को नक्को रे!

लेखक अरुंधती यांनी रविवार, 29/08/2010 17:59 या दिवशी प्रकाशित केले.
"केतन, नाकात बोटं नको घालू.... " "केतन, तुला कितीदा सांगितलंय, असा पाय हलवायचा नाही म्हणून! कुणाला लागला तर? " "अरे केतन, तिथे उभा नको राहू, कोणीतरी धक्का मारील... " एक गौरांगना बसस्टॉपवर खांद्यावरच्या जाडजूड ओझ्याच्या पिशव्यांना कसेबसे सांभाळत, बसची वाट पाहत दर मिनिटाने तिच्या बोअर झालेल्या चिमुकल्याला हटकत होती. तिच्या चेहऱ्यावरून ती दमल्याचे स्पष्ट दिसत होते. बराच वेळ थांबूनही बस आली नव्हती. आणि सुपुत्र 'केतन' अतिशय बोअर झालेल्या अवस्थेत स्वतःचे मनोरंजन करू जाता त्याला वारंवार हटकण्यात येत होते. खरं तर आपल्या हटकण्याने मुले खरोखरीच त्यांना करावयाच्या गोष्टी थांबवतात का?

म्हैसमाळ (महेशमाळ)

लेखक बाबा योगीराज यांनी रविवार, 29/08/2010 17:52 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार म॑डळी, (* पहिलाच प्रयत्न आहे, सा॑भाळुन घ्या) काही दिवसा॑पुर्वी म्हैसमाळ(महेशमाळ मुळ नाव) येथे मित्रा॑सोबत जान्याचा योग आला होता. त्याचेच फोटो येथे देत आहे. हि जागा और्॑गाबाद पासुन साधारन ३६ किमी. दुर आहे. खुल्ताबाद पासुन १२ किमी. हि जागा हिरण्य रिसोर्ट आहे.

बोट कि ब्रश ?

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 29/08/2010 16:00 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या वेळी टूथ ब्रश हि कल्पना फारशी प्रचलित नव्हती..घरी तयार केलेल्या राखुंडी..वा कापूर..तुरटी घालून वस्त्रगाळ केलेल्या कोळशाच्या पावडरने बोटाने दात घासत असू.. हळूहळू काकडे.पोरवाल..बि ट्को .माकडछाप काळी टूथ पावडर बाजारात आली .. व लोक त्या पावडरने लोक पण बोटाचा वापर करून लोक दात घासत असत.. पुढे टूथ पेस्ट व ब्रश प्रचलित झाला..कोलगेट व म्याक्लीन ह्या दोन पेस्ट बाजारात होत्या.. हल्ली तर पेस्ट व ब्रश यांचे अनेक प्रकार बाजारात आले असून प्रत्येक चानल वर ...ओठांची महीरप,करे मम मनांस दंग. आत असे दंतपंक्ती कि शुभ्र मोत्याची रांग...

पाकव्याप्त काश्मीरमधील कांहीं भागावर चिनी नियंत्रण?

लेखक सुधीर काळे यांनी रविवार, 29/08/2010 15:46 या दिवशी प्रकाशित केले.
काश्मीरमधील कांहीं भागावर चिनी नियंत्रण? खालील दुवा उघडा: http://hindu.com/2010/08/29/stories/2010082955490900.htm ही बातमी सर्वप्रथम मी इंडियन एक्सप्रेसच्या ई-पेपरवर आज सकाळी वाचली पण थोड्या वेळानंतर भारतीय दूतावासातील एका अधिकार्‍याला दाखविण्यासाठी म्हणून शोधली तर ती इंडियन एक्सप्रेसवरून अदृश्य झाली होती. इंडियन एक्सप्रेसवर 'सर्च' वापरून दुवा तर मिळाला पण 'ही लिंक उघडल्याने आपला काँप्यूटर खराब होईल' अशी 'धमकी' दिसली. मग open domainवर सर्च केल्यावर 'हिंदू'मध्ये हा दुवा मिळाला.

हे खेळ संचिताचे .....!

लेखक गंगाधर मुटे यांनी रविवार, 29/08/2010 14:40 या दिवशी प्रकाशित केले.
हे खेळ संचिताचे .....! काजळील्या सांजवाती, चंद्रही काळोखला का असा रे तू समुद्रा निर्विकारे झोपला सर्वसाक्षी तू म्हणाला "सर्वमय आहेस तू" हस्त माझा रेखतांना का असा भांबावला हंबरूनी वासराने हंबरावे ते किती आज गायीने पुन्हा तो मस्त पान्हा चोरला तृप्त झाल्या क्रुद्ध वाटा, पावले रक्ताळूनी का कशाला धोंड कोणी जागजागी मांडला पाठराखा का मिळेना, का मिळेना सोबती एकलाची झुंजतांना, श्वासही सुस्तावला घेतले ओठात होते, सप्तकाचे सूर मी साद ती बेसूर गेली, नाद ही मंदावला संचिताचे खेळ न्यारे, पायवाटा रोखती चालता मी अभय रस्ता, काळही भारावला गंगाधर मुटे ..................
काव्यरस

आले आले गणपती माझ्या घरी आले

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 29/08/2010 13:53 या दिवशी प्रकाशित केले.
आले आले गणपती माझ्या घरी आले
आले आले गणपती माझ्या घरी आले आगमनाने...त्यांच्या... आगमनाने त्यांच्या हो... घर माझे पवित्र झाले...
काव्यरस

इतिहास

लेखक यशवंतकुलकर्णी यांनी रविवार, 29/08/2010 01:24 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल असं होत नाही; पण भालचंद्र नेमाड्यांच्या कादंबरीवरच्या धाग्यात प्रतिक्रिया देता-देता हात आवरला आणि झोपी गेलो. झोपेतल्या-झोपेत ह्या खालच्या ओळी बडबडत होतो म्हणे; कुणीतरी त्या लिहून घेतल्यात, मी त्या इथं टाकतो. आता जिथे प्रतिक्रिया द्यायची होती तो धागाच सापडत नाहीय (सवय होईपर्यंत असंच होणार).
काव्यरस