मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भ्रष्ट भारतीय पत्रकारिता

बेभान ·
नुकत्याच देशाला हादरवून ठेवलेल्या २जी घोटाळ्याबाबत मिसळपाववर उदासिनता ? मला यावर बी.बी.सी.वरचा (http://www.bbc.co.uk/blogs/thereporters/soutikbiswas/2010/11/indian_medias_credibility_crisis.html) सौतिक बिस्वास यांचा हा लेख मिपाकरांबरोबर शेअर करण्यास आवडेल. त्यालेखावरील प्रतिसाद वाचण्यास विसरू नका. भारतीय भ्रष्ट सरकारचे पत्रकारितेसोबत असलेले साटे-लोट्याचे संबंध यातून बाहेर आले.

मदत हवीय

समीरसूर ·
नमस्कार, मला तातडीने काही औषधी अमेरिकेतून मागवायची आहेत. साधारण १५ दिवसात ही औषधी मागवायची आहेत. मिपाकरांपैकी कुणी किंवा मिपाकरांच्या ओळखीपैकी कुणी जर येत्या १५-२० दिवसात भारतात येणार असेल (पुण्यात येणार असल्यास अधिक उत्तम) तर कृपया मला सांगा. औषधी सोबत आणण्यात काही अडचण नसेल तर खूप मदत होईल. धन्यवाद, समीर

मराठी पाऊल पडते पुढे

कौतुक शिरोडकर ·
नमस्कार मित्रहो ! फूबाईफूचा फिनाले झाला जो तुम्ही २६ डिसेंबरला पाहू शकाल. यानंतर पुढे काय ? हा प्रश्न अनेकांनी विचारला. मीही काही गोष्टीत गुंतलो असताना दोन दिवसापुर्वी फूबाईफूचे ऑनलाईन डायरेक्टर श्री श्रीप्रसाद क्षीरसागर याचा फोन आला. दुसर्‍या दिवशी रितसर पवईत भेट झाली. गंमत म्हणजे यापुर्वी त्यांना मी फक्त कंट्रोल रुममध्ये पाहील होतं. एवढ्या दिवसात आम्ही कधी एका वाक्याचाही संवाद साधला नव्हता. त्यांनी मला ' श्रीप्रसाद क्षीरसागर' अशी फोनवर ओळख दिली तेव्हा " कोण ? " हा प्रश्नही मी बावळटपणे विचारलो. असो. काल मी विख्यात कलादिग्दर्शक श्री.

तुझी माझी प्रित होती

पाषाणभेद ·
तुझी माझी प्रित होती
तुझी माझी प्रित होती, विसरूनी जा जिवनात आले वादळ कधी, विसरूनी जा ||धृ|| हातांना ना कधी, गुंफण आता मिळायची पावलांना सवय होवूदे, एकटेच चालायची भेटलो तो किनारा, विसरूनी जा तुझी माझी प्रित होती, विसरूनी जा ||१|| त्या आर्त नजरा, ते नजरेतले बोलणे न बोलताच कळणारे मनातील हुरहुरणे आठवणींना सांग, स्मरणातूनी निघूनी जा तुझी माझी प्रित होती, विसरूनी जा ||२|| आठवते मला दिलेले मोरपीस निळेगार तूही वहीत ठेवले होते पिंपळपान जाळीदार भेट दिली घेतली, परत घेवूनी जा तुझी माझी प्रित होती, विसरूनी जा ||३||

अणु युध्द आणि भारत : कधी आणि का ?

वडिल ·
अणुयुध्दा बद्दल चर्चा जरी भयावह वाटली तरी ते एक सत्य आहे आणि नाकारता येणार नाहि. अणुयुध्द होणार आणि भारतीय भुखंडात ते भोगावे लागणार हे जवळ जवळ सत्य आहे. प्रश्व येवढाच आहे कि ते कधी आणि कसे ? भारताने किती हि शांती चा पुरस्कार करत अणुकार्यक्रम कार्यरत ठेवला तरी एके दिवशी सत्या ला समोरे जात...जे गरजेचे आहे ते करावे लागेल. अणुशस्त्रां मधे जेवढी गुंतवणुक होते आहे कि एके दिवशी ह्या गुंतवणुकीच्या रीटर्नस साठी तरी अणुयुध्द्द गरजेचे होइल. अणुभट्ट्या जरी उर्जे साठि वापरल्या तरी त्या अत्यंत धोकादायक असतात. फ्रांस आणि उत्तर अमेरीकेत अणुउर्जे च्या प्रकल्पां च्या सुरक्षे चा खर्च लक्षणिय आहे.

पीराची चादर ...

अवलिया ·
नुकतेच एका पीराच्या दर्शनाला जाण्याचा योग आला. बाहेर पाटी होती "स्त्रियांनी पीराला हात लावु नये. डोक्यावर टोपी घालुन किंवा रुमाल, वस्त्राने केस झाकुनच प्रवेश करावा, स्त्रियांनी मासिक पाळीच्या काळात आत येऊ नये" मी भेट दिलेल्या अनेक पीरांच्या, दर्ग्याच्या बाहेर अशाच सुचना असतात. आत पिराला सुंदर, झुळझुळीत हिरव्या चादरीने झाकलेले होते. त्यावर फुलांच्या माळा होत्या. एक पोरगेलेसा फकिर हातातल्या चावरीने त्यावरच्या माशा हाकलत होता. पलि़कडे एक मध्यमवयीन फकीर कुराणपठन करत बसला होता. त्याच्याशी अल्लाह, नबी, प्रेषित यांच्या महान कर्तबगारीची चर्चा करत मी माझ्या शंका विचारत होतो.

वॉल्व्हर

निनाद ·
वॉल्व्हर चित्रपटाची सुरुवात दोघी बहिणी आणि एक मुलगी घाईने स्मशानभूमीत जाण्याने होते. दोघीजणी आपल्या आईवडिलांच्या समाधी-शिला स्वच्छ करतात. या दोघी बहिणींचे आईवडील एका आगीत जळून वारले आहेत. असे बोलण्यातून लक्षात येते. त्यानंतर त्या आजीच्या घरी जातात. जातांना रायमुंदाला आणि पावलाला पाहून ओळखीचे कुणी भेटतात. ते म्हणतात, 'अगदी तुझ्या वडिलांसारखे डोळे आहेत हिचे'. आजीकडे त्यांना त्याची आई जशी बिस्किटे करत असे तशीच बिस्किटे मिळतात. त्या दोघींना आनंद होतो.

आपण मराठी बोलतो ?

शेखर काळे ·
आपण महाराष्ट्रात मराठी बोलतो ? आपल्याला खरेच मराठीचा अभिमान वाटतो ? मी कबुल करतो की मी महाराष्ट्रात, भारतात राहत नाही, पण तरीही मनःपुर्वक मराठी बोलतो, वाचतो आणि मराठी बोलतांना, वाचतांना आणि लिहितांना इंग्रजी शब्द टाळतो. महाराष्ट्रात सुटीवर असतांना आपल्याला छान कार्यक्रम बघायला मिळतील या अपेक्षेने त्यादृष्टीने विचारणा केली असता, 'अरे आजकाल अ‍ॅडव्हान्समधे तिकिटे बाय केली नाहीस ना तर तुमच्यासारख्यांना तिथे क्राऊडमधे सफोकेट होईल', असे ऊत्तर मिळाले. सुटिच्या पहिल्याच दिवशी मिळालेला शेरा - 'अरे वा, अजुन तुमचे मराठी अगदी फ्लुएन्ट आहे हां'. अरे !? हा आमचा मित्र आमच्याच बाकावर बसून मराठी शिकला ना ?

ती येणार आहे ...!!

प्रकाश१११ ·
संध्याकाळ झाली आहे नि ती येणार आहे तो वाट बघतोय तिची आतुरतेने ..चातकासारखी .!! तिन्हीसांजा झाल्यात ..... चुकून- माकून मागे राहिलेली पाखरांची भिरी घरी परततेय .... आकाशी रंगाची साडी नि कपाळवरचा घाम त्याला अजूनही आठवत असते त्याचे कासावीस होणे तिच्या नुसत्या आठवणीने तिचा हलकासा वावर तिची लगबग तिने केलेला चहा देवाजवळ लावलेला दिवा सुख सुख निव्वळ ..... कसे असते हो ..? पाखरे तर गेली उडून दूरदेशी आपल्या पोटापाण्यासाठी स्वताचे घरटे बनवून पण ती येणार आहे तो वाट बघतो आहे तिची ती गेलीय खूप दूर जेथे जाण्याचे मार्ग असतात पण येणारे मार्ग हरवून जातात गच्च काळोखात ....! तरीही त्याला