Skip to main content

कुरकुरीत!

Published on 04/12/2010 - 01:07 प्रकाशित मुखपृष्ठ
"बाबा, बघितलंत का, संजूबाबानं मान्यताला काय भेट दिलेय ती...? रोल्स रॉइस!'' चि. कुरकुरेंनी कधी नव्हे तो पेपर हातात घेतला होता आणि त्यावरून परममूज्यांना चाळवण्याची त्याला हुक्की आली होती. ""हो का? बरं!'' फार उत्सुकता दाखवणं श्री. कुरकुरेंना परवडण्यासारखं नव्हतं. ""अगं बाई, कुठला राईस? बरं झालं आठवलं. तांदूळ पार संपलेत! आणायला झालेत...अहो...'' ""अगं आई, राईस नाही. रोल्स रॉइस! अडीच-तीन कोटींची गाडी आहे ती! त्यानं मान्यताला भेट दिली, तिच्या वाढदिवसानिमित्त!'' चि. कुरकुरे चिरकला. ""तिची मान्यता आहे ना एवढ्या खर्चाला? मग आपल्याला काय करायचंय?
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 3212

योगसाधना कुणाकडून आली आहे?

Published on 03/12/2010 - 22:58 प्रकाशित मुखपृष्ठ
गेल्या आठवडाभरात आधी न्यूयॉर्क टाईम्स मधे आणि पाठोपाठ टाईम्स ऑफ इंडीया मधे योगसाधना, ज्याला इंग्रजीत "योगा" असे म्हणले जाते त्याचे मूळ कुठले आहे आणि त्यावरून चालू झालेल्या "टेक बॅक योगा" चळवळीबद्दल बातम्या आल्या आहेत. १८९३ साली विवेकानंद अमेरिकेत पहील्यांदा आले आणि त्यांनी योगसाधनेची ओळख या नवीन जगास करून दिली.

याद्या 18716

असत्य तेही शास्त्रोक्त

Published on 03/12/2010 - 20:14 प्रकाशित मुखपृष्ठ
काही महिन्यांपूर्वी राजेश घासकडवी साहेबांनी एक कौल काढल होत- पूर्वजांविषयी पडणारी पितृपक्षातील पडणारी स्वप्न आणि योगायोग ह्या विषयी. नंतर त्यांनी आकडेमोड मांडून तो योगायोग कसा आहे हे दाखवणारा लेखही लिहिला होता. तो बर्याच अंशी पटणारा होता. आणि बर्याच लोकांना पटलाही. पण त्यातली आकडेमोड मला न रुचल्यामुळे मी वेगळी जास्ती शास्त्रोक्त पद्धत कशी वापरली पाहिजे ह्या विषयी एक लेख लिहिला होता. त्यात एक आगाऊ आणि आवांतर वक्तव्य होतं स्वप्नांच्या डिस्ट्रीब्युशन विषयी . राजेशनी ते पॉयसॉन आहे हे कौलाद्वारे दाखवण्याचा प्रयत्न केला होता आणि मला अस वाटत होत कि ह्यात नवीन काहीच नाही.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 3889

मोदी निर्दोष

Published on 03/12/2010 - 18:16 प्रकाशित मुखपृष्ठ
गुजरातचे मुख्यमंत्री श्री नरेंद्र मोदी २००२ च्या दंगलीत निर्दोष आहेत असे एस आय टी ने कबुल केले आहे. त्यांच्या विरुद्ध काही पुरावा एस आय टी ला मिळाला नाही. अधिक माहिती - http://www.rediff.com/news/report/guj-riots-sits-clean-chit-to-modi-vindicates-bjp/20101203.htm गुजरात विकासाचे शिल्पकार श्री नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन

याद्या 5223

प्रतिबंध काढल्याची घोषणा...

Published on 03/12/2010 - 17:45 प्रकाशित मुखपृष्ठ
नमस्कार, मिसळपावचे सदस्यं टारझन यांचेवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली होती. त्यांनी झाल्याप्रकारा बद्दल दिलगीरी व्यक्त केल्यावर आणि झाल्याप्रकाराची पुनरवृत्ती न करण्याच्या, संपादन मंडळास सहकार्य करण्याच्या आणि अश्याच अन्य अटी मान्य केल्यामुळे व तश्या प्रस्तावास संपादकांनी मान्यता दिल्यामुळे त्यांना पुन्हा प्रवेश देण्यात येत आहे. यापुढे मिसळपावर टारझन हे सर्वांना सहकार्य करतील हीच अपेक्षा आहे. - सरपंच.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 18927

अंधश्रद्धा-गोष्ट-४

Published on 03/12/2010 - 12:40 प्रकाशित मुखपृष्ठ
अंधश्रद्धेचा उगम काही दिवसांपूर्वी मुंबईची एक बातमी आली होती. नवरा-बायको, त्यांची दोन लहान मुले व मुलांच्या दोन आत्या एका ठिकाणी रहात होत्या. दोन आत्यांपैकी एकीच्या अंगात दैवी तर दुसरीच्या अंगात आसूरी शक्ती वावरत होती.. सगळ्यांचा यावर विश्वास. यावर उपाय म्हणून आत्याने त्या दोन लहान मुलांना आई-वडिलांच्या समोर मारले, ठार मारले! त्यावेळी आई-वडिलांनी विरोध केला नाही. अविश्वसनीय पण सत्य घटना. अंधश्रद्धा सारासार विवेकावर मात करतेच पण आई-वडिलांचे मुलांवर असलेले प्रेमही तिच्यापुढे हतबुद्ध ? अंधश्रद्धा जगभर आहे, सर्व धर्मांत आहे, अशिक्षित-सुशिक्षित दोघांतही आहे. किती पुराणी आहे ही अंधश्रद्धा ?
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 5371

माईंड मॅप

Published on 03/12/2010 - 06:38 प्रकाशित मुखपृष्ठ
गेली ४ वर्षे मी "फ्री माईंड" नावाचे साधन (सॉफ्ट्वेअर टूल) माझ्या कार्यक्षेत्रात वापरते आहे. हे साधन माईंड मॅप या प्रकारात मोडते. याचा उपयोग मेंदूतील विचार अतिशय सुसंगत आणि सुस्पष्ट तसेच आकर्षक रीतीने कागदावर उतरविण्यात होतो. विचार आपले आपल्याला खरोखर खूप स्पष्ट होतात. विचारांची दिशा आणि विचारसमूह ओळखू येऊ लागतात. एखाद्या ठीकाणी विचारसाखळी तुटली असेल (गॅप) तर लगेच लक्षात येते.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 5487

नारळाचे सान्दण

Published on 03/12/2010 - 06:28 प्रकाशित मुखपृष्ठ
साहित्य : १ वाटी रवा ३/४ वाटी नारळाचे दूध २ - ३ चमचे किसलेला गूळ चिमूटभर वेलची पूड चिमूटभर केशर दूधामधे भिजवून चिमूटभर खाण्याचा सोडा कृती : एका भान्ड्यामधे नारळाचे दूध आणि गूळ एकत्र करून घ्या.गूळ दूधामधे पूर्ण विरघळून घ्या. मग त्यामधे रवा घालून मिश्रण एकजीव करून घ्या. हे मिश्रण साधारण पणे अर्धा तास भिजवून ठेवा. अर्ध्या तासानी त्यामधे केशर , वेलची घालून मिश्रण एक्जीव करून घ्या.

याद्या 3515

मुशर्रफना व्हिसा नाकारुन केन्द्र सरकार ने योग्य केले आहे .

Published on 02/12/2010 - 21:14 प्रकाशित मुखपृष्ठ
मुशर्रफ सारख्या भारताविरुध्द नेहमीच गरळ ओकणारया माणसाला केन्द्र सरकार ने व्हिसा नाकारुन फार उत्तम काम केले. भारतात येउन आपल्याच राजकरण्यानना हा माणुस सल्ला देउन जातो व आपल्या नेत्यान्ची गोची करुन जातो असे मला नेहमी जाणवले. काही दिवन्सापुर्वि तर मुशर्रफने कबुलीसुध्दा दिली की कारगिलचा कर्ता करविता मीच होतो. अशा परीस्थीतित आपल्या सरकारने कधी नव्हे ते एक चान्गले काम कुथलाही घोळ न घालता केले. पाकिस्तान मधे वाटेल ते करुन परतण्यासाथी हा माणुस काहिहि करु शकतो. मिडीया वाल्यान्चि मात्र एक मोथी सन्धि गेली हे मात्र नक्की. आपल्या सरकारला अनेक धन्यवाद

याद्या 5113

मौनाचं वादळ

Published on 02/12/2010 - 20:06 प्रकाशित मुखपृष्ठ
काहीतरी खुपतंय, सलतंय आत कुठंतरी खोलवर दुखतंय आज उगाच गहिवर, आवंढा घशात कोंडलेला श्वास, सैरभैर मनात मन कसं पिसं झालंय आज कुठतरी खोलवर दुखतंय आज पापण्यांची होते झालर ओली रडवेली होते देहाची बोली कबुली कशाची द्यावी आज कुठतरी खोलवर दुखतंय आज सयींचं व्याकुळ, आठव मोहळ उरात कल्लोळ, मौनाचं वादळ कोरडा श्रावण, भिजवे आज कुठतरी खोलवर दुखतंय आज जयश्री अंबासकर
लेखनविषय:

याद्या 2958
काव्यरस