नमस्कार मित्रहो !
फूबाईफूचा फिनाले झाला जो तुम्ही २६ डिसेंबरला पाहू शकाल. यानंतर पुढे काय ? हा प्रश्न अनेकांनी विचारला. मीही काही गोष्टीत गुंतलो असताना दोन दिवसापुर्वी फूबाईफूचे ऑनलाईन डायरेक्टर श्री श्रीप्रसाद क्षीरसागर याचा फोन आला. दुसर्या दिवशी रितसर पवईत भेट झाली. गंमत म्हणजे यापुर्वी त्यांना मी फक्त कंट्रोल रुममध्ये पाहील होतं. एवढ्या दिवसात आम्ही कधी एका वाक्याचाही संवाद साधला नव्हता. त्यांनी मला ' श्रीप्रसाद क्षीरसागर' अशी फोनवर ओळख दिली तेव्हा " कोण ? " हा प्रश्नही मी बावळटपणे विचारलो. असो. काल मी विख्यात कलादिग्दर्शक श्री. नितीन चंद्रकांत देसाई यांच्यासमोर त्यांच्या पवई येथील ऑफिसमधील कॉन्फरेंस रुममध्ये त्यांच्या टिमबरोबर चर्चेला बसलो होतो.
आता नमनानंतर मुद्द्यावर येतो. " आयकॉनिक चंद्रकात प्रोडक्शनस प्रायव्हेट लिमिटॅड " ह्या आपल्या कंपनीद्वारे श्री. नितीन चंद्रकात देसाई निघाले आहेत अटकेपार झेंडे फडकवणार्या मराठी कलाकाराच्या शोधात. "झी मराठी" सोबत हा प्रवास सुरु होतोय "मराठी पाऊल पडते पुढे" या कार्यक्रमांतर्गत. आजवर अनेक क्षेत्रात मराठी ठसा उमटला आहे. तरीही मराठी माणसाच्या नावाने ओरड चालूच असते. त्या सगळ्या कलाकारांना एक व्यासपीठ मिळवून देण्याचा हा त्यांचा प्रयत्न. तुम्ही जर सर्वसामान्यांपेक्षा वेगळं काही करत असाल तर.... प्रेक्षक या भुमिकेला सोडून तुम्हाला रंगमंचावरच्या प्रकाशात तुमची कला सादर करायची असेल तर... श्री. श्रीप्रसाद क्षीरसागर यांच्या भाषेत म्हणायचं तर... "ज्याच्या अंगी नाना कला, त्याने ऑडीशनला चला".
तुम्ही काहीही वेगळं करत असाल... गायन, वादन, नृत्य, अभिनय, शारिरीक कसरती, लोककला, परंपरागत कला, शास्त्रशोध किंवा अजून काही.... आग़ळं वेग़ळं अस काहीही.... त्या प्रत्येक कलाकाराच स्वागत आहे. जर तुम्ही अशा एखाद्या कलाकाराला ओळखत असाल तर त्याच्यापर्यंत हा आमचा निरोप पोहचवा. ऑडीशनसाठी आम्ही तुमच्या शहरात येतोय...
३० जानेवारी नागपूर सुमीत ९८९०७२७२६१
२ जानेवारी औरंगाबाद योगेश ९८७३२०२०३०
४ जानेवारी रत्नागिरी मिलिंद ९८२२५५४७७०
५ जानेवारी कोल्हापूर - " - -" -
६ जानेवारी पुणे वैभव ९८९०७९८९०३
८ जानेवारी मुंबई ०२२ ६१४१५९००
ईमेल - shabashmaharashtra01@gmail.com
तर मित्रानो, पुन्हा एकदा नव्याने सज्ज झालोय तुमच्या मनोरंजनासाठी. रिसर्च आणि लेख्नन या दोन जबाबदार्या घेतल्यात खांद्यावर. आपल्या परिने अज्ञात कलाकारांपर्यंत पोहोचण्यासाठी हा आंतरजालीय खटाटोप. यात तुमच्या सर्वांची साथ लागेल. ती मिळेल हा विश्वास आहेच.
तुमचाच
कौतुक शिरोडकर
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरे वा!
कार्यक्रमाला आणि तुम्हालादेखील शुभेच्छा!
स्वगत : नविन मराठी कार्यक्रम पहायला मिळणार तर!मस्तच!
हम्मम.. अनदर हिंदी रिअॅलिटी
हम्मम.. अनदर हिंदी रिअॅलिटी शोज रिपॅकेज्ड इन म्हराठी?
तुमच्या रिसर्चला मात्र अनेकानेक आणि मनापासून शुभेच्छा :)
शुभेच्छा!
तुमच्या कार्यक्रमाला खुप सार्या शुभेच्छा!!
मराठी 'टॅलेंट हंट'
मराठी 'टॅलेंट हंट' कार्यक्रमासाठी शुभेच्छा :)
नक्कीच मित्रांना सांगतो
नक्कीच मित्रांना सांगतो ..
शुभेच्छा
शुभेच्छा
शुभेच्छा
अरे वा! चांगली बातमी. तुम्ही
अरे वा!
चांगली बातमी.
तुम्ही लिहिलेली स्किटस् आवडली.
माझा आणि कलेचा दुरुनही संबंध नाही पण आपली प्राजु आहे कि!
एक काव्यसंग्रह आणि एक सीडी अश्या गोष्टी तिच्या नावावर जमा आहेत.
चांगला उपक्रम आहे .हा झकास
चांगला उपक्रम आहे .हा
झकास
खूप खूप शुभेच्छा!
खूप खूप शुभेच्छा!
काळे
मस्त..आगे बढो
मस्त..आगे बढो
अनेक शुभेच्छा !! अमोल
अनेक शुभेच्छा !!
अमोल