Skip to main content

आले आले गणपती माझ्या घरी आले

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 29/08/2010 या दिवशी प्रकाशित केले.
आले आले गणपती माझ्या घरी आले
आले आले गणपती माझ्या घरी आले आगमनाने...त्यांच्या... आगमनाने त्यांच्या हो... घर माझे पवित्र झाले... ||धृ|| श्रावण सरता भाद्रपद महिना सुरू होता शुक्ल चतुर्थीला गणपती बसता आनंदाने... आनंदाने... मन भरून आले ||१|| मुर्ती सुंदर सुबक घरी आणली मंदिर करूनी तिला सजवली भक्तीभावाने... भक्तीभावाने हो... आरती ओवाळूनी गणेशा वंदीले ||२|| उत्सव असे हा दहा दिवसांचा मेहनत घेवूनी आरास करण्याचा गणेशा भजण्या... गणेशा भजण्या हो सारे एकच उत्साहाने न्हाले ||३|| मोदक लाडू नैव्येद्य दाखवूया प्रसादासाठी हात पुढे करूया वर्षाच्या सणाला... वर्षाच्या सणाला...हो सुटी काढून भाउबंद आले ||४|| - पाषाणभेद (दगडफोड्या) २९/०८/२०१०
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1081
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया